Join us

रात्री झोपण्याआधी त्वचेला 'हे' लावा; सकाळी त्वचेवर येईल तेज, चेहरा दिसेल तरूण-सुंदर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2025 23:26 IST

Tips To Get Soft Skin And A Natural Glow : एलोवेरा जेलचा वापर कोणत्या पद्धतीनं चेहऱ्यावर करायचा समजून घेऊ.

हिवाळ्याच्या (Winter) दिवसांत त्वचा डल, निस्तेज होते. यामागे बाहेरची थंड हवाही कारणीभूत ठरते. हिवाळ्याच्या दिवसांत त्वचेचं नॅच्युरल ऑईल कमी होत जातं. ज्यामुळे त्वचा कोरडी होऊ लागते. तुम्हालाही तुमच्या त्वचेवर मॉईश्चर टिकवून ठेवायचं असलेल तर काही सोप्या टिप्स तुमची मदत करू शकतात. आपल्या स्किन केअर रूटीनमध्ये एलोवेराचा समावेश  करा. एलोवेरा जेल कोलोजनचं उत्पादनं वाढवून वय वाढण्याची प्रक्रीया संथ करते.  त्वचेवर हे जेल लावल्यानं बरेच फायदे मिळतात. एलोवेरा जेलचा वापर कोणत्या पद्धतीनं चेहऱ्यावर करायचा समजून घेऊ. (Tips To Get Soft Skin And A Natural Glow Applying Aloe Vera To Your Skin Before Sleeping)

एलोवेरात बरीच पोषक तत्व असतात. यात व्हिटामीन ए, सी, ई, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि जिंक तसंच एंटी ऑक्सिडेंट्स असतात ज्यामुळे त्वचा मॉईश्चराईज आणि चमकदार राहते. यामुळे  जळजळ, पुळ्या येणं, त्वचा कोरडी होणं या समस्या टाळण्यास मदत होते.

रात्री एलोवेरा लावण्याचे फायदे

 रात्री एलोवेरा जेल लावल्यानं त्वचेला मॉईश्चर मिळतं. यातील पाणी आणि व्हिटामीन त्वचेच्या आत जाऊन त्वचेला हायड्रेट ठेवतात ज्यामुळे त्वचा कोमल आणि मुलायम बनते. यात एंटी इ्फ्लेमेटरी गुण असतात ज्यामुळे डाग कमी होतात रात्री हे जेल चेहऱ्याला लावून झोपल्यानं त्वचा उजळते.

झोपताना आपली स्किन रिपेअर होत असते. एलोवेरा जेल ही प्रक्रिया जलद करण्याचे काम करते. हे कोलोजन उत्पादन वाढवते. ज्यामुळे सुरकुत्या कमी होतात. रात्रभर त्वचेला लावून ठेवल्यानं त्वचा नैसर्गिकरित्या चमकते, फ्रेश दिसते. याशिवाय त्वचेतील जळजळसुद्धा कमी होते. एलोवेरा जेलमुळे त्वचेच्या मृत पेशी दूर होतात आणि त्वचा निरोगी राहण्यास मदत होते.हे त्वचेतील कोलेजन वाढविण्यात मदत करते, ज्यामुळे सुरकुत्या कमी होऊन त्वचा घट्ट आणि तरुण दिसू शकते.

या जेलच्या नियमित वापराने त्वचा तजेलदार, निखळ आणि चमकदार बनते. खाज सुटणे, सूज येणे किंवा त्वचेचे संसर्ग यांसारख्या समस्यांवर आराम मिळतो. डाग आणि मुरुमांची समस्या दूर करण्यास मदत करते. तसेच, यात असलेले अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म त्वचेवरील पुरळ आणि लालसरपणा कमी करतात. एलोवेरा जेल त्वचेला खोलवर हायड्रेट आणि मॉइश्चराइझ ठेवण्यास मदत करते, ज्यामुळे त्वचा मऊ आणि चमकदार बनते.

English
हिंदी सारांश
Web Title : Apply this before sleep for radiant, youthful, and beautiful skin.

Web Summary : Winter dryness fades with aloe vera. Its vitamins and antioxidants hydrate, reduce inflammation, and boost collagen. Regular use yields soft, glowing skin, diminishing blemishes and wrinkles.
टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी