Join us
Daily Top 2Weekly Top 5

हात पुन्हा-पुन्हा कोरडे होतात, खाजवतात? लगेच करा 'हे' सोपे उपाय, हात नेहमीच राहतील मुलायम

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 13:11 IST

Dry Hand Home Remedy : आज आम्ही आपल्याला काही नॅचरल आणि सोपे उपाय सांगणार आहोत, जे वापरून आपण हातांची त्वचा ड्राय होण्यापासून वाचवू शकता.

Dry Hand Home Remedy : थंडीच्या दिवसात थंड वारे आणि प्रदूषणामुळे त्वचेचं भरपूर नुकसान होतं. या दिवसांमध्ये त्वचा कोरडी पडणं ही तर सगळ्यात जास्त त्रास देणारी समस्या असते. चेहऱ्यासोबतच हातांची त्वचाही ड्राय होते. त्यामुळे स्लीव्हलेस ड्रेस घालण्यासही अडचण येते. अशात जर केमिकलयुक्त प्रॉडक्ट्स वापरले तर त्वचा आणखी डॅमेज होते. त्यामुळे आज आम्ही आपल्याला काही नॅचरल आणि सोपे उपाय सांगणार आहोत, जे वापरून आपण हातांची त्वचा ड्राय होण्यापासून वाचवू शकता.

ग्लिसरीन

ग्लिसरीन हे एक थोडं चिकट असं लीक्वीड असतं. याची टेस्ट गोडसर असते, पण केमिकलबाबत सांगायचं तर ग्लिसरीन हे एक ट्राय हायड्रोक्सी शुगर अल्कोहोल आहे. याने आपली त्वचा रिपेअर करणे आणि जास्त वेळ मुलायम ठेवण्यास मदत मिळते. पण हे थेट त्वचेवर लावल्यास सेन्सिटिव्ह स्किन असणाऱ्यांना इरिटेशन होऊ शकते. त्यामुळे हे त्वचेवर लावताना एखाद्या तेलात किंवा लोशनमध्ये मिक्स करूनच लावावं. असं केल्यास दिवसभर हातांना ड्रायनेस जाणवणार नाही.

थिक मॉइश्चरायजर

आजकाल बाजारामध्ये मॉइश्चरायजर आणि लोशन मिळतात. जे स्किन टाइपच्या हिशेबाने बनवलेले असतात. कदाचित आपण वापरत असलेलं लोशन ऑयली स्किन असणाऱ्यांसाठी बनवलेलं असेल. ज्यामुळे आपली स्किन लवकर ड्राय होत असेल. क्रीमी लोशन फार लवकर त्वचेवरून उडतात. त्यामुळे आपण अशा मॉइश्चरायजरचा वापर करा जे तुमच्या त्वचेला मुलायम ठेवेल. जे त्वचेत आतपर्यंत जाईल आणि जास्त वेळ स्किन हायड्रेट राहील.

भरपूर पाणी प्या

हिवाळ्यात भरपूर लोक हीच चूक करतात की, पाणी कमी पितात. यामुळे हिवाळ्यात डिहायड्रेशनचा धोका अधिक वाढत असतो. जर आपल्याला पाणी पिण्याचं मन नसेल तर कमीत कमी इतर लीक्वीडचं प्रमाण वाढवा. आपण नारळ पाणी, भाज्यांचे ज्यूस, सूप पिऊ शकता. या सगळ्या गोष्टी आपलं शरीर आणि त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी मदत करतात. सोबतच भरपूर पाणी सुद्धा प्या.

तेल आणि लोशन

काही लोक त्वचेवर तेल लावतात तर काही लोक लोशनचा वापर करतात. या गोष्टी वेगवेगळ्या लावून फारसा प्रभाव पडत नाही. त्यामुळे त्वचा ड्राय होणं सुरू होते. पण तेच जर आपण लोशनमध्ये थोडं खोबऱ्याचं तेल मिक्स करून लावलं तर तेल त्वचेच्या आतपर्यंत जातं आणि त्वचा जास्त वेळ हायड्रेट राहते.

English
हिंदी सारांश
Web Title : Dry, Itchy Hands? Quick Home Remedies for Soft, Hydrated Skin

Web Summary : Combat dry hands with glycerin, thick moisturizers, and ample hydration. Mix coconut oil with lotion for deeper moisturization. These simple remedies keep hands soft and hydrated, especially during colder months.
टॅग्स :त्वचेची काळजीथंडीत त्वचेची काळजीब्यूटी टिप्स