Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Beauty > न रगडता- न चोळता त्वचेवरचा रंग अलगद काढण्यासाठी २ टिप्स- घसाघसा घासून काढू नका चेहऱ्याचा रंग

न रगडता- न चोळता त्वचेवरचा रंग अलगद काढण्यासाठी २ टिप्स- घसाघसा घासून काढू नका चेहऱ्याचा रंग

Skin Care Tips While Playing Colours In Holi: चेहऱ्याला लागलेला रंग काढून टाकताना पुढील गोष्टींची काळजी घ्या.. त्यामुळे त्वचेला त्रास न होता चेहऱ्यावर लागलेला रंग अलगदपणे निघून जाईल...(simple tips to get rid of colours from holi)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2026 16:46 IST2026-03-02T16:43:21+5:302026-03-02T16:46:46+5:30

Skin Care Tips While Playing Colours In Holi: चेहऱ्याला लागलेला रंग काढून टाकताना पुढील गोष्टींची काळजी घ्या.. त्यामुळे त्वचेला त्रास न होता चेहऱ्यावर लागलेला रंग अलगदपणे निघून जाईल...(simple tips to get rid of colours from holi)

skin care tips while playing colours of holi, simple tips to get rid of colours from holi  | न रगडता- न चोळता त्वचेवरचा रंग अलगद काढण्यासाठी २ टिप्स- घसाघसा घासून काढू नका चेहऱ्याचा रंग

न रगडता- न चोळता त्वचेवरचा रंग अलगद काढण्यासाठी २ टिप्स- घसाघसा घासून काढू नका चेहऱ्याचा रंग

Highlightsहा लेप लावून रंग निघाला नाही तर पुन्हा एकदा हाच उपाय करा. रंग निघून त्वचा अगदी स्वच्छ होईल. 

रंग खेळताना आपण खूप उत्साहात, आनंदात रंग खेळतो. अगदी एकमेकांना चोळून चोळून रंग लावतो आणि स्वत:लाही लावून घेतो. हे सगळं करत असताना त्वचेचा विचार आपल्या डोक्यात येत नाही. पण नंतर मात्र जेव्हा रंग खेळून होतो आणि त्वचेला लागलेला रंग काढण्याची वेळ येते तेव्हा आपली पंचाईत होते. चेहऱ्याला काहीही लावायला नकोसं वाटतं.. कारण त्वचेला ते सहन होणार नाही याची भीती वाटते. म्हणूनच पुढे सांगितलेल्या काही टिप्स लक्षात ठेवा.. यामुळे त्वचेला काहीही नुकसान होणार नाही. शिवाय चेहऱ्याला जो काही रंग लागलेला असेल तो ही अगदी अलगद निघून जाईल.(simple tips to get rid of colours from holi)

चेहऱ्याला लागलेला रंग कसा काढून टाकावा?

 

१. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे रंग खेळताना वारंवार चेहरा धुत राहा. जेणेकरून कोणताही रंग तुमच्या त्वचेवर पक्का लागणार नाही. लगेचच्या लगेच जर रंगाचा काही भाग निघून गेला तर मग नंतर त्वचेवरचा रंग काढून टाकणं सोपं जातं. 

Holi Celebration 2026: रंग खेळायला येणाऱ्या पाहुण्यांसाठी करा खमंग कुरकुरीत मुगडाळ वडे, घ्या सोपी रेसिपी

२. चेहऱ्याला लागलेला रंग काढण्यासाठी खोबरेल तेल किंवा व्हॅसलिन खूप उपयुक्त ठरतं. यासाठी सगळ्यात आधी तर चेहरा पाण्याने धुवून घ्या. यानंतर हातावर तेल किंवा व्हॅसलिन घ्या आणि ते चेहऱ्यावर चोळा. यानंतर कापसाने चेहरा पुसून घ्या. रंग बऱ्याच प्रमाणात निघून गेलेला दिसेल.

 

३. तिसरा उपाय म्हणजे एका वाटीमध्ये बेसन घ्या. त्यामध्ये १ चमचा दही, १ चमचा कच्चं दूध, चिमूटभर हळद आणि थोडंसं खोबरेल तेल किंवा ग्लिसरिन घाला.

रंग खेळताना 'असे' कपडे चुकूनही घालू नका, चारचौघांत आरपार फजिती होऊन रंगाचा होईल बेरंग

आता हा लेप तुमच्या चेहऱ्याला लावा. ५ ते ६ मिनिटांनी चोळून लेप काढून टाका. एकदा हा लेप लावून रंग निघाला नाही तर पुन्हा एकदा हाच उपाय करा. रंग निघून त्वचा अगदी स्वच्छ होईल. 

 

Web Title : त्वचा कोमलता से होली का रंग छुड़ाने के आसान उपाय।

Web Summary : होली खेलते समय रंग छुड़ाने के लिए आसान उपाय! बार-बार धोना, नारियल तेल/वैसलीन लगाना, और बेसन का फेस पैक त्वचा को साफ करता है। त्वचा को रगड़े बिना रंग हटाएं।

Web Title : Gentle tips to remove Holi color without rubbing skin harshly.

Web Summary : Playing Holi? Remove colors gently! Frequent washing, coconut oil/Vaseline application, and a besan-based face pack effectively cleanse skin. Avoid harsh scrubbing for healthy skin.