Join us

डाळींचे थालीपीठ कधी खाल्ले आहे का? हा पौष्टिक पदार्थ नाश्त्याला करायलाच हवा, रेसिपी तर अगदीच सोपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2025 08:50 IST

This nutritious dish is a must-have for breakfast, and the recipe is very simple : डाळींचे असे थालीपीठ करायला सोपे आणि पौष्टिकही. पाहा कसे करायचे.

नाश्त्यासाठी काही तरी वेगळे खायचे आहे का? मग हा पदार्थ करुन पाहा. (This nutritious dish is a must-have for breakfast, and the recipe is very simple)याला आपण डाळींचे थालीपीठ म्हणू शकतो कारण थापायची पद्धत जवळपास सारखीच आहे. या पदार्थाचे खरे नाव तंजावरअप्पू अडाई असे आहे. हा पदार्थ तंजावुर या ठिकाणी केला जातो. करायला अगदी सोपा आहे चवीलाही अगदी छान.  

साहित्यतांदूळ, अख्खा उडीद, तूर डाळ, चणा डाळ, लाल मिरची, जिरे, मीठ, दुधी भोपळा, कडीपत्ता, कोथिंबीर, हींग, तेल

कृती१. सगळ्या डाळी एक वाटी घ्यायच्या. (This nutritious dish is a must-have for breakfast, and the recipe is very simple)तांदूळही त्याच प्रमाणात घ्यायचा. सगळ्या डाळी मिक्स करायच्या. तूर डाळ घ्या. चणा डाळ घ्यायची, अख्खा काळा उडीद घ्यायचा. तसेच तांदूळ घ्यायचे. सगळे पदार्थ मस्त स्वच्छ धुवायचे. दोन तीनदा पाण्यातून काढायचे. मग अर्धा तास पाण्यात भिजत ठेवायचे. 

२. दुधी भोपळा मस्त बारीक चिरुन घ्यायचा. कोथिंबीर छान बारीक चिरायची. तुम्हाला आवडत असेल तर कांदा, गाजर असे पदार्थही वापरु शकता. 

३. भिजवलेल्या डाळी एका मिक्सरच्या भांड्यात घ्यायच्या. त्यात चमचाभर जिरं घाला आणि अगदी थोडं पाणी घाला. जाडसर पीठ वाटून घ्यायचे. सगळे पदार्थ एकजीव करायचे मात्र मिश्रण पातळ नाही करायचे.   

४. वाटून झाल्यावर एका खोलगट भांड्यात मिश्रण काढून घ्या. त्यात किसलेला दुधी भोपळा घाला. बारीक चिरलेली कोथिंबीर घाला. सगळे पदार्थ छान मिक्स करुन घ्यायचे. 

५. फोडणी पात्रात तेल घ्या. त्यात चमचाभर जिरं घाला. जिरं छान फुलल्यावर त्यात कडीपत्ता घाला. छान परतून घ्या. मग त्यात हिंग घाला लाल मिरचीचे तुकडे घाला फोडणी छान खमंग झाल्यावर मिश्रणावर घाला आणि ढवळून एकजीव करा. 

६. तव्यावर थोडे तेल घाला आणि त्यावर तवा गरम होण्याआधीच हाताने थालीपीठ लाऊन घ्यायचे. जाडच लावायचे. पातळ करु नका. नंतर गॅस लावा आणि ते शिजू द्या. एका बाजूने खरपूस परतल्यावर दुसऱ्या बाजूनेही छान परतून घ्यायचे. कुरकुरीत झाल्यावर ताटात काढा आणि चटणीसोबत खा. 

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स