Join us
Daily Top 2Weekly Top 5

फ्लॉलेस बेस आणि ग्लोइंग स्किन! तारा सुतारियाने सांगितली मेकअपची योग्य पद्धत; घरबसल्या मिळवा सेलिब्रिटी ग्लो...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2026 16:40 IST

flawless makeup base: glowing skin makeup: Tara Sutaria makeup tips: वयाची तिशी ओलांडल्यानंतर मेकअप करताना कोणती काळजी घ्यावी, याचे खास गुपित ताराने शेअर केले आहे.

बॉलिवूड सेलिब्रिटी इतक्या सुंदर कशा असा प्रश्न कायमच आपल्याला पडतो. वय वाढू लागलं तरी त्या सुंदर आणि तरुण दिसतात. बॉलिवूड अभिनेत्री तारा सुतारिया ही तिच्या अभिनयामुळे तर फेमसच आहे पण सोशल मीडियावर देखील अधिक प्रमाणात सक्रिय असते. (glowing skin makeup) तिच्या नॅचरल आणि 'मिनिमल' मेकअप लूकसाठी ओळखली जाते. नुकताच तिने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर "गेट रेडी विथ मी" नावाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात तिने तिचा खास ब्युटी मंत्र देखील शेअर केला. (Tara Sutaria makeup tips)सध्याच्या धावपळीच्या जगात वयाच्या तिशीत पाऊल टाकताच अनेकांना त्वचेबाबत चिंता वाटू लागते. सुरकुत्या, कोरडेपणा, डलनेस आणि थकलेला चेहरा ही लक्षणं आपल्याला दिसू लागतात. (celebrity makeup routine) अशा वेळी ‘विशीतसारखा फ्रेश लूक’ कसा टिकवायचा, हा प्रश्न अनेकांच्या मनात येतो. बॉलीवूड अभिनेत्री तारा सुतारिया तिच्या नितळ, तेजस्वी आणि तरुण दिसणाऱ्या त्वचेसाठी ओळखली जाते. वयाची तिशी ओलांडल्यानंतर मेकअप करताना कोणती काळजी घ्यावी, याचे खास गुपित ताराने शेअर केले आहे.

२००० रुपये वाचवा, ५ घरगुती उपायांनी करा पार्लसारखा हेअर स्पा घरीच, केस होतील मऊ सुळसुळीत-चमकदार!

1. तारा सुतारिया सगळ्यात आधी स्किन टिंट त्वचेला लावते. मॉइश्चरायझर आणि प्रायमरनंतर व्हिटॅमिन इनरिच्ड स्किन टिंट लावते. जो आपल्या त्वचेला एकसारखा रंग देतो, ज्यामुळे त्वचेला नैसर्गिक ग्लो मिळते. हे टिंट आपण गाल आणि नाकावर लावून व्यवस्थित ब्रश करायला हवं. यामुळे त्वचेला हेवी लेयर स्मूद फिनिशिंग लूक मिळतो. 

2. यानंतर ती आयशॅडोऐवजी आयशॅडो स्टिक वापरते. ज्यामुळे तिच्या सौंदर्यात अधिक भर पडते आणि तिचे डोळे अधिक आकर्षक दिसतात. यानंतर डोळ्यांना मस्करा लावते, ज्यामुळे ते मोठे, तीक्ष्ण आणि अधिक सुंदर दिसतात. 

3. तारा तिच्या त्वचेला ग्लोइंग लूक आणण्यासाठी मॅट पिंक ब्लशची निवड करते. यामुळे तिच्या चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येते. ती म्हणते ब्रशऐवजी बोटांनी मेकअप केल्यास तो अधिक सुंदर दिसतो. 

4. ओठांसाठी लिप लायनरचा वापर करते. ज्यामुळे ओठ अधिक जाड दिसतात. यानंतर ती ओठांवर लिपस्टिक लावते. आपल्यालाही लग्नसमारंभात किंवा साधा, सिंपल लूक हवा असेल तर या पद्धतीने लूक करु शकतो. ज्यामुळे आपण अधिक सुंदर दिसू. 

English
हिंदी सारांश
Web Title : Tara Sutaria's flawless base and glowing skin makeup routine revealed.

Web Summary : Tara Sutaria shares her minimal makeup routine for a glowing complexion. She uses skin tint for even tone, eyeshadow stick for attractive eyes, matte pink blush for natural radiance, and lip liner for fuller lips. Get celebrity glow at home!
टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीतारा सुतारिया