Join us

चोपडताय भरमसाठ क्रिम- करताय व्हायरल उपाय, चेहऱ्याची उडते चमक- ’या’ चुका पडतात महागात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2025 13:07 IST

Stop applying a lot of cream and doing viral remedies, the face glows naturally if you don't do 'these' mistakes : या काही उपायांमुळे त्वचा होते खराब. स्किन केअर करताना या काही चुका टाळा.

आपली आई आजी आपल्याला नेहमी सांगतात आमच्या काळात नव्हते हे पार्लर वगैरे, तरी त्वचा तुमच्यापेक्षा चांगली होते. फक्त पाणी आणि साबणाने स्वच्छता करायचो. (Stop applying a lot of cream and doing viral remedies, the face glows naturally if you don't do 'these' mistakes)एवढे पन्नास प्रॉडक्ट्स वापरायची गरज नाही पडली. मात्र आधीचे वातावरण आणि आताचे वातावरण यामध्ये फार फरक आहे. फक्त वातावरणच नाही तर आपले रहाणीमान, सवयी, आहार सगळ्याच गोष्टींमध्ये बदल झालेला आहे. वेळेनुसार आणि आजूबाजूच्या परिस्थितीनुसार बदलणे गरजेचे असते. त्यामुळे रोजच्या रोज त्वची , केसांची काळजी घेणे महत्त्वाचेच आहे.

भरमसाठ रासायनिक प्रॉडक्ट्स नाही पण काही ठराविक चांगल्या गोष्टींचा वापर करायलाच हवा. घरगुती उपाय करायचे. आयुर्वेदिक उपायही करायचे. मात्र स्किन केअर करताना काही चुका आपल्याकडून सहज होतात. त्या टाळणे गरजेचे आहे. नाही तर स्किन केअर केल्याचा काहीच फायदा नाही. 

१. कोणीतरी सांगितले म्हणून एखादे प्रॉडक्ट वापरु नका. तसेच आजकाल प्रॉडक्ट कंपनी फार प्रभावी जाहिरात तयार करतात. त्यांचा आपल्या विचारांवर लगेच परिणाम होतो. त्यांचे दावे खरे मानून आपण लगेच उपाय करुन पाहतो. नंतर त्याचा काही उपयोग झाला नाही की पश्चाताप करायची वेळ येते. अशी वेळ येऊ नये म्हणून विश्वासू वर्षानुवर्षे जे प्रॉडक्ट तुम्हाला सुट होत आहेत. त्वचेला त्रासदायक ठरत नाहीत असेच प्रॉडक्ट्स वापरा. 

२. रात्री झोपतानाचे रुटीन नक्की करा. कारण रात्री झोपल्यानंतर शरीर शांत असते. त्वचेला त्या वेळेत जास्त पोषण मिळते. पण छान स्किन केअर रुटीन करुन झाल्यावर लगेच झोपू नका. चेहर्‍यावरील सगळं उशी शोषून घेते आणि चेहर्‍यात काहीच मुरत नाही. सगळी मेहनत वायाच जाते. त्यामुळे रात्रीचे स्किन केअर रुटीन करुन झाल्यावर लगेच झोपू नका. थोडावेळ बसा. झोपताना लगेच कुशीवर वळू नका. सरळ झोपा. 

३. गरजेपेक्षा जास्त काळजी घेणेही त्रासाचेच. त्यामुळे भरपूर प्रॉडक्ट्स वापरु नका. काही ठराविक, खरंच गरजेच्या असणाऱ्या गोष्टीच वापरा. नवीन येणारी प्रॉडक्ट्स उगाच वापरु नका. सगळ्यांच्या त्वचेला सगळे सुट होत नाही. पोत वेगळा असतो उपायही वेगळेच करावे लागतात. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणत्याही मोठ्या ट्रिटमेंट्स करु नका.

४. मुरुमांवर टुथपेस्ट लावणे, पिंपल्सवर बेकींग सोडा लावणे, काहीही खात्री नसलेला एखादा व्हायरल उपाय करणे टाळा. त्वचा हा फार नाजूक इंद्रिय आहे. त्यामुळे त्वचेला त्रास होईल असे काही प्रकार करु नका. खात्रीचे उपायच करा. जे आधी कोणी केले आहेत आणि विश्वासातले आहेत.           

टॅग्स :ब्यूटी टिप्समहिलाहेल्थ टिप्सत्वचेची काळजी