Join us

पार्टी-इव्हेंटला जाण्याआधी इंस्टंट ग्लो देतील या ३ गोष्टी, चेहरा होईल चमकदार आणि मुलायम..

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 11:33 IST

Instant Glow Home Remedies : जर तुमच्या वेळ कमी असेल आणि कमी वेळातच तुम्हाला चेहऱ्यावर ग्लो मिळवायचा असेल तर किचनमधीलच काही गोष्टी तुमच्या कामात पडतील.

Instant Glow Home Remedies : सामान्यपणे जास्तीत जास्त महिला किंवा तरूणी एखाद्या इव्हेंटला, एखाद्या पार्टीला किंवा कार्यक्रमाला जाण्याआधी महागाडे ब्यूटी प्रॉडक्ट वापरतात किंवा पार्लरच्या फेऱ्या मारतात. पण जर तुमच्या वेळ कमी असेल आणि कमी वेळातच तुम्हाला चेहऱ्यावर ग्लो मिळवायचा असेल तर किचनमधीलच काही गोष्टी तुमच्या कामात पडतील. किचनमधील ३ गोष्टी तुम्हाला काही मिनिटात नॅचरल चमक देऊ शकतात. ज्याला तुम्ही इंस्टंट ग्लो म्हणू शकता.

टोमॅटो

चेहऱ्यावर इंस्टंट ग्लो मिळवण्यासाठी तुम्ही टोमॅटो यूज करू शकता. टोमॅटोमधील लायकोपिन तत्व आणि नॅचरल ब्लीचिंगचे गुण स्किनवरील टॅनिंग दूर करतात आणि एक नॅचरल चमक देतात.

यासाठी टोमॅटो कापून चेहऱ्यावर हलक्या हातानं फिरवा. डाग आणि काळे डाग असलेल्या जागांवर जास्त फिरवा. टोमॅटो ५ ते ७ मिनिटं तसं चेहऱ्यावर राहू द्या आणि नंतर साध्या पाण्यानं चेहरा धुवा. हवं तर तुम्ही बारीक केलेल्या टोमॅटोमध्ये साखर टाकून स्क्रबही तयार करू शकता. यानं त्वचेवरील ड़ेड स्किन निघेल आणि त्वचा मुलायम होईल.

बेसन

बेसन त्वचेचं सौंदर्य खुलवण्यासाठी फार पूर्वीपासून वापरलं जातं. बेसनानं त्वचा आतपर्यंत स्वच्छ होते, त्वचेतील एक्स्ट्रा ऑइल निघतं आणि नॅचरल एक्सफोलिएटरसारखं काम करतं. यानं त्वचा मुलायम आणि चमकदार होते.

यासाठी दोन चमचे बेसन घ्या आणि त्यात गरजेनुसार, दूध किंवा दही आणि चिमुटभर हळद टाकून घट्ट पेस्ट बनवा. ही पेस्ट चेहऱ्यावर आणि मानेवर चांगली लावा. १५ ते २० मिनिटं तशी ठेवा. नंतर चेहरा धुवून घ्या. नियमितपणे हा उपाय कराल तर चेहऱ्याची रंगत वाढेल.

मध

मध एक नॅचरल मॉइश्चरायजर आणि हीलर म्हणून वापरलं जातं. यात अ‍ॅंटी-बॅक्टेरिअल आणि अ‍ॅंटी-इन्फ्लामेटरी गुण असतात, जे त्वचेमध्ये ओलावा कायम ठेवतात, पिंपल्स दूर करतात आणि चेहऱ्यावर नॅचरल ग्लो आणतात. 

यासाठी एक चमचा मध घ्या आणि चेहरा व मानेवर लावा. १० ते १५ मिनिटं ते तसंच ठेवा. नंतर कोमट पाण्यानं चेहरा धुवा. जर तुमची त्वचा सेन्सिटिव्ह नसेल तर मधात लिंबाचा रस टाकूनही लावू शकता. या मिश्रणानं डाग दूर होतात आणि त्वचा आणखी चमकदार होते.

टॅग्स :त्वचेची काळजीब्यूटी टिप्स