lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Beauty > २०२२ मध्ये इन असतील ४ हेअरस्टाईल! बघा तुम्हाला कोणती स्टाईल आवडते?

२०२२ मध्ये इन असतील ४ हेअरस्टाईल! बघा तुम्हाला कोणती स्टाईल आवडते?

२०२१ या वर्षात केसांचं स्मुथिंग आणि स्ट्रेटनिंग हे दोन प्रकार चांगलेच इन होते. आता २०२२ या वर्षी या काही हेअरस्टाईल (hair style in 2022) इन असतील, असं ब्यूटी एक्सपर्ट्स सांगत आहेत.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2021 05:33 PM2021-12-26T17:33:13+5:302021-12-26T18:09:38+5:30

२०२१ या वर्षात केसांचं स्मुथिंग आणि स्ट्रेटनिंग हे दोन प्रकार चांगलेच इन होते. आता २०२२ या वर्षी या काही हेअरस्टाईल (hair style in 2022) इन असतील, असं ब्यूटी एक्सपर्ट्स सांगत आहेत.

These hair cuts and hair styles will be trending in the upcoming year 2022 | २०२२ मध्ये इन असतील ४ हेअरस्टाईल! बघा तुम्हाला कोणती स्टाईल आवडते?

२०२२ मध्ये इन असतील ४ हेअरस्टाईल! बघा तुम्हाला कोणती स्टाईल आवडते?

Highlightsअशी जर काही हेअरस्टाईल, हेअर कट करता आला तर नक्कीच पार्टीतला तुमचा लूक युनिक ठरेल. 

थर्टी फर्स्ट सेलिब्रेशन, न्यू इयर पार्टी यसाठी बऱ्याच जणींची तयारी सुरू झाली असणार... कपड्यांची तयारी, त्यावर सूट होणाऱ्या ॲक्सेसरीज, फुटवेअर अशी सगळी खरेदी झाल्यावर साहजिकच मोर्चा ब्यूटी पार्लरकडे वळतो आणि मग त्यानूसार स्किनकेअर, हेअर केअर ट्रिटमेंट्सही केल्या जातात. या पार्ट्यांसाठी लूक चेंज करावा म्हणून केस कापण्याचा विचार करत असाल, तर थोडं थांबा आणि या काही हेअरस्टाईल नक्की बघून घ्या. कारण ब्यूटी एक्सपर्ट्सच्या मते २०२१ या वर्षी जसं केसांचं स्मुथिंग आणि स्ट्रेटनिंग हे दोन प्रकार इन होते, तसंच २०२२ साली या काही हेअरस्टाईल्सचा बोलबाला असणार आहे. त्यामुळे अशी जर काही हेअरस्टाईल, हेअर कट करता आला तर नक्कीच पार्टीतला तुमचा लूक युनिक ठरेल. 

 

१. वुल्फ हेअरकट (wolf haircut)
वुल्फ हेअरकट २०२२ या वर्षीचा सगळ्यात पॉप्यूलर हेअर कट असेल, असा अंदाज ब्यूटी एक्सपर्ट व्यक्त करत आहेत. शॅग आणि मुलेट हेअरकट shag and a mullet एकत्र करून हा वुल्फ हेअरकट तयार करण्यात आला आहे. यामध्ये डोक्याच्या वरच्या आणि समोरच्या भागात छोटे आणि दाट केस ठेवलेले असतात तर मागच्या बाजूचे केस हे लांब असतात. तुमचे केस मध्यम लांबीचे किंवा अगदी मानेएवढे केस असतील तरी तुम्ही ही हेअरस्टाईल करू शकता. 

 

२. शॉर्ट फ्रेंच बॉब हेअरस्टाईल (short french bob haircut)
सेलिब्रिटी कलरिस्ट लिन फान Linh Phan यांच्या मते French bobs हा हेअरकट २०२२ या वर्षी चांगलाच पॉप्यूलर असणार आहे. अनेक सेलिब्रिटीही सध्या शॉर्ट हेअर ठेवण्यास प्राधान्य देत आहेत. या हेअरस्टाईलमध्ये केसांची लांबी जॉ लाईनपर्यंत ठेवली जाते आणि खालच्या बाजूने केसांच्या अतिशय सॉफ्ट लेअर केलेल्या असतात. कुरळ्या केसांपासून ते सिल्की केसांपर्यंत सगळ्याच केसांसाठी ही हेअरस्टाईल चांगली दिसते, असं तज्ज्ञांचं मत आहे. 

 

३. पिक्सी कट (pixie hair cut)
जर तुम्हाला बॉयकट एवढ्या लहान केसांची स्टाईल आवडत असेल, तर यंदा अशी हेअर कट करायला काहीच हरकत नाही. उलट अशी हेअरस्टाईल २०२२ यावर्षी हीट असेल, असं काही ब्यूटी एक्सपर्ट म्हणत आहेत. त्यांच्या अंदाजानुसार शॉर्ट पिक्सी हेअरकट यावर्षी इन असणार आहे. अभिनेत्री मंदिरा बेदी, किरण राव यांनी काही काही महिन्यांपूर्वी असा शॉर्ट पिक्सी हेअरकट केला होता. शॉर्ट पिक्सी हेअरकट आणि त्याला ब्राईट कलर अशी स्टाईल यंदा इन असेल.  

 

४. ब्लंट बॉब हेअरकट (blunt bob hair style)
काजोलची कुछ कुछ होता है (hair style of kajol in kuch kuch hota hai).. या चित्रपटातली हेअर स्टाईल आठवते?? ती हेअरस्टाईल तर तुम्हाला आवडत असेल, तर यावर्षी तुम्ही ही हेअरस्टाईल करू शकता. कारण काही ब्यूटी एक्सपर्ट्सच्या मते ही हेअर स्टाईल यावर्षी ट्रेंडिंग असणार आहे. ब्लंट बॉब अशी ही हेअर स्टाईल असून सिल्की, सेमी कर्ली केसांसाठी ही हेअरस्टाईल परफेक्ट आहे, असे मानले जाते. 

 

Web Title: These hair cuts and hair styles will be trending in the upcoming year 2022

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.