Beauty Tips : जास्तीत जास्त महिलांसाठी, तरूणींसाठी आणि लहान मुलींसाठी लिपस्टिक ही गोष्ट मनाच्या खूप जवळची असते. चेहऱ्याचं सौंदर्य खुलवण्यासाठी वेगवेगळ्या शेड्सचे लिपस्टिक वापरले जातात. लिपस्टिक महिलांच्या मेकअप रूटीनचा महत्वाचा भाग आहे. मग ते ऑफिसला जायचं असो, इव्हेंटला जायचं असो किंवा लग्नाला जायचं असो. लिपस्टिकमुळे सौंदर्यात भर पडतेच पडते.
लिपस्टिकनं आपलं सौंदर्य आणखी खुलतं हे नक्कीच आहे. पण अनेकांना हे माहीत नसतं की, रोज लिपस्टिक लावल्यानं त्वचेसोबतच आरोग्याचं मोठं नुकसान (Lipstick Daily Side Effects) होऊ शकतं. कारण लिपस्टिकमध्ये वेगवेगळे केमिकल्स असतात. जे घातकही ठरू शकतात. आज आपण हेच पाहणार आहोत की, रोज लिपस्टिक लावल्यानं काय काय नुकसान होऊ शकतात.
ड्रायनेस
जर आपण रोज आणि दिवसभर आपल्या नाजूक ओठांवर लिपस्टिक लावून ठेवत असाल यातील केमिकलमुळे त्वचेचं नुकसान होऊ शकतं. असं केल्यास ओठ ड्राय होऊ शकतात. सोबतच जळजळ आणि ओठ फाटण्याचीही समस्या होऊ शकते.
हॉमोन असंतुलन
आपल्याला माहीत नसेल की, जास्तीत जास्त लिपस्टिकमध्ये जास्तकरून लेड आढळतं. अशात जर आपण रोज लिपस्टिक लावत असाल तर हे तत्व शरीरात हळूहळू जमा होऊ लागतं. ज्यामुळे हार्मोन्सचं संतुलन बिघडतं आणि प्रजननासंबंधी समस्या होऊ शकतात. तसेच मेंदूच्या विकासावरही प्रभाव पडतो.
रंगामध्ये बदल
लिपस्टिकमध्ये वेगवेगळे केमिकल्स असतात, हे वर आपण पाहिलं आहेच. त्यामुळे याचा वापर रोज केला तर ओठांचा नॅचरल रंग कमी होऊ शकतो. ओठांचा नॅचरल गुलाबी रंग नाहीसा होऊ शकतो.
गंभीर आजाराचा धोका
लिपस्टिकमध्ये पॅराबेन्स कॅडमिअम आणि क्रोमिअमसारखे केमिकल्स असतात. हे तत्व कॅन्सर सेल्स वाढवण्यास मदत करू शकतात. रोज लिपस्टिक लावल्यास ते आपल्या शरीरात जमा होतं आणि त्यामुळे आजारांचा धोका वाढतो. इतकंच नाही तर आपल्याला पचनासंबंधी समस्याही होऊ शकतात.
काय काळजी घ्याल?
रोज लिपस्टिक लावणं टाळा.
लिपस्टिक लावण्याआधी एक्सपायरी डेट पाहा.
ओठांवर पुन्हा पुन्हा जीभ लावू नका.
लिपस्टिक लावल्यावर स्मोक करणं टाळा.
लिपस्टिक लावल्यावर जास्त वेळ उन्हात थांबू नका.
लिपस्टिक घेण्याआधी त्यावर कन्टेन्ट वाचा.