Lokmat Sakhi >Beauty > आलिया भट सकाळी करते एक सोपा झटपट गारेगार उपाय, म्हणून येते तिच्या चेहऱ्यावर चमक

आलिया भट सकाळी करते एक सोपा झटपट गारेगार उपाय, म्हणून येते तिच्या चेहऱ्यावर चमक

skincare tips, Alia Bhatt does a simple and quick morning scrub, which is why her face glows : आलिया भट रोज करते हा उपाय त्यामुळे तिची त्वचा दिसते सुंदर. पाहा खास घरगुती उपाय.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2025 17:00 IST2025-06-30T16:20:24+5:302025-06-30T17:00:44+5:30

skincare tips, Alia Bhatt does a simple and quick morning scrub, which is why her face glows : आलिया भट रोज करते हा उपाय त्यामुळे तिची त्वचा दिसते सुंदर. पाहा खास घरगुती उपाय.

skincare tips, Alia Bhatt does a simple and quick morning scrub, which is why her face glows | आलिया भट सकाळी करते एक सोपा झटपट गारेगार उपाय, म्हणून येते तिच्या चेहऱ्यावर चमक

आलिया भट सकाळी करते एक सोपा झटपट गारेगार उपाय, म्हणून येते तिच्या चेहऱ्यावर चमक

त्वचेची काळजी घेणे फार गरजेचे असते. त्वचेची काळजी घेण्यासाठी अनेक लोक आधुनिक ट्रिटमेंट्स तसेच विविध प्रॉडक्ट्स वापरतात. त्यावर अवलंबून असतात. पण सौंदर्याची काळजी घेणार्‍या पारंपरिक पद्धतींना आजही तोड नाही. (skincare tips,  Alia Bhatt does a simple and quick morning scrub, which is why her face glows)अगदी कमी खर्चात आणि कमी सामग्रीत छान त्वचा उजळवता येते. घरोघरी आजदेखील जुन्या उपायांना महत्त्व आहे. त्यातली एक मस्त उपाय म्हणजे बर्फाच्या पाण्याने चेहरा धुणे. मुळात हा उपाय अगदी स्वस्त आहे. तसेच एकदम सोपा आहे आणि मुख्य म्हणजे नैसर्गिक आहे. सकाळी चेहरा या पद्धतीने धुतल्यास त्वचेवर उजळपणा आणि स्वच्छता दिसून येते. अनेक सेलिब्रिटींनी या उपायाचा नियमित वापर करतात. काही अभिनेत्रींमुळे ही जुनी पद्धत आजही लोकप्रिय आहे. 

 

आलिया भटचा एक व्हडिओ मध्यंतरी फार व्हायरल झाला. त्यात आलियाने ती सकाळी उठल्यावर पहिले काय करते याची माहिती सांगितली. करुनही दाखवली. तिच्या चेहऱ्यावरील ग्लो पाहून सगळेच थक्क झाले. फार काही वेगळा उपाय न करता आलियानेही त्वचेसाठी बर्फाचे पाणी वापरले होते. ती रोज बर्फाच्या पाण्यात चेहरा बुडवते. त्यामुळे तिचा चेहरा फ्रेश आणि उजळलेला दिसतो असेही तिने सांगितले. 

थंड पाण्यात चेहरा बुडवल्यावर नक्की काय होते ते जाणून घ्या.  थंड पाण्यामुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. ज्यामुळे चेहऱ्यावरील सूज, विशेषतः डोळ्यांखालची सुज एकदम कमी होते. चेहरा फुगलेला दिसत नाही. तसेच रक्ताभिसरण सुरळीत होते. 

बर्फाच्या पाण्यामुळे चेहऱ्यावरील छिद्रे स्वच्छ होतात. तेलकट राहत नाहीत. ओपन पोर्सही कमी होतात. त्वचेसाठी एकदम मस्त असा हा उपाय आहे. बर्फाचे पाणी तेलावर नियंत्रण ठेवते. त्यामुळे ऑयली स्किन असेल तर रोज बर्फाच्या पाण्यात चेहरा बुडवा. नक्की फायदा मिळेल.

त्वचा मऊ होते. त्यामुळे कोरडी घट्ट् त्वचा सुंदर दिसते. तसेच हातालाही मस्त मऊ लागते. कोरडी त्वचा फुटते आणि त्याचा त्रासही होते. त्वचा फुटण्याचे प्रमाण कमी होते. फक्त हा उपाय रोज न चुकता करा. फक्त आलियाच नाही इतरही अनेक अभिनेत्री हा उपाय करण्याचा सल्ला देतात. 

Web Title: skincare tips, Alia Bhatt does a simple and quick morning scrub, which is why her face glows

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.