How To Get Glowing Skin in Winters: हिवाळ्यात होणाऱ्या प्रदुषणाचा थेट प्रभाव आपल्या आरोग्यासोबतच त्वचेवरही पडतो. अशात या दिवसांमध्ये त्वचेची काळजी अधिक घ्यावी लागते. थंडीत त्वचा मुलायम आणि ग्लोईंग ठेवणं एक अवघड काम असतं. मात्र, असेही काही घरगुती उपाय असतात, ज्यांच्या मदतीनं तुम्ही त्वचा मुलायम आणि ग्लोईंग ठेवू शकता. अशाच दह्याच्या एका फेसपॅकबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. या फेसपॅकच्या मदतीनं त्वचा क्लीन होईल आणि ग्लोईंगही दिसेल.
ग्लोईंग स्कीनसाठी घरगुती उपाय
हिवाळा असो वा उन्हाळा आपली त्वचा नेहमीच चमकदार रहावी असं सगळ्यांना वाटत असतं. अशात महिला वेगवेगळ्या प्रकारचे ब्युटी प्रोडक्ट्स वापरतात. केमिकल्स बेस्ड प्रोडक्ट्सनं काही काळासाठी फायदा मिळू शकतो, पण त्यांच्या अधिक वापरानं त्वचेचं नुकसानही होतं. अशात दह्याचा हा नॅचरल उपाय करूनही तुम्ही त्वचे चमकदार, मुलायम आणि हेल्दी ठेवू शकता.
साहित्य
दोन चमचे दही आणि अर्धा छोटा चमचा हळद पावडर.
कसा तयार कराल?
- सगळ्यात आधी एक थोटी वाटी घ्या. त्यात दोन्ही गोष्टी टाकून मिक्स करा.
- आता हे मिश्रण चांगल्याप्रकारे चेहरा आणि गळ्यावर लावा.
- साधारण १० मिनिटं ते तसंच चेहऱ्यावर सुकू द्या.
- फेस पॅक सुकल्यानंतर थंड पाण्यानं चेहरा धुवून घ्या.
- तुम्ही हवं तर एखाद्या टॉवेलच्या मदतीनं हलक्या कोमट पाण्यानं चेहरा धुवू शकता.
- तुम्ही हा घरगुती उपाय आठवड्यातून २ ते ३ वेळा करू शकता.
दही आणि हळदीचे फायदे
हिवाळ्यात वाढत्या प्रदुषणामुळे त्वचेचा चमकदारपणा कमी होतो. अशात चेहरा चमकदारही असावा आणि मुलायमही हवा तर हा फेस पॅक तुम्ही आठवड्यातून दोन ते तीन वेळा वापरू शकता. यानं त्वचा खोलवर साफ होईल आणि मळ-माती निघून जाईल. चेहऱ्यावर दही लावल्यानं डाग दूर होण्यासही मदत मिळते. यानं त्वचा आतपर्यंत क्लीन होते आणि त्वचेला ओलावाही मिळतो.