lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Beauty > मेकअपचं साहित्य खराब झालंय की चांगलं आहे हे कसं ओळखायचं? एक्सपायरी डेट उलटून गेलेलं साहित्य वापरलं तर?

मेकअपचं साहित्य खराब झालंय की चांगलं आहे हे कसं ओळखायचं? एक्सपायरी डेट उलटून गेलेलं साहित्य वापरलं तर?

Beauty Tips in Marathi : मास्कमुळे अर्धा चेहरा झाकला जातोय? ब्युटी एक्सपर्ट्स सांगतात,  मास्क लावूनही आकर्षक दिसण्याचा सोपा फंडा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2021 08:07 PM2021-04-14T20:07:50+5:302021-04-14T21:02:21+5:30

Beauty Tips in Marathi : मास्कमुळे अर्धा चेहरा झाकला जातोय? ब्युटी एक्सपर्ट्स सांगतात,  मास्क लावूनही आकर्षक दिसण्याचा सोपा फंडा

Skin Care tips : How to identify makeup products is Damage or good | मेकअपचं साहित्य खराब झालंय की चांगलं आहे हे कसं ओळखायचं? एक्सपायरी डेट उलटून गेलेलं साहित्य वापरलं तर?

मेकअपचं साहित्य खराब झालंय की चांगलं आहे हे कसं ओळखायचं? एक्सपायरी डेट उलटून गेलेलं साहित्य वापरलं तर?

लीना खांडेकर (सौंदर्यतज्ज्ञ)

 

मुलाखत- मनाली बागुल

 

कोरोनाकाळात लॉकडाऊनमुळे आपल्या सौंदर्यविषयक तक्रारी आणि गरजांचे स्वरूपही बदललं आहे. चेहरा चांगला आणि आकर्षक दिसण्यासाठी सर्वच महिला आपल्या आवडत्या शेडची लिपस्टीक लावतात. मात्र आता मास्क लावल्यानं अर्धा चेहरा झाकला जातोय. त्यामुळे महिला मेकअप करण्याबाबत फारश्या उत्साही दिसत नाहीत. याशिवाय घरात पडलेलं मेकअपचं साहित्य पडून पडून खराब व्हायला सुरूवात झाली आहे. खूप दिवसांनी जेव्हा तुम्ही वापरात नसलेली लिपस्टीक किंवा काजळ लावता तेव्हा साईड इफेक्ट्स दिसण्याची शक्यता असते.  त्वचेची काळजी कशी घ्यायची, सौंदर्य प्रसाधनं कशी आणि कधीपर्यंत वापरावीत यासंदर्भातल्या या काही महत्वाच्या बाबी..

१) कॉस्मॅटिक्सची एक्सपायरी डेट असते का? एखादं प्रॉडक्ट साधारण किती महिने वापरायचं आणि कधी वापरातून काढून टाकायचं?

 

कॉस्मेटिक किंवा वैयक्तिक वापराच्या प्रॉडक्टची शेल्फ लाइफ किंवा कालबाह्यता तारीख हा असा कालावधी आहे ज्या दरम्यान निर्मात्याने ( मॅन्युफॅक्चर) उत्पादनाच्या उपयुक्ततेचा वेळ तज्ज्ञांकडून ठरवलेला असतो. प्रॉडक्टवर छापलेल्या माहितीप्रमाणे कालावधी संपल्यानंतर प्रॉडक्ट वापरातून काढून टाकायचे.

२) गेल्या वर्षभरात लॉकडाऊनमुळे कमी प्रमाणात कॉस्मॅटिक्सचा वापर झाला. आता त्या वस्तूंचा पुन्हा पुन्हा महिलांकडून वापर केला जात आहे. अशात बराचवेळ पडून राहिलेलं मेकअपचं साहित्य वापरल्यामुळे त्वचेसह शरीरावर कसा परिणाम होतो?

 

अगदीच न उघडलेली त्वचेची निगा राखणारी उत्पादने ( क्रीम च्या डब्या) उघडलेल्या उत्पादनांपेक्षा जास्त काळ टिकतील कारण त्यांची बॅक्टेरियांच्या संपर्कात येण्याची शक्यता कमी आहे. विशिष्ट प्रॉडक्ट्स उघडल्या नंतर बदलू शकतात, परंतु सर्वसाधारणपणे, न उघडलेली प्रॉडक्ट्स एक ते तीन वर्षांपर्यंत टिकू शकतात. उघडल्यानंतर, आपण एका वर्षाच्या आत प्रॉडक्ट वापरावे.

नियमित मॅन्युफॅक्चरच्या सूचनांचे पालन करावे. कोणतेही मेकअप चे प्रॉडक्ट्स जर खूप दिवस पडून असतील आणि नंतर त्याचा वापर झाला तर कदाचित त्वचा , कोरडी पडू शकेल, खूप जुनी लिपस्टिक लावल्यास ओठ कोरडे पडू शकतील. कधी कधी त्वचेला इन्फेक्शन होऊ शकेल. जुन्या आयलाइनर चा वापर झाला तर कदाचित डोळ्यांना त्रास होईल. तर त्वचेवरही डाग येण्याचीही शक्यता असते.

३) मेकअपचं साहित्य हे खराब झालंय की नाही, कसं ओळखायचं?

 

लिपस्टिक वापराल्यानंतर जर ओठ ओढल्यासारखे अथवा फुटल्या सारखे झाले तर समजावे की लिपस्टिक खराब झाली आहे. खराब काजळ वापरले तर डोले लाल होतात आणि चूरचूरतात. तसेच क्लेंजिंग मिल्क अथवा लोशन खराब झाले तर त्याचा रंग थोडा बदलतो. त्याचे गुणधर्मही बदलतात आणि प्रोडक्टचा प्रभाव कमी होतो.

४) सध्या मास्कमुळे अर्ध्यापेक्षा जास्त चेहरा झाकला जातोय? मग मेकअप करायचा तरी कसा?

 

जरी मास्क मधे चेहरा झाकला जात असला तरी क्लेंजिंग , टोंनिंग , मॉईस्चरायजिंग नियमित करा. जेणे करून त्वचेचा पीएच बॅलन्स राहिल. कॉम्पॅक्ट, मूस अथवा लिक्विड फाउंडेशन चा वापर करा. मास्क घातला तरी डोळे छान दिसण्यासाठी काजळ आणि लाइनरचा वापर जरूर करु शकता. अर्थात या सर्व गोष्टी आवडीनिवडी प्रमाने करा. आयब्रोज फिनिश / डार्क करण्यासाठी छान पेन्सिलचा वापर तुम्ही करु शकता.

५) बाजारात जुन्या लिपस्टीक्स, फाऊंडेशन, हेअर कलर आवरण बदलून किंवा डिस्काऊंट देत विक्रीस काढल्या जात आहेत?

 

प्रॉडक्ट हे नेहमी चांगल्या कंपनीचे वापरा. त्याच्यावर मॅन्युफॅक्चर तसेच एक्सपायरी डेट प्रिंट आहे ना याची खात्री करा. तसेच कंपनीने प्रोडक्ट वापरायच्या सूचना ही दिलेल्या असतात. कोणत्याही चांगल्या कंपनीची डिस्काउंट देण्याची पद्धत ही खूप प्रोफेशनल असते, तीही व्यवस्थित समजून घ्या. बाजारातील रस्त्यावरच्या गाड्यांवरून प्रॉडक्ट्स घेणं टाळा.

६) स्किन केअर उत्पादनं विकत घेण्याआधी कोणती काळजी घ्यावी?

 

नेहमी आपल्या त्वचेचा प्रकार ओळखा आणि मगच प्रॉडक्ट्स निवडा. त्वचेच्या देखभालीचे टाइमटेबल तयार करा, ज्यामध्ये मेकअप रीमूव्हर/ फेस क्लीन्सर, अल्कोहोल फ्री टोनर, ट्रीटमेंट (म्हणजेच वॉटर बेस्ड सीरम), आयक्रीम, मॉइश्चरायझर, नाईट क्रीम यांचा समावेश करावा. आपण खरेदी करण्याचा विचार करीत असलेल्या उत्पादनांसाठी (सक्रिय घटक) मेन इंग्रीडीयंट हे आपल्या त्वचेच्या प्रकाराप्रमाणे वापरा. आपल्या त्वचेसाठी सर्वात चांगले काय आहे हे ठरविताना गरजेप्रमाणे तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

७) उन्हाळ्यात त्वचा जास्त तेलकट, काळी पडत असेल तर कोणत्या उत्पादनांचा वापर फायदेशीर ठरेल?

 

त्वचा काळी पडत असल्यास सन प्रोटेक्टिंग फॅक्टर ( SPF) चा ज़रूर वापर करावा. तसेच त्वचा तेलकट होत असल्यास ऑईल फ्री फेसवॉशचा वापर जरूर करावा. जसं टी ट्री, नीम , तुळस, क्यूकम्बरसारख्या फेसवॉशनं चेहरा धुवावा. फेसवॉश नंतर अस्ट्रिंजेंट जरूर वापरा.

८) रोज फेअरनेस क्रिम लावून किंवा पूर्ण मेकअप करून घराबाहेर पडणं त्वचेसाठी कितपत योग्य?

 

मेकअप करणं ही जर आपल्या प्रोफेशनची गरज असेल तर जरूर करावा आणि योग्य ती काळजी नक्की घ्यावी. मेकअप करण्याआधी आणि नंतर योग्य ती काळजी जरूर घ्यावी तसेच प्रोडक्ट चांगल्या क्वालिटीचे आणि एक्सपायरी डेट चेक करुनच वापरावेत.

 

लीना खांडेकर
फाउंडर एंड डिरेक्टर
लीज ब्यूटी सेंटर एंड स्पा , पुणे

Web Title: Skin Care tips : How to identify makeup products is Damage or good

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.