Lokmat Sakhi >Beauty > चेहरा कायम तरुण दिसण्यासाठी प्या ‘हे’ खास ड्रिंक, शरीरात वाढेल त्वचेसाठी आवश्यक कोलेजन

चेहरा कायम तरुण दिसण्यासाठी प्या ‘हे’ खास ड्रिंक, शरीरात वाढेल त्वचेसाठी आवश्यक कोलेजन

Collagen Boosting Drink : उन्हाळ्यात जर बडीशेपचं थंडगार सरबत प्यायल्यानं शरीरात कोलेजन बूस्ट होतं. यानं शरीराला थंडावा मिळतो आणि सोबतच त्वचेसाठीही फायदेशीर ठरतं.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2025 17:52 IST2025-04-24T11:36:27+5:302025-04-24T17:52:56+5:30

Collagen Boosting Drink : उन्हाळ्यात जर बडीशेपचं थंडगार सरबत प्यायल्यानं शरीरात कोलेजन बूस्ट होतं. यानं शरीराला थंडावा मिळतो आणि सोबतच त्वचेसाठीही फायदेशीर ठरतं.

Special Natural drink That Help Your Body Produce Collagen | चेहरा कायम तरुण दिसण्यासाठी प्या ‘हे’ खास ड्रिंक, शरीरात वाढेल त्वचेसाठी आवश्यक कोलेजन

चेहरा कायम तरुण दिसण्यासाठी प्या ‘हे’ खास ड्रिंक, शरीरात वाढेल त्वचेसाठी आवश्यक कोलेजन

Collagen Boosting Drink : कोलेजन एक असं व्हिटामिन आहे जे त्वचेसाठी खूप महत्वाचं असतं. कोलेजन शरीरात सतत तयार होत असतं, पण वाढत्या वयानुसार ते कमीही होतं. शरीरात कोलेजन कमी झालं तर त्वचेवर सुरकुत्या येऊ लागतात आणि त्वचा सैल पडते. अशात कमी वयातच तुम्ही म्हातारे दिसू लागता. काही औषधं घेण्यासोबतच डाएटमध्ये काही गोष्टींचा समावेश केला तर कोलेजन वाढू शकतं. उन्हाळ्यात जर बडीशेपचं थंडगार सरबत प्यायल्यानं शरीरात कोलेजन बूस्ट होतं. यानं शरीराला थंडावा मिळतो आणि सोबतच त्वचेसाठीही फायदेशीर ठरतं. ज्यामुळे त्वचे ग्लोईंग आणि हेल्दी दिसेल. अशात हे सरबत कसं बनवाल आणि याचे काय फायदे मिळतील हे जाणून घेऊया.

बॉडीसाठी फायदेशीर बडीशेपचं सरबत

बडीशेप जवळपास सगळ्याच घरांमध्ये असते. जेवण झाल्यावर मुखवास म्हणून किंवा वेगवेगळ्या पदार्थांची टेस्ट वाढवण्यासाठी बडीशेपची टाकली जाते. खासकरून उन्हाळ्यात बडीशेपनं थंडावा मिळतो आणि डायजेशनही चांगलं होतं. इतकंच नाही तर बडीशेपच्या खास सरबतानं डिहायड्रेशनही दूर होतं. बडीशेपनं कोलेजन बूस्ट होतं. तसेच यात आढळणाऱ्या काही तत्वांनी वजन कमी करण्यास मदत मिळते. अॅसिडिटी, अपचन, गॅस, बद्धकोष्ठता अशा समस्याही दूर होतात. 

सरबत बनवण्यासाठी काय लागेल?

बडीशेपचं थंड सरबत बनवण्यासाठी तुम्हाला आधी तर बडीशेप लागेल. त्यासोबत खडीसाखर, काळी मिरी, काळं मीठ आणि थोडं खसखस लागेल. त्यासोबतच थोड्या तुळशीच्या बिया, गोंद आणि लिंबाचा रस हवा.

कसं बनवाल सरबत?

वर देण्यात आलेल्या सगळ्या गोष्टी मिक्सरमध्ये ग्राइंड करा. जे पावडर तयार होईल ते दोन चमचे पावडर एक ग्लास थंड पाण्यात मिक्स करा. त्यात थोडा गोंद, तुळशीच्या बिया, पदीन्याची पानं आणि थोडा लिंबाचा रस टाका. तुमचं खास ड्रिंक तयार आहे.

तुळशीच्या बिया आणि लिंबानं बूस्ट होईल कोलेजन

बडीशेपच्या सरबतामध्ये तुळशीच्या बिया टाकल्यानं शरीरात कोलेजनचं उप्तादन वाढतं. तुळशीच्या बियांमधील अॅंटी-ऑक्सिडेंटसोबतच म्यूसिलेजही असतात. जे शरीरातील कोलेजन बूस्ट करतात. ज्यामुळे त्वचेवरील सुरकुत्या दूर होऊन त्वचा तरूण दिसते. तर लिंबामधील व्हिटामिन सी त्वचेला तरूण ठेवण्यास मदत करतं.

Web Title: Special Natural drink That Help Your Body Produce Collagen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.