बरेच लोक घरात किंवा बाल्कनीत तुळशीचं रोप ठेवतात. तुळशीच्या पानांनी रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यास मदत होते. याशिवाय एंटी ऑक्सिडेंट्स, एंटीसेप्टीक आणि एंटीइंफ्लेमेटरी गुण यात असतात. ज्यामुळे त्वचेचा रंग उजळण्यासही मदत होते. या उपायानं त्वचेला गारवा मिळतो (Skin care Tips). याशिवाय ब्लड सर्क्युलेशन चांगले राहण्यास मदत होते. याशिवाय त्वचेचा रंग उजळतो.तुळशीच्या पानांचा वापर तुम्ही चेहऱ्यावरही वेगवेगळ्या पद्धतीनं करू शकता. फेस पॅक, उटणं, टोनर, स्क्रबरच्या स्वरूपात याचा वापर करा. (How To Use Tulsi Face Pack For Skin How To Apply Tulsi Leaves On Face)
तुळशीचा फेस पॅक
तुळशीचा फेस पॅक बनवण्यासाठी तुम्हाला १० ते १५ तुळशीची पानं, दोन चमचे दही, अर्धा चमचा मध, एक चमचा तांदूळाचं पीठ लागेल. तुळशीची पानं वाटून एका वाटीत घाला. नंतर यात दही, मध आणि तांदळाचं पीठ मिसळून घ्या. हे सर्व पदार्थ एकजीव करून एक क्रिमी पेस्ट तयार करून घ्या. हा फेस पॅक एका एअरटाईट भांड्यात ठेवून फ्रिजमध्ये ठेवा. गरजेनुसार चेहऱ्यावर १५ मिनिटांसाठी लावून ठेवा नंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. यामुळे चेहर्यावर चांगला ग्लो येईल.
तुळशीचे टोनर
तुळशीचे टोनरही फार इफेक्टिव्ह असते. हे बनवण्यासाठी तुळशीची पानं पाण्यात उकळवून घ्या नंतर थंड करून एका बॉटलमध्ये भर. रोज रात्री झोपण्याआधी हे टोनर आपल्या चेहर्याला लावा. या उपायामुळे त्वचा ताजीतवानी राहील, ओपन पोर्स कमी होतील. तुळशीचे तेल त्वचेवर लावल्यानं त्वचेसंबंधित विकार उद्भवणार नाहीत तसंच आजारांपासून लढण्यासही मदत होते. त्वचेवर पिंपल्स, डाग येणं थांबेल तसंच चेहरा उजळ दिसेल.
तुळशीच्या पानांचे स्क्रब
तुळशीच्या पानांचे स्क्रब त्वचेतील डेड स्किन सेल्स काढून टाकण्यास मदत करतात. ज्यामुळे त्वचेला नैसर्गिक सुंदरता मिळते तुळशीच्या पानांचे स्क्रब बनवण्यासाठी १० ते १५ तुळशीची पानं, एक चमचा मध, एक चमचा लिंबाचा रस, एक चमचा साखर, एक चमचा तांदूळ आणि एक चमचा ओटमील लागेल.
स्क्रब बनवण्यासाठी सगळ्यात आधी तुळशीची पानं धुवून सुकूवून घ्या नंतर ब्लेंडरमध्ये घालून वाटून पेस्ट बनवा. एका काचेच्या भांड्यात तुळशीची पेस्ट बनवून त्यात मध, लिंबाचा रस, साखर, ओटमील, तांदूळाचं पीठ घालून व्यवस्थित मिश्रण बनवून घ्या. नंतर हे मिश्रण हलक्या हातानं चेहर्याला लावून १० मिनिटं मसाज करा नंतर कोमट पाण्यानं चेहरा धुवा. हा उपाय केल्यानं त्वचा मऊ, मुलायम होण्यास मदत होईल.