Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Beauty > चेहऱ्यापेक्षा मान काळपट दिसते? अर्ध्या टोमॅटोचा 'हा' उपाय करा, काळे थर जातील-त्वचा उजळेल

चेहऱ्यापेक्षा मान काळपट दिसते? अर्ध्या टोमॅटोचा 'हा' उपाय करा, काळे थर जातील-त्वचा उजळेल

Tips And Tricks To Remove Neck Tanning : टोमॅटो, दही, बेसन, मध असे पदार्थ वापरून त्वचा उजळवू शकता

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2025 16:13 IST2025-10-27T16:05:07+5:302025-10-27T16:13:29+5:30

Tips And Tricks To Remove Neck Tanning : टोमॅटो, दही, बेसन, मध असे पदार्थ वापरून त्वचा उजळवू शकता

Tips And Tricks To Remove Neck Tanning : Use One Tomato to Reduce Neck tanning | चेहऱ्यापेक्षा मान काळपट दिसते? अर्ध्या टोमॅटोचा 'हा' उपाय करा, काळे थर जातील-त्वचा उजळेल

चेहऱ्यापेक्षा मान काळपट दिसते? अर्ध्या टोमॅटोचा 'हा' उपाय करा, काळे थर जातील-त्वचा उजळेल

मान चेहऱ्यापेक्षा (Dark Neck) जास्त डार्क दिसते अशी तक्रार अनेकांची असते. कारण त्वचेवर काळपट थर जमा झालेला असतो. सतत घाम येणं, धुळीचे कण, चेहरा धुताना मान व्यवस्थित न धुतली जाणं, मेकअप व्यवस्थित न काढणं यामुळे मानेवर काळपट थर येतात. अनेकदा हॉर्मोनल बदल, झोपेची कमतरता, वजन वाढणं, प्रेग्नंसी यामुळेही मान काळी पडते. काही सोपे, घरगुती उपाय करून तुम्ही त्वचेवरचे काळे डाग काढून टाकू शकता. यासाठी तुम्हाला काही खास करावं लागणार नाही. टोमॅटो, दही, बेसन, मध असे पदार्थ वापरून त्वचा उजळवू शकता. (Use Tomato to Reduce Neck tanning)
 
सगळ्यात आधी अर्धा टोमॅटो घ्या. त्यावर एक चमचा बेसनाचं पीठ घाला. बेसन एका नॅच्युरल क्लिंजरप्रमाणे आणि स्क्रबरप्रमाणे काम करते. ज्यामुळे डेड स्किन निघून जाते आणि त्वचा सॉफ्ट होते. त्यानंतर टोमॅटो आणि बेसनावर थोडं दही घाला त्यातील लॅक्टिक एस्डि त्वचेतलं टॅनिंग काढून टाकते आणि त्वचा नैसर्गिकरित्या ब्राईट करण्याचं काम करते.

यात थोडं मध मिसळा. मध त्वचेला मॉईश्चर देतं आणि त्वचा सॉफ्ट बनवतं. हे पदार्थ एकत्र मिसळून एक पॉवरफूल नॅच्युरल टॅन रिमुव्हर तयार होतं. हे मिश्रण हलक्या हातानं आपल्या मानेला लावा  ३ ते ४ मिनिटं हळूहळू मसाज करा. ज्यामुळे मानेवरची टॅनिंग पूर्ण निघून जाईल. नंतर कोमट पाण्यानं मान स्वच्छ धुवा. या उपायानं फक्त काळेपणा निघत नाही तर त्वचा चमकदार  आणि हेल्दी बनते.


टोमॅटोतील सिट्रिक एसिड त्वचेला ब्लीच करते, बेसन एक्सफोलिएट करते. दही त्वचेला चांगला टोन देते आणि मध त्वचेचा ग्लो वाढवते. आठवड्यातून २ ते ३ वेळा हा पॅक लावल्यानं मानेचा मळ आणि टॅनिंग निघून जातं. त्वचेला नॅच्युरल ग्लो मिळतो. तुम्ही हा उपाय हात, पाय किंवा हाताच्या कोपरांवरही करू शकता.  हे लावल्यानंतर जास्त उन्हात जाऊ नका. काही दिवसांतच तुम्हाला फरक दिसून येईल. ज्यामुळे मान साफ, स्वच्छ दिसेल.

Web Title : गर्दन काली? चमकदार त्वचा के लिए टमाटर का यह उपाय आजमाएं।

Web Summary : गर्दन काली है? टमाटर, बेसन, दही और शहद का मिश्रण टैन हटाता है, एक्सफोलिएट करता है और मॉइस्चराइज़ करता है। धीरे से लगाएं, मालिश करें और चमकदार त्वचा के लिए धो लें।

Web Title : Dark neck? Use this tomato remedy for brighter skin.

Web Summary : Dark neck? A tomato, besan, yogurt, and honey mix removes tan, exfoliates, and moisturizes. Apply gently, massage, and rinse for glowing skin.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.