Join us

चेहऱ्यावर चमचमता ग्लो येण्यासाठी बदामाचं तेल लावावं की खोबऱ्याचं? पाहा दोन्हीतील फरक आणि फायदे..

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2025 13:58 IST

Face Oil Massage : फेस ऑइल मसाज करण्यासाठी या दोन्ही तेलांचा वापर केला जातो. पण काहींना असाही प्रश्न पडतो की, नेमकं कोणतं तेल त्वचेसाठी योग्य आहे? पाहू या दोघांचे फायदे.

Face Oil Massage : चेहरा सतेज, मुलायम आणि तजेलदार दिसावा यासाठी महिला किंवा तरूणी वेगवेगळे उपाय करत असतात. काहीजण खोबऱ्याचं तेल लावतात तर काहीजण बदामाचं तेल लावतात. फेस ऑइल मसाज करण्यासाठी या दोन्ही तेलांचा वापर केला जातो. पण काहींना असाही प्रश्न पडतो की, नेमकं कोणतं तेल त्वचेसाठी योग्य आहे? पाहू या दोघांचे फायदे.

खोबऱ्याच्या तेलातील पोषक तत्व

खोबऱ्याचं तेल अनेक वर्षांपासून त्वचेसाठी वापरलं जातंय. यात ल्यूरिक, कॅप्रिलिक आणि कॅप्रिक अ‍ॅसिडसारखे मिडियम चेन फॅटी अ‍ॅसिड्स असतात, जे त्वचेला खोलवर मॉइस्चर देतात आणि त्यांच्या अँटी-मायक्रोबियल व अँटी-ऑक्सिडंट गुणांमुळे फ्री रॅडिकल्सपासून संरक्षण करतात.

चेहऱ्यासाठी खोबऱ्याच्या तेलाचे फायदे

त्वचेला आतून हायड्रेट करतं

सूज आणि इन्फ्लमेशन कमी करतं

स्किन बॅरिअर रिपेअर करण्यात मदत करतं

डाग-चट्टे आणि स्कार्स हलके करतो

चेहऱ्याच्या स्नायूंना रिलॅक्स करतो

वेळेपूर्वी वृद्धत्व येणं टाळतो

बदामाच्या तेलातील पोषक तत्व

बदामाच्या तेलात व्हिटामिन ई, व्हिटामिन ए, फॅटी अ‍ॅसिड्स आणि झिंक असतं. हे घटक त्वचेला आतून पोषण देतात आणि नैसर्गिक चमक वाढवतात.

चेहऱ्यासाठी बदामाच्या तेलाचे फायदे

फाइन लाइन्स आणि सुरकुत्या कमी करतं

स्किन सेल्सचं उत्पादन वाढवतं

त्वचेला मॉइस्चर देऊन कोरडेपणा कमी करतं

पिंपल्स आणि जखमांच्या खूणा बऱ्या करण्यात मदत करतं

त्वचा मऊ आणि तजेलदार बनवतं

कोणतं तेल अधिक फायदेशीर?

जर तुमची त्वचा डॅमेज्ड असेल किंवा तिला हीलिंगची गरज असेल, तर बदामाचं तेल अधिक प्रभावी ठरेल. आणि जर आपल्याला चेहऱ्याचं सौंदर्य वाढवायचं असेल, सूज कमी करायची असेल किंवा डीप हायड्रेशन हवं असेल, तर खोबऱ्याचं तेल योग्य पर्याय आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Almond or Coconut Oil for Face Glow? Benefits & Differences

Web Summary : For radiant skin, almond oil heals damaged skin, reducing wrinkles. Coconut oil deeply hydrates, reduces swelling, and enhances beauty. Choose based on your skin's needs.
टॅग्स :त्वचेची काळजीब्यूटी टिप्स