Join us

दंड गोरे आणि हात काळवंडले ? हे ४ सोपे-स्वस्त उपाय करा- हातावरचे टॅनिंग झटकन होते कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2025 18:56 IST

Try these 4 easy-cheap remedies - tanning on hands will reduce instantly : हातावरचे टॅनिंग कमी करण्यासाठी घरगुती उपाय.

टॅनिंग होणे फारच सामान्य समस्या आहे. सगळ्यांना सतत हा त्रास होतोच. सगळ्यात जास्त टॅनिंग हातावर होते.  हातावर टॅनिंग होण्याचे मुख्य कारण म्हणजे सूर्याच्या किरणांचा त्वचेवर होणारा परिणाम. सूर्याच्या UV (अल्ट्राव्हायोलेट) किरणांमुळे त्वचेमध्ये मेलॅनिन नावाचे पदार्थ अधिक प्रमाणात तयार होतात. जे त्वचेला संरक्षण देतात, पण त्याच वेळी त्वचेला काळपट करतात. ( Try these 4 easy-cheap remedies - tanning on hands will reduce instantly)अनेक कारणांमुळे हातावर टॅनिंग होऊ शकते. जर कोणाला सूर्यप्रकाशात जास्त वेळ घालवावा लागत असेल तर हा त्रास जास्त होतो. हातावर जास्त टॅनिंग होण्याचे कारण म्हणजे आपण आपल्या हातांचा वापर बाहेरील कामे करत असताना अधिक वेळा करतो, ज्यामुळे सूर्यप्रकाशामुळे त्वरित टॅनिंग होऊ शकते. हात पूर्ण झाकलेले नसतात. त्यामुळे हा त्रास होतो. 

काही घरगुती उपाय करुन त्वचेवरील टॅनिंग कमी करता येते. अगदी साधे, सोपे आणि स्वस्तातले पाय आहेत. नक्की करुन पाहा.  

१. काकडी आणि मधाचा मास्क- काकडीचा ताजा रस आणि मध एकत्र करून हातावर लावा. काकडीमधे पाण्याचे प्रमाण जास्त असते. तसेच मध त्वचेला हायड्रेटेड ठेवते. ह्या मिश्रणामुळे टॅन कमी होण्यासाठी मदत होते. हाताला हा मास्क लावायचा आणि थोडा वेळ ठेवायचा. मग धुवायचे. 

२. दूध आणि हळदीचा पॅक- दूध आणि हळद हे नैसर्गिक ब्लीचिंग एजंट्स आहेत. यामुळे त्वचेवरील डाग कमी होतात. हळदीमध्ये अँटी-बॅक्टेरियाल गुणधर्म  असतात. तसेच दुधात त्वचेला सौम्य ठेवणारे गुणधर्म असतात. त्यामुळे हा पॅक त्वचेला सौम्यता दतो आणि टॅनिंग कमी करण्यास मदत करतो.

४. लिंबू आणि साखर- लिंबू आणि साखर हे मिश्रण त्वचेवर लावल्याने टॅनिंग कमी होते. लिंबात असलेले जीवनसत्त्व सी त्वचेसाठी फार फायद्याचे ठरते. तसेच साखर एक क्रबर म्हणून काम करते. साखरेतले स्क्रबिंग गुण त्वचेवरील मृत पेशी कमी करतात.

या उपायांचा नियमित वापर केल्यास हातावरची टॅनिंग कमी होऊ शकते. परंतु, टॅनिंगपासून पूर्णपणे बचाव करण्यासाठी सूर्यप्रकाशापासून संरक्षण देणारे क्रीम लावणे, तसेच सूर्यप्रकाशात जास्त वेळ न घालवणे हे ही महत्त्वाचे आहे. 

टॅग्स :ब्यूटी टिप्सहेल्थ टिप्सहोम रेमेडीत्वचेची काळजी