Join us

तुरटी आणि तांदळाचं पाणी म्हणजे त्वचेसाठी वरदान, खर्च १० रुपयांहून कमी, फायदे मोजू तितके कमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 14:48 IST

Rice Water And Alum Benefits : त्वचेच्या एकापेक्षा जास्त समस्या दूर करण्यासाठी केला जाणारा असाच एक उपाय म्हणजे तांदूळ आणि तुरटीचा फेसमास्क.

Rice Water And Alum Benefits : हिवाळा असो, उन्हाळा असो किंवा पावसाळा असो त्वचेसंबंधी वेगवेगळ्या समस्या नेहमीच होत राहतात. सूर्याची प्रखर किरणं, घाम, प्रदूषण, धूळ, माती यामुळे त्वचेवर रॅशेज, जळजळ, पिगमेंटेशन आणि टॅनिंग होऊ लागते. मग काय त्वचेसंबंधी या समस्या दूर करण्यासाठी आजकाल सर्रासपणे महागड्या स्किन केअर प्रॉडक्ट्सचा वापर केला जातो. तर काही महिला त्वचेची काळजी घेण्यासाठी या प्रॉडक्ट्सऐवजी घरगुती उपायांना प्राधान्य देतात. त्वचेच्या एकापेक्षा जास्त समस्या दूर करण्यासाठी केला जाणारा असाच एक उपाय म्हणजे तांदूळ आणि तुरटीचा फेसमास्क. चला तर जाणून घेऊ याचे फायदे आणि कसा तयार कराल.

त्वचेसाठी तांदळाचं पाणी आणि तुरटीचे फायदे

- तुरटी एक नॅचरल एस्ट्रिजेन्ट आहे, ज्यानं त्वचा टाइट होते आणि मोठी रोमछिद्रे छोटी केली जातात. तर तांदळाच्या पाण्यानं त्वचेला ओलावा आणि पोषण मिळतं.

- तुरटीतील अ‍ॅंटी-बॅक्टेरिअल गुण अ‍ॅक्ने निर्माण करणाऱ्या बॅक्टेरियांना नष्ट करतात. तर तांदळाचं पाणी त्वचेवर होणारी जळजळ शांत करतं.

- तांदळाच्या पाण्यातील व्हिटामिन बी3 मुळे त्वचेची रंगत वाढण्यास मदत मिळते, तर तुरटीनं त्वचेवरील डाग-चट्टे कमी होतात. तसेच त्वचेची आतपर्यंत सफाई सुद्धा होते.

- तुरटी त्वचेला टोन करण्यास आणि सुरकुत्या कमी करण्याचं काम करते. तर तांदळाचं पाणी स्किन सेल्सना रिपेअर करण्याचं काम करतं.

- तांदळाचं पाणी त्वचेला थंडावा देण्यास आणि टॅनिंग कमी करण्यास मदत करतं. तर तुरटीनं त्वचेमधील विषारी तत्व बाहेर निघतात.

- तांदळाचं पाणी आणि तुरटीचं हे मिश्रण त्वचेची आतपर्यंत सफाई करतं. तसेच त्वचेची पीएच लेव्हल संतुलित ठेवतं. इतकंच नाही तर त्वचेवरील एक्स्ट्रा ऑइलही दूर होतं.

कसं तयार कराल आणि लावाल?

चमकदार, मुलायम आणि उजळ त्वचा मिळवण्यासाठी तांदळाचं पाणी आणि तुरटीचा हा फेसमास्क तयार करणं सोपं आहे. यासाठी अर्धा कप उकडलेल्या किंवा भिजवलेल्या तांदळाचं पाणी घ्या. 1/4 छोटा चमचा तुरटीचं पावडर आणि 2 ते 3 थेंब गुलाबजल घ्या. या गोष्टी चांगल्या मिक्स करा. नंतर चेहरा चांगला धुवून घ्या आणि हा मास्क लावा. 20 मिनिटांनंतर चेहरा हलक्या थंड पाण्यानं धुवावा. हा मास्क तुम्ही आठवड्यातून 2 ते 3 वेळा लावू शकता. 

टॅग्स :त्वचेची काळजीब्यूटी टिप्स