Join us

चेहऱ्यावर तुरटी लावण्याची योग्य पद्धत काय आहे? त्वचेसंबंधी समस्या दूर करण्याचा बेस्ट उपाय...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2025 14:27 IST

How to use alum on Face : त्वचेसंबंधी वेगवेगळ्या समस्या दूर करण्यासाठी तुरटीचा वापर कसा करावा हेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

How to use alum on Face : चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर करणं असो वा इतरही काही समस्या असो यासाठी तुरटीचा वापर फार पूर्वीपासून केला जातो. कारण तुरटी एक नॅचरल तत्व आहे ज्यामुळे त्वचेसंबंधी वेगवेगळ्या समस्या दूर करता येऊ शकतात. पण याबाबत अनेकांना माहीत नसतं. त्वचेसंबंधी वेगवेगळ्या समस्या दूर करण्यासाठी तुरटीचा वापर कसा करावा हेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. महत्वाची बाब म्हणजे यासाठी तुम्हाला जास्त पैसे खर्च करण्याची आणि जास्त वेळ घालवण्याची गरज पडणार नाही.

त्वचेच्या वेगवेगळ्या समस्या दूर करण्यासाठी हळदीचा देखील वापर केला जातो. अशात हळद आणि तुरटीचा एकत्र वापर केला तर तुम्हाला जास्त फायदा मिळू शकतो. या दोन्ही गोष्टींचा जर तुम्ही त्वचेवर एकत्र वापर केला तर त्वचेवर बराच बदल दिसेल आणि त्वचा जास्त काळ तरूण ठेवण्यासही मदत मिळेल. अशात हे जाणून घेऊया की, त्वचेवर तुरटी आणि हळदीचं मिश्रण लावल्याने त्वचेसंबंधी कोणत्या समस्या दूर होतात.

सुरकुत्या दूर होतील

चेहऱ्यावर हळद आणि तुरटी लावल्याने तुमच्या चेहऱ्या सुरकुत्या दिसणार नाही. हळद आणि तुरटीमध्ये आढळणारे तत्व त्वचेवर अॅंटी-एजिंग प्रभाव टाकतात. यामुळे तत्वा टाईट राहते आणि सुरकुत्याही दूर होतात. 

चेहऱ्यावर नवीन चमक

अनेकदा बघण्यात आलं आहे की, वय वाढण्यासोबतच त्वचेची चमक कमी होऊ लागते आणि त्वच ड्राय होऊ लागते. त्वचेचा रखरखतीपणा वाढल्याने त्वचेवर डाग आणि सुरकुत्या दिसतात. सोबतच त्वचा सैल आणि कमजोर दिसू लागते. सैल आणि कमजोर त्वचेमध्ये पुन्हा चमक आणण्यासाठी तुम्ही हळद आणि तुरटी मिक्स करून लावू शकता.

इन्फेक्शनचा धोका टळतो 

तसेच हळदीमध्ये तुरटी मिक्स करून लावल्याने त्वचेवर होणारं इन्फेक्शन आणि पिंपल्सची समस्याही कमी करण्यास मदत मिळते. याने त्वचा निरोगी आणि फ्रेश दिसतो.

हळद आणि तुरटीचा कसा कराल वापर?

एक ते दोन चिमूट हळद पावडर घ्या आणि तेवढ्याच प्रमाणात त्यात तुरटी पावडर टाका. नंतर यात गुलाबजल टाकून पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि १५ मिनिटांसाठी तशीच ठेवा. नंतर चेहरा थंड पाण्याने धुवून घ्या. आठवड्यातून दोन वेळा हा उपाय तुम्ही करू शकता. काही दिवसांमध्ये तुम्हाला फरक दिसेल.

टॅग्स :त्वचेची काळजीब्यूटी टिप्स