उन्हाळ्यात त्वचेसोबत ओठांचीदेखील विशेष काळजी घ्यावी लागते. कडक ऊन, गरम वारे, शरीरात कमी झालेलं पाणी आणि सतत एसीमध्ये राहणं यामुळे अनेकांचे ओठ कोरडे पडतात, फुटतात आणि काही वेळा त्यातून रक्तही येऊ लागतं. ओठांची त्वचा खूप नाजूक असल्यामुळे त्यावर हवामानाचा परिणाम पटकन दिसून येतो. (Summer care tips ; lips care tips for sunny days, see home remedies )त्यामुळे उन्हामुळे ओठ फुटत असतील तर वेळेवर काळजी घेणं महत्त्वाचं ठरतं.
ओठ फुटण्यामागचं एक मोठं कारण म्हणजे शरीरात पाण्याची कमतरता. उन्हाळ्यात घामाद्वारे शरीरातील पाणी कमी होतं. त्यामुळे दिवसभर पुरेसं पाणी पिणं गरजेचं आहे. फक्त थंड पेयं किंवा चहा-कॉफीवर अवलंबून राहण्यापेक्षा साधं पाणी, ताक, लिंबू पाणी किंवा नारळ पाणी घेणं अधिक फायदेशीर ठरतं.
अनेकांना ओठ कोरडे पडले की सतत जीभ फिरवण्याची सवय असते. पण त्यामुळे ओठ आणखी कोरडे होऊ शकतात. ओठांवरील नैसर्गिक ओलावा कमी होतो आणि फुटण्याचा त्रास वाढतो. त्यामुळे ही सवय टाळणं आवश्यक आहे. ओठांना मॉइश्चर मिळण्यासाठी चांगल्या दर्जाचा लिप बाम किंवा तूप,खोबरेल तेल यांसारखे घरगुती उपाय उपयोगी ठरू शकतात. रात्री झोपण्यापूर्वी ओठांवर थोडं तूप किंवा तेल लावल्यास ओठ मऊ राहण्यास मदत होते. काही वेळा कोरड्या त्वचेचे थर सोलण्याची सवय असते, पण त्यामुळे जखम होण्याची शक्यता वाढते.
उन्हात बाहेर पडताना चेहऱ्याप्रमाणेच ओठांचं संरक्षण करणंही गरजेचं आहे. आजकाल सूर्यकिरणांपासून संरक्षण देणारे एसपीएफ असलेले लिप बाम मिळतात. त्यांचा वापर केल्यास ओठांवर होणारा कोरडेपणा काही प्रमाणात कमी होऊ शकतो. तसंच शरीराला पोषण मिळणंही महत्त्वाचं आहे. फळं, भाज्या आणि व्हिटॅमिनयुक्त आहार घेतल्यास त्वचेसोबत ओठांचं आरोग्यही सुधारण्यास मदत होते. काही वेळा सतत ओठ फुटत असतील तर शरीरात काही जीवनसत्त्वांची कमतरताही कारणीभूत असू शकते. उन्हाळ्यात ओठ फुटण्याचा त्रास सामान्य असला तरी त्याकडे दुर्लक्ष करू नये. योग्य काळजी घेतली तर ओठ मऊ, निरोगी आणि सुंदर राहू शकतात.
Web Summary : Summer heat causes dry, cracked lips. Hydrate well, avoid licking lips, and use lip balm with SPF. Nourishing diet and timely care can keep lips soft and healthy.
Web Summary : गर्मी के कारण होंठ फटते हैं। खूब पानी पिएं, होंठ चाटने से बचें, और एसपीएफ़ वाला लिप बाम इस्तेमाल करें। पौष्टिक आहार और समय पर देखभाल से होंठ मुलायम और स्वस्थ रहेंगे।