Lokmat Sakhi >Beauty > आंघोळ करताना साबण वापरावा की शॉवर जेल? त्वचा कशाने जास्त होते खराब, पाहा आंघोळ कशाने करावी ..

आंघोळ करताना साबण वापरावा की शॉवर जेल? त्वचा कशाने जास्त होते खराब, पाहा आंघोळ कशाने करावी ..

Should you use soap or shower gel? Which is better for your health? : त्वचेसाठी काय चांगले? पाहा नक्की कोणते प्रॉडक्ट वापरणे ठरेल फायद्याचे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2025 14:38 IST2025-05-05T13:14:22+5:302025-05-05T14:38:37+5:30

Should you use soap or shower gel? Which is better for your health? : त्वचेसाठी काय चांगले? पाहा नक्की कोणते प्रॉडक्ट वापरणे ठरेल फायद्याचे.

Should you use soap or shower gel? Which is better for your health? | आंघोळ करताना साबण वापरावा की शॉवर जेल? त्वचा कशाने जास्त होते खराब, पाहा आंघोळ कशाने करावी ..

आंघोळ करताना साबण वापरावा की शॉवर जेल? त्वचा कशाने जास्त होते खराब, पाहा आंघोळ कशाने करावी ..

सकाळी उठल्यावर, बाहेरून आल्यावर, फार थकवा आला असेल तर मस्त तरोताजे होण्यासाठी आपण अंघोळ करतो.(Should you use soap or shower gel?  Which is better for your health? ) अंघोळ केल्यावर अगदी छान प्रसन्न वाटते. उन्हाळ्यामध्ये तर एकदा काय आणि दोनदा काय सतत अंघोळ करतच राहावी असे वाटते. छान गार पाणी अंगावर पडल्यावर मन प्रफुल्लित होते. पावसाळा व हिवाळा आला की छान गरम पाण्याने अंघोळ केल्यावर तरतरी येते. एकंदरीत काय कोणताही ऋतू असो कायम अंघोळ केल्यावर फ्रेश वाटते. अंघोळ करताना आपण साबण वापरतो. (Should you use soap or shower gel?  Which is better for your health? )शरीराला सुगंध यावा म्हणून साबण वापरला जातोच मात्र शरीर नुसत्या पाण्याने साफ होत नाही त्यासाठी इतरही प्रॉडक्ट्सची गरज असते. 

साबण घरोघरी वापरला जातो. विविध प्रकार त्यात असतात. तसेच शॉवर जेललासुद्धा आजकाल मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. मात्र साबणा एवढी मागणी जेलला नाही. साबण सगळीकडे आरामात उपलब्ध होतो. अगदी १० रुपयांचा साबणही मिळतो आणि खुप महाग साबणही मिळतो. विविध रंगाचे सुगंधाचे फ्लेवरचे साबण मिळतात. त्यामुळे त्याला मागणी जास्त आहे. साबणापेक्षा शॉवर जेल महाग असते. त्यामुळे ते फार लोकप्रिय नाही. शॉवर जेल १८०० च्या सुमारास बाजारात आले. डॉ. दिपाली भारद्वाज या एक डर्मेटॉलॉजिस्ट आहेत त्यांनी सांगितल्यानुसार, शॉवर जेलमध्ये मॉइश्चराइझर असते. त्वचेला डायड्रेटेड ठेवण्यासाठी शॉवर जेल फायद्याचे ठरते. त्यामध्ये विविध गुणधर्म असतात.      

सगळेच साबण चांगले असतात असे नाही. मात्र काही साबण त्वचेसाठी फायद्याचे ठरतात तर काही त्वचा खराब करतात. सुगंध असतो त्वचा दिसतेही छान मात्र पोषण मिळत नाही. काही चांगल्या साबणांची एचपी पातळी ५.५ पर्यंत असते जी त्वचेच्या आसपास असल्याने हानिकारक ठरत नाही. मात्र काहींची एचपी लेवल संतुलित नसते. 

घरी अनेक सदस्य राहतात. त्यामुळे अंघोळीला सारखाच साबण वापरला जातो. एकाहून जास्त लोक एकत्र राहतात तेव्हा साबणापेक्षा शॉवर जेल वापरणे जास्त फायद्याचे ठरते. साबण चांगला की शॉवर जेल हे तुमच्य त्वचेचा पोत ठरवेल. त्यामुळे साबणाबद्दल माहिती मिळवा त्वचेची ठेवण जाणून घ्या. स्वस्त मिळतो म्हणून साबण वापरणे धोक्याचे ठरू शकते.

Web Title: Should you use soap or shower gel? Which is better for your health?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.