काजोल, करिश्मा कपूर, माधुरी दीक्षित, मलायका अरोरा, शिल्पा शेट्टी ही पन्नाशीच्या आतबाहेर असणाऱ्या अभिनेत्रींची नावं. या अभिनेत्रींकडे पाहिलं की आजही त्यांचा चेहरा तेवढाच तरुण, टवटवीत, उत्साही दिसतो. उलट काही जणांचं तर मत असंही आहे की त्या आधीपेक्षाही आताच जास्त सुंदर दिसतात. वाढत्या वयासोबत त्यांचं तारुण्य आणि सौंदर्य आणखीनच बहरून येत आहे. या मागचं कारण म्हणजे या अभिनेत्रींचं स्किन केअर रुटीन. त्या त्यांच्या चेहऱ्याला रात्री झोपण्यापुर्वी नियमितपणे रेटीनॉल लावतात. आता ते खूप महागडं असतं (Skin Care Routine of Bollywood Actresses). त्यामुळे सगळ्यांनाच परवडेल असं नाही (beauty secret of bollywood actress). म्हणूनच त्यासाठीचा एक उत्तम पर्याय म्हणून आपल्याला घरच्याघरी काय करता येऊ शकतं ते पाहूया..(how to keep skin naturally young?)
त्वचा तरुण, टवटवीत ठेवण्यासाठी उपाय
रेटीनॉल हा एक असा घटक आहे जो त्वचेला तरुण, तजेलदार ठेवण्यासाठी मदत करतो. साधारण तिशीनंतर चेहऱ्यावर बारीक सुरकुत्या येण्यास सुरुवात झालेली असते.
वेटलॉस, डाएटिंगच्या नादात स्वत:ची किडनीच तर खराब करत नाही ना? फिटनेस प्रेमींनो एकदा 'हे' वाचाच...
अशावेळी त्वचेची योग्य काळजी घेतली नाही तर त्वचा सैल पडते, सुरकुत्या वाढतात आणि चेहरा अकाली प्रौढ दिसू लागतो. हे सगळं रेटीनॉलमुळे टाळता येऊ शकतं. म्हणूनच आता घरच्याघरी रेटीनॉलसारखा त्वचेला तरुण ठेवणारा पदार्थ कसा तयार करायचा ते पाहूया..
हा उपाय fashionwithfahad या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. यामध्ये असं सांगण्यात आलं आहे की एक चमचा जवस आणि १ चमचा तांदूळ एका भांड्यामध्ये घ्या. त्यामध्ये साधारण पाऊण ते १ ग्लास पाणी घाला. आता हे दोन्ही पदार्थ गॅसवर गरम करायला ठेवा.
पाणी थोडं घट्ट झाल्यावर गॅस बंद करा आणि पाणी गाळून घ्या. गाळलेल्या पाण्यामध्ये ॲलोव्हेरा जेल, गुलाब पाणी, ग्लिसरीन हे सगळं प्रत्येकी एकेक चमचा घाला आणि व्हिटॅमिन ई च्या दोन कॅप्सूल घाला. सगळं मिश्रण हलवून एका स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवा. रोज रात्री झोपण्यापुर्वी चेहऱ्याला हे पाणी लावून हलक्या हाताने मसाज करा. काही दिवसांतच त्वचेमध्ये खूप छान बदल दिसून येईल.
