Lokmat Sakhi >Beauty > ओठांजवळ काळा थर-पिंगमेंटेशन? पाहा कारणं, कधीच करु नका ‘या’ चुका

ओठांजवळ काळा थर-पिंगमेंटेशन? पाहा कारणं, कधीच करु नका ‘या’ चुका

skincare tips, Dark pigmentation near the lips? See the reasons, never make these mistakes : त्वचेची काळजी घेणे फारच गरजेचे असते. तोंडाजवळ होणाऱ्या पिगमेंटेशनची माहिती जाणून घ्या.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2025 17:24 IST2025-07-31T17:23:30+5:302025-07-31T17:24:38+5:30

skincare tips, Dark pigmentation near the lips? See the reasons, never make these mistakes : त्वचेची काळजी घेणे फारच गरजेचे असते. तोंडाजवळ होणाऱ्या पिगमेंटेशनची माहिती जाणून घ्या.

skincare tips, Dark pigmentation near the lips? See the reasons, never make these mistakes | ओठांजवळ काळा थर-पिंगमेंटेशन? पाहा कारणं, कधीच करु नका ‘या’ चुका

ओठांजवळ काळा थर-पिंगमेंटेशन? पाहा कारणं, कधीच करु नका ‘या’ चुका

ओठांच्या आजूबाजूला त्वचा काळपट होणे ही एक सामान्य पण अनेकांना त्रासदायक वाटणारी समस्या आहे. या काळपटपणामागे अनेक कारणे असू शकतात आणि यावर उपाय देखील उपलब्ध आहेत. (skincare tips, Dark pigmentation near the lips? See the reasons, never make these mistakes)त्वचेच्या रंगात आलेल्या या बदलाला पिगमेंटेशन म्हणतात. याचे मुख्य कारण म्हणजे मेलानिन या रंगद्रव्याचे असंतुलित प्रमाण. मेलानिन त्वचेचा नैसर्गिक रंग जपण्याचे काम करते. त्याचे प्रमाण वाढले की त्वचा अधिक काळी दिसू लागते.

ओठांच्या आजूबाजूला पिगमेंटेशन होण्यामागे सूर्यप्रकाश हे एक कारण तर आहेच. दीर्घकाळ उन्हात राहताना त्वचेवर सनस्क्रिन लावल्यास त्वचेवर होणारा सूर्यप्रकाशाचा मारा रोकता येतो. ओठांच्या भोवती त्वचा गडद दिसू लागते. दुसरे कारण म्हणजे हार्मोनल बदल. विशेषतः स्त्रियांमध्ये मासिक पाळीचे चक्र, गर्भधारणा किंवा पीसीओडीसारखे विकार हे रंगद्रव्याच्या असंतुलनास कारणीभूत ठरतात. पण ही कारणे आपल्याला माहिती आहेत. आपण जरा वेगळी कारणे जाणून घेऊया. 

काही वेळा चुकीची सौंदर्यप्रसाधने वापरल्यामुळे ओठाजवळील त्वचा गडद रंगाची होते. त्या जागेत खाज सुटते. हळूहळू त्वचा पांढरी पडून कोरडी होते. लो क्वालिटी लिपस्टिक, लिप बाम किंवा फाउंडेशन वापरल्यामुळे रासायनिक प्रतिक्रिया होऊन पिगमेंटेशन वाढू शकते. 

काही लोकांना सतत ओठांवरुन जिभ फिरवण्याची सवय असते. त्यामुळेही असे पिगमेंटेशन होते. एवढेच नाही तर सतत हात लावल्यानेही त्वचा खराब होऊ शकते. त्यामुळे सतत जिभ आणि हात लावणं टाळा. जास्त तिखट खाऊ नका. त्यामुळे ओठांच्या बाजूला झोंबते आणि फोड येतात. 

उपायांच्या दृष्टीने सर्वप्रथम त्वचेची नीट निगा राखणं महत्त्वाचं ठरतं. दररोज चेहरा स्वच्छ धुणं, सौम्य फेसवॉश वापरणं आणि रात्री त्वचेला हायड्रेट करणं याने पिगमेंटेशन थोडं कमी होऊ शकतं. सकाळी घराबाहेर पडण्यापूर्वी ओठांच्या भोवती आणि संपूर्ण चेहऱ्यावर SPF30 किंवा त्याहून अधिक सनस्क्रिन लावणं आवश्यक आहे. नैसर्गिक उपायांमध्ये लिंबाचा रस, मध आणि हळद यांचा वापर फायदेशीर ठरतो. मात्र हे उपाय सातत्याने आणि योग्य प्रमाणात करणे आवश्यक आहे. ते करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Web Title: skincare tips, Dark pigmentation near the lips? See the reasons, never make these mistakes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.