Skin Care In Monsoon : पावसाळ्यात ढगाळ वातावरण, दमटपणा आणि ओवाला अधिक असल्यानं त्वचेवर चिकटपणा येतो. ज्यामुळे नंतर त्वचेवर पिंपल्स, ब्लॅकहेड्सही येतात. ज्यांची त्वचा आधीच तेलकट आहे, त्यांना तर अधिक समस्या होतात. त्यामुळे सीझन कोणताही असो त्वचेची योग्यपणे काळजी घेणं महत्वाचं ठरतं. जर आपल्याला सुद्धा या दिवसांमध्ये त्वचेसंबंधी अशा समस्या होत असेल तर त्या दूर करण्यासाठी काही टिप्स पाहुया. या टिप्स फॉलो करून त्वचा हेल्दी आणि शायनी करता येऊ शकते.
चेहरा नियमित धुवा
पावसाच्या दिवसात घाम आणि ऑइलमुळे त्वचा खराब होते. अशात सकाळी झोपेतून उठल्यावर आणि रात्री झोपण्याआधी चेहरा फेस वॉशनं चांगलं धुवा. जर तुमची त्वचा तेलकट असेल तर जेल-बेस्ड सॅलिसिलिक अॅसिड असलेला फेस वॉश वापरू शकता.
टोनर वापरा
या दिवसांमध्ये त्वचा फ्रेश ठेवण्यासाठी आपण टोनरचा वापर करू शकता. यानं त्वचा आतपर्यंत क्लीन होते आणि पोर्सही टाइट होतात. पावसाळ्यात आपण गुलाबजल किंवा अॅस्ट्रिजेंट टोनरचा वापर करू शकता. यानं त्वचेवर जमा झालेली धूळ-माती निघून जाईल.
मॉइश्चरायजर विसरू नका
पावसाच्या दिवसांमध्ये न विसरता त्वचेवर मॉइश्चरायजर लावा. अनेकांना असं वाटतं की, पावसाच्या दिवसांमध्ये मॉइश्चरायजरची काय गरज? पण असा विचार करणं चुकीचं आहे. या दिवसांमध्ये त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी ऑइल-फ्री मॉइश्चरायजरचा वापर करणं फायद्याचं ठरतं.
पाणी जास्त प्या
पावसाळ्यात तहान जरा कमी लागते. पण पाणी कमी पिणं त्वचेसाठी नुकसानकारक ठरू शकतं. या दिवसांमध्येही दिवसभर भरपूर पाणी प्यायला हवं. पाण्यानं त्वचा आतून साफ होते. तसेच हिरव्या पालेभाज्या आणि फळंही खायला हवेत. यानं त्वचा चमकदार आणि हायड्रेट राहते.