जसं जसे वय वाढू लागते तसं तसे प्रत्येकाला आपण सुंदर दिसावे असे वाटते. ऋतूमानानुसार आपण आपल्या त्वचेची काळजी घेत असतो. (Nighttime skincare routine)उन्हाळा सुरु झाला की त्वचा कोरडी होणे, तेलकट किंवा चिपचिपी होते. घराबाहेर पडण्यापूर्वी आपण महागडे सनस्क्रिन आणि इतर क्रीम्सचा वापर करतो. परंतु, त्वचेची व्यवस्थित काळजी घेणे देखील गरजेचे आहे. (Golden glow cream benefits)
सुंदर दिसण्यासाठी आपण अनेक प्रकारचे महागडे क्रीम्स वापरतो. त्वचेला योग्य प्रकारे मॉइश्चरायझर मिळावा यासाठी प्रयत्न करतो. (Dark circle removal tips)हल्ली डार्क सर्कल आणि पिग्मेंटेशनच्या समस्येने अनेकजण वैतागले आहे. कितीही काही केले तरी यामुळे चेहरा खराब दिसतो.(Pigmentation treatment at home)जर आपल्याला देखील या त्रासातून जावे लागत असेल. गोल्डन ग्लो क्रीम आपण वापरु शकतो. ही क्रीम रात्री झोपण्यापूर्वी लावायला हवी. ज्यामुळे त्वचा उजळण्यास मदत होईल. (Skincare for uneven skin tone)
आता घरी झटपट बनवा तुपाचं मॉइश्चरायझर, त्वचा इतकी चमकेल की सगळे विचारतील चेहऱ्याला काय लावतेस?
ग्लोडन ग्लो क्रीम बनवण्यासाठी आपल्या केसर एका टिश्यू पेपरमध्ये घेऊन त्याची व्यवस्थित घडी घाला. तव्यावर मिनिटभर शेकवून घ्या. एका डबीत टाकून त्यात २ चमचे कोरफडीचा गर, १ चमचा बदामाचे तेल, २ व्हिटॅमिन ई कॅप्सूल आणि १ चमचा गुलाब पाणी घाला. हे मिश्रण चांगले मिक्स करुन घ्या. रोज रात्री झोपण्यापूर्वी त्वचेला लावा. यामुळे चेहऱ्यावरील डाग कमी होण्यास मदत होईल. तसेच डार्क सर्कल कमी होऊन त्वचा उजळेल. तसेच कमी वयात येणाऱ्या अकाली वृद्धत्वाचा धोका देखील टळेल.
यात असणारे केसर हे त्वचेसाठी फायदेशीर आहे. त्वचेवर असणारे डाग कमी करुन रंग उजळवते आणि त्वचेला नैसर्गिक चमक आणण्यास मदत करते. केसर त्वचेतील मेलेनिनचे उत्पादन कमी करते. ज्यामुळे त्वचेला रंग येतो. यात अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन असतात जे त्वचेला निरोगी आणि चमकदार बनवतात. आपली त्वचा कोरडी किंवा निस्तेज झाली असेल तर कोरफड त्यासाठी फायदेशीर आहे. त्वचा अतिसंवेदनशील असेल तर त्यावर कोरफडीचा गर चांगला असतो. यात क्रीममध्ये असणारे घटक त्वचेला नैसर्गिक रंग आणतात.