वाढत्या वयामुळे आपला चेहरा निस्तेज आणि कोरडा दिसू लागतो.(Skin care Tips) चेहऱ्यावर बारीक रेषा आणि सुरकुत्या देखील येतात. तसेच सुरकुत्या, मुरुमे आणि डार्क सर्कल दिसू लागतात. चेहरा सुंदर दिसण्यासाठी आणि त्यावर तेज येण्यासाठी आपण अनेक महागडे उत्पादने वापरतो.(tamannaah bhatia homemade face pack) चेहऱ्यासाठी क्रीम्स, ब्यूटी प्रोडक्टसारख्या गोष्टींचा वापरतो. त्वचेची काळजी घेण्यासाठी तमन्ना भाटियाने आपलं ब्यूटी सिक्रेट चाहत्यांसोबत शेअर केलं आहे. (tamannaah bhatia beauty secrets)
तमन्ना फक्त आपल्या अभिनय कौशल्यासाठीच नाही तर तिच्या सौंदर्यामुळे देखील नेहमी चर्चेत असते.(tamannaah bhatia skin care routine) कोणत्याही कार्यक्रमात तिची त्वचा चमकदार दिसते. तिच्या आईने सांगितलेला भन्नाट घरगुती उपायामुळे तिचा चेहरा नेहमीच सुंदर दिसतो.(tamannaah bhatia skincare at 35) वयाच्या पस्तीशीतही तिची त्वचा निरोगी आणि तरुण दिसते.(beauty tips homemade) तिच्या एका मुलाखतीत तिने म्हटलं होतं की, घरगुती फेस पॅकचा वापर करते. हा फेस मास्क कसा बनवायचा पाहूया. यामुळे त्वचेला फक्त हायड्रेट करत नाही तर मेकअप किंवा तणावाचा परिणाम देखील कमी होतो.
तमन्ना म्हणते की, शुटिंगवरुन परतल्यानंतर बेसन, हळद आणि मध यांच्यापासून तयार केलेला फेस मास्क चेहऱ्यासाठी वापरते. यामुळे त्वचेला पोषण मिळते. तसेच प्रदूषण व रासायनिक घटकांपासून त्वचेचे संरक्षण होते. तसेच बेसन, हळद आणि दह्यापासून बनवलेला फेस पॅक देखील त्वचेसाठी फायदेशीर आहे. बेसन मृत त्वचा काढून टाकण्यास मदत करते. हळदीमध्ये अँटीसेप्टिक गुणधर्म असतात, तर दही त्वचा मऊ आणि हायड्रेट करते. आठवड्यातून दोन वेळा हा फेस पॅक लावल्याने त्वचा स्वच्छ, चमकदार आणि सुरकुत्या मुक्त राहते.
जास्त वेळ चेहऱ्याला मेकअप केल्याने त्वचा थकते आणि ओपन पोअर्स बंद होतात. त्यामुळे मेकअप केल्यानंतर हे फेस पॅक लावण्याचा सल्ला ती देते. ज्यामुळे त्वचा कोरडी किंवा सैल पडण्याऐवजी फ्रेश दिसेल. हा फेस पॅक त्वचेला हायड्रेट, स्वच्छ करण्याचे काम करतो. ज्यामुळे त्वचा निरोगी आणि नैसर्गिक राहते.