Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Beauty > मांड्या काळ्या - लालसर आणि कुरुप झाल्या ? जाणून घ्या कारणे आणि करा सोपे घरगुती उपाय

मांड्या काळ्या - लालसर आणि कुरुप झाल्या ? जाणून घ्या कारणे आणि करा सोपे घरगुती उपाय

Thighs turned black, red and ugly? Know the reasons and do simple home remedies : मांड्या काळवंडल्या असतील तर करा हे सोपे उपाय. होतील सुंदर.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2025 11:51 IST2025-11-05T11:50:40+5:302025-11-05T11:51:54+5:30

Thighs turned black, red and ugly? Know the reasons and do simple home remedies : मांड्या काळवंडल्या असतील तर करा हे सोपे उपाय. होतील सुंदर.

Thighs turned black, red and ugly? Know the reasons and do simple home remedies | मांड्या काळ्या - लालसर आणि कुरुप झाल्या ? जाणून घ्या कारणे आणि करा सोपे घरगुती उपाय

मांड्या काळ्या - लालसर आणि कुरुप झाल्या ? जाणून घ्या कारणे आणि करा सोपे घरगुती उपाय

मांड्या काळ्या होणे ही समस्या अनेकांना भेडसावते, विशेषतः स्त्रियांमध्ये ती सामान्यपणे दिसून येते. शरीराचा हा भाग नेहमी झाकलेला असल्याने त्याकडे अनेकदा दुर्लक्ष होते, पण त्वचेचा रंग बदलल्याने मांड्यांवर परिणाम होतो. या समस्येची अनेक कारणे आहेत आणि काही सोप्या उपायांनी त्यावर नियंत्रण ठेवता येते.(Thighs turned black, red and ugly? Know the reasons and do simple home remedies)

मांड्या काळ्या होण्यामागे सर्वात मोठे कारण म्हणजे घर्षण (friction). घट्ट कपडे, विशेषतः टाईट जीन्स किंवा लेगिंग्ज, सतत त्वचेवर घासल्याने त्या भागातील त्वचा काळी पडते. दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे घाम आणि ओलावा. शरीरातील घाम जर योग्यवेळी पुसला गेला नाही, तर त्वचा बॅक्टेरिया आणि फंगल इन्फेक्शनला बळी पडते, ज्यामुळे रंगद्रव्ये वाढतात आणि त्वचा काळी दिसते. तसेच स्थूलता, हार्मोनल बदल, वॅक्सिंग किंवा शेव्हिंगनंतर होणारा त्रास आणि अस्वच्छता ही कारणेही जबाबदार ठरतात. 

या समस्येवर उपाय करण्यासाठी काही घरगुती आणि वैद्यकीय पद्धती वापरता येतात.
सर्वप्रथम, शरीराची स्वच्छता आणि कोरडेपणा राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे. दररोज अंघोळीनंतर त्या भागावर सौम्य साबण आणि कोमट पाण्याने स्वच्छता करावी. त्यानंतर हलका मॉइश्चरायझर लावल्याने त्वचा मऊ राहते आणि त्वचेची आग होच नाही, काळेपणाही कमी होतो.

एक्सफोलिएशन म्हणजेच मृत त्वचा काढून टाकणे हा देखील उपयुक्त उपाय आहे. आठवड्यातून दोनदा लिंबाचा रस आणि साखरेचा हलका स्क्रब वापरल्यास त्वचेचा रंग सुधारतो. अ‍ॅलोवेरा जेल, हळद आणि दही, किंवा गुलाबपाणी आणि बेसन हे नैसर्गिक घटकही मांड्यांचा काळेपणा कमी करण्यात मदत करतात. अति घट्ट कपडे टाळणे आणि शक्य तितके सुटसुटीत, सैल, मऊ कापडाचे कपडे वापरणे फायदेशीर ठरते. तसेच वजन नियंत्रणात ठेवणे आवश्यक आहे, कारण स्थूलतेमुळे मांड्यांमध्ये घर्षण वाढते. जर घरगुती उपायांनी फरक पडत नसेल, तर त्वचारोग तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. काही वेळा डॉक्टर केमिकल पील, लेझर थेरपी किंवा स्किन लाइटनिंग क्रीम्स सुचवतात.

एकंदरीत, मांड्यांचा काळेपणा ही केवळ सौंदर्याची नव्हे तर त्वचेच्या आरोग्याची देखील समस्या आहे. योग्य स्वच्छता, संतुलित आहार, आरामदायी कपडे आणि नियमित काळजी घेतल्यास ही समस्या सहज कमी करता येते आणि त्वचा पुन्हा नैसर्गिकरित्या सुंदर होते. 

Web Title : जांघों का कालापन: कारण और खूबसूरत त्वचा के लिए आसान घरेलू उपाय।

Web Summary : घर्षण, पसीना, मोटापा जांघों को काला करते हैं। सफाई, एक्सफोलिएशन, ढीले कपड़े मदद करते हैं। घरेलू उपाय विफल होने पर त्वचा विशेषज्ञ से सलाह लें।

Web Title : Dark thighs: Causes and simple home remedies for beautiful skin.

Web Summary : Friction, sweat, obesity cause dark thighs. Cleanliness, exfoliation, loose clothing help. See a dermatologist if home remedies fail for treatment.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.