तामिळ आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री तमन्ना भाटिया तिच्या अभिनयासोबतच 'फ्लॉलेस' 'ग्लोइंग' आणि 'मिल्की' स्किनसाठी ओळखली जाते. कोणताही हेव्ही मेकअप न करता सुद्धा तिच्या त्वचेवर दिसणारी नैसर्गिक चमक अनेक महिलांना भुरळ घालते. अनेकदा आपल्याला वाटतं की सेलिब्रिटी फक्त महागडी ब्यूटी प्रॉडक्ट्स वापरतात, पण तमन्ना तिच्या त्वचेच्या सौंदर्यासाठी घरगुती उपायांवर अधिक जास्त विश्वास ठेवते. तमन्ना भाटिया सांगते की, शूटिंगच्या निमित्ताने तिला तासंतास हेव्ही मेकअप करुन राहावे लागते. अशावेळी त्वचेला एक्सफोलिएट करणे आणि डेड स्किन काढणे खूप महत्त्वाचे असते. यासाठी ती खास घरगुती पदार्थांपासून तयार केलेलं स्क्रब वापरते(Tamannaah Bhatia skincare secret).
तम्मना भाटिया त्वचेची खोलवर स्वच्छता आणि एक्सफोलिएशन यावर विशेष भर देते. तिच्या मते, त्वचेवर साचलेली डेड स्किन वेळेवर काढली नाही तर ग्लो कमी होतो आणि पिंपल्स, ब्लॅकहेड्ससारख्या समस्या वाढू शकतात. त्यामुळे ती आठवड्यातून १ ते २ वेळा न चुकता फेसस्क्रब करते. नियमित फेसस्क्रब केल्यामुळे त्वचा मऊ, स्वच्छ आणि ताजीतवानी राहते. तसेच, स्किनकेअर प्रॉडक्ट्स त्वचेत चांगल्या प्रकारे शोषले जातात. तम्मनाच्या मते, सुंदर त्वचेसाठी फक्त बाह्य सौंदर्य नाही तर योग्य काळजी, सातत्य आणि साधेपणा महत्त्वाचा आहे. नुकतेच तिने तिच्या ग्लोइंग स्किनचे एक खास सिक्रेट शेअर केले आहे, ते म्हणजे तिचे 'होममेड फेसस्क्रब'. प्रदूषण आणि धावपळीच्या लाईफस्टाईलमध्ये आपली त्वचा निस्तेज होते, अशावेळी तमन्नाचा हा घरगुती (Tamannaah Bhatia homemade face scrub) उपाय आपल्याला पार्लरसारखा ग्लो मिळवून देऊ शकतो.
कसे तयार करायचे तमन्ना भाटिया स्टाईल फेसस्क्रब?
साहित्य :-
१. चंदन पावडर - १ टेबलस्पून
२. कॉफी पावडर - १ टेबलस्पून
३. मध - १/२ टेबलस्पून
४. गुलाब पाणी - १ टेबलस्पून
५. दूध - १ टेबलस्पून
शिळ्या भाताचे कोरियन फेशियल, कुणाला सांगून खरं वाटणार नाही, की ही जादू महागड्या ट्रिंटमेंटची नाही!
नेमका उपाय काय ?
एका बाऊलमध्ये चंदन पावडर आणि कॉफी पावडर एकत्र करा. त्यात मध मिसळून एक जाडसर पेस्ट तयार करा. यात आपण थोडे गुलाबपाणी किंवा दूध देखील घालू शकता. हा पॅक चेहऱ्यावर लावा आणि १० मिनिटे सुकू द्या. त्यानंतर हलक्या हाताने गोलाकार मसाज करत चेहरा कोमट पाण्याने धुवा.
हे स्क्रब करण्याचे फायदे...
१. चंदन :- त्वचेला थंडावा देते आणि टॅनिंग कमी करण्यास मदत करते.
२. कॉफी :- कॉफीमधील अँटी-ऑक्सिडंट्स रक्ताभिसरण सुधारतात, ज्यामुळे चेहऱ्यावर लगेच चमक येते.
३. मध :- मध नैसर्गिक मॉइश्चरायझरचे काम करते, ज्यामुळे स्क्रब केल्यानंतर त्वचा कोरडी पडत नाही.
४. गुलाबपाणी :- गुलाबपाणी त्वचेचा पीएच (pH) स्तर संतुलित राखून चेहऱ्याला नैसर्गिक थंडावा आणि ताजेपणा देते.
५. दूध :- दूध नैसर्गिक क्लींजर म्हणून काम करते आणि त्यातील लॅक्टिक ॲसिड त्वचेला आतून पोषण देऊन मऊ व चमकदार बनवते.
