तमन्ना भाटिया, बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेत्री. ती आपल्या अभिनयासोबतच आपला फिटनेस व सौंदर्याची देखील तितकीच काळजी घेताना दिसून येते. अनेक बॉलिवूड अभिनेत्री सुंदर दिसण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या ब्यूटी ट्रिटमेंट्स किंवा अनेक चित्रविचित्र उपाय कायमच करत असतात. कुणी केसांवर तर कुणी त्वचेवर तर (Tamannaah Bhatia Skin Care Hack – Is Saliva Good for Pimples? Know from Skin Experts) काहीवेळा चक्क नाक, डोळे यांवर खर्चिक उपाय अगदी सर्रास केले जातात. बॉलिवूड मधील काही अभिनेत्री या कायमच आर्टिफिशियल महागड्या ट्रीटमेंट्स (Tamannaah Bhatia skin care hack) करून घेतात, याउलट काहीजणी चक्क अगदी पारंपरिक घरगुती उपायांचा किंवा त्यांच्या आई - आजीने सांगितलेले पारंपरिक घरगुती उपायही फॉलो करताना दिसतात. सध्या अनेक सोशल मिडिया माध्यमांवर तमन्ना भाटिया आणि तिचा अजबगजब(Saliva for pimples) स्किनकेअर हॅक प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे( Tamannaah Bhatia pimple remedy).
'द लल्लनटॉप' यांच्या 'गेस्ट न्यूज रुम' या पॉडकास्टमध्ये नुकतेच तिने तिचा चेहऱ्यावरील पिंपल्स घालवण्याचा एक घरगुती उपाय शेअर केला. हा उपाय शेअर करताना तिने सांगितले की, पिंपल्स घालवण्यासाठी ती तोंडातील लाळ थेट पिंपल्सवर लावते. यामुळे तिचे पिंपल्स निघून जातात. पण तिचा हा उपाय खरंच फायदेशीर आहे का ? हा उपाय सगळ्यांनीच करणे योग्य की अयोग्य? याबद्दल, डॉक्टर, अनामिक शर्मा यांनी NDTV ला दिलेल्या मुलाखतीत अधिक माहिती सांगितली आहे ते पाहूयात...
पिंपल्स घालवण्यासाठी तमन्ना भाटिया चक्क करते हा विचित्र उपाय...
त्वचेवरील पिंपल्स घालवण्यासाठी तमन्ना भाटिया कोणतीही महागडी क्रीम किंवा ब्यूटी ट्रिटमेंट करत नाही. पण ती जो उपाय करते तो आश्चर्यकारक आणि काहीजणांना किळसवाणा देखील वाटेल. पिंपल्स घालवण्यासाठी तमन्ना सकाळी उठल्यावर, रात्रभर तोंडात तयार झालेली लाळ थेट पिंपल्सवर लावते. तिचं असं म्हणणं आहे की हा उपाय केल्याने तिचे सगळे पिंपल्स निघून जातात. पण ती करते हा उपाय सगळ्यांसाठीच फायदेशीर आहे का किंवा हा उपाय करते त्वचेच्या आरोग्यासाठी कितपत योग्य - अयोग्य ते पाहूयात...
महागडं तेल केसांना चोपडताय? जावेद हबीब सांगतात, केसांसाठी योग्य तेल कोणतं-लावायचं कसं...
डॉक्टर सांगतात...
नोएडा मधील कैलाश हॉस्पिटलच्या त्वचारोगतज्ज्ञ डॉ. अनामिका शर्मा यांनी सांगितले की, "सकाळच्या लाळेत रात्रभर साचलेले एन्झाईम्स आणि बॅक्टेरिया असतात. यामध्ये 'लायसोजाइम' नावाचे एक एन्झाईम असते, ज्यात सौम्य अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात." आणि याच अँटी-बॅक्टेरियल गुणधर्मांमुळे काहीजणांना वाटते की ही लाळ पिंपल्समध्ये असलेल्या बॅक्टेरियाला मारू शकते. परंतु हा उपाय सर्वांसाठीच फायदेशीर असेलच असे नाही, कारणं प्रत्येक व्यक्तीच्या लाळेत बॅक्टेरियांचे मिश्रण वेगवेगळे असते. विशेषतः ज्यांची त्वचा सेंस्टिव्ह आहे, त्यांच्यासाठी ही लाळ इन्फेक्शन, त्वचेवर लालसरपणा किंवा रॅशेस वाढवू शकते. आणि जर पिंपल आधीपासूनच सुजलेला किंवा दुखत असेल, तर त्यावर लाळ लावल्यानं समस्या अधिक गंभीर होऊ शकते. त्वचेवरील सर्वच प्रकारचे पिंपल्स बॅक्टेरियामुळे होत नाहीत. हार्मोनल बदल, तेलकट त्वचा किंवा चुकीचा आहार यामुळे देखील चेहऱ्यावर पिंपल्स येऊ शकतात. त्यामुळे अशावेळी लाळ लावण्याचा काहीच उपयोग होत नाही.
काले घने रेशमी बालों का राज, एक लोखंडी तवा! तव्यावरच्या तेलाची जादू, केसगळती कायमची गायब...
गरोदरपणानंतर खूप केस गळतात? मेथी दाण्यांचा 'असा' उपाय- विरळ झालेले केस होतील दाट...
मग, पिंपल्स घालवण्यासाठी नेमका उपाय काय ?
१. दिवसातून दोनवेळा चेहरा सौम्य फेसवॉशने धुवून स्वच्छ करा.
२. सॅलिसिलिक ॲसिड किंवा बेंजोयल पॅरॉक्साइडयुक्त ब्यूटी प्रॉडक्ट्सचा वापर करा, ही रसायनं पिंपल्स कमी करण्यासाठी फायदेशीर मानली जातात.
३. पिंपल्स बोटाने किंवा नखांनी फोडू नका, असं केल्याने त्वचेवर काळे डाग, जखमांच्या खुणा कायम राहू शकतात.
४. पिंपल्स कायमच वाढत असतील किंवा बरे होत नसतील, तर त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
त्वचारोगतज्ज्ञ सांगतात की, तमन्ना भाटियाचा हा ब्यूटी हॅक कदाचित काही लोकांना उपयोगी ठरू शकतो, पण तो पिंपल्ससाठी विश्वासार्ह किंवा वैज्ञानिक उपचार नाही. त्वचेवर असे चित्रविचित्र उपाय आजमावणं धोकादायक ठरू शकतं. त्यामुळे कायम सुरक्षित, वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध आणि त्वचेला अनुकूल उपाय वापरणं केव्हाही जास्त फायदेशीर ठरतं.