आजकाल बाजारात डिटॅनिंगचा म्हटले की असंख्य क्रीम्स, स्क्रब्स, मास्क, सीरम सहज मिळतात. त्वचा गडद होणं, उन्हामुळे झालेला टॅन ही नैसर्गिक प्रक्रिया असली तरी डिटॅन हा शब्द इतका प्रसिद्ध झाला आहे की प्रत्येक जण एकदम झटपट उजळपणा मिळवण्याच्या मागे लागलेला दिसतो. (Should you use detanning products or not? Try these 5 home remedies to keep your skin beautiful and clean)पण खरोखरच हे प्रॉडक्ट्स वापरावेत का? की त्वचा तिच्या नैसर्गिक पद्धतीनेच साफ करावी? हा प्रश्न अनेकांना पडतो.
बाजारातील डिटॅन प्रॉडक्ट्स किती सुरक्षित?
काही चांगल्या कंपन्यांचे डिटॅन प्रॉडक्ट्स खरंच हलका उजळपणा देतात, पण ते परिणाम तात्पुरते ठरु शकतात. या उत्पादनांमध्ये केमिकल्स, अॅक्टिव अॅसिड्स आणि ब्लीच आधारित घटक असण्याची शक्यता असते. सुरुवातीला त्वचा मऊ, स्वच्छ दिसते पण सतत वापर केल्यास कोरडेपणा, लालसरपणा किंवा संवेदनशीलता निर्माण होऊ शकते. सर्वात मोठी समस्या अशी की हे प्रॉडक्ट्स त्वचेचा नैसर्गिक ऑइल-बॅलन्स बिघडवतात. काही लोकांना तर सनबर्न असताना लगेच डिटॅन लावण्याची सवय असते.
टॅन होणे अगदी सामान्य गोष्ट आहे. सूर्यकिरणांतील UV नुकसानापासून त्वचा स्वत:ला वाचवण्यासाठी गडद होते. त्यामुळे टॅन बसणे ही रोग नसून एक नैसर्गिक, सुरक्षित प्रक्रिया आहे. टॅन काढण्यासाठी त्वचेवर अति उपचार करणे कधीही योग्य नाही. त्यामुळे त्वचेची काळजी घेण्याचा हेतू ठेवावा. त्वचा घासून गोरी होत नाही. त्यामुळे तसे
नैसर्गिकरित्या डिटॅनिंग – सर्वात सुरक्षित आणि सोपा उपाय
डिटॅनसाठी सर्वात चांगला मार्ग म्हणजे घरगुती, साधेपण प्रभावी उपाय. दररोज थोडा वेळ दिला तरी त्वचा हळूहळू उजळते, शांत होते आणि तिची चमक नैसर्गिक राहते.
१. दही हे नैसर्गिक लॅक्टिक अॅसिडचा स्रोत आहे. चेहऱ्यावर थोडे दही लावून दहा मिनिटांनी धुतल्यास टॅन मऊपणे हलका होत जातो. हे त्वचेची आर्द्रता टिकवून ठेवते.
२
. ताज्या कोरफडीचा अर्क सूर्यामुळे खराब झालेल्या त्वचेला थंडावा देतो. दररोज रात्री कोरफड लावल्याने गडद झालेले भाग हळूहळू फीका होतो.
३. टोमॅटोतील लाइकोपीन त्वचा शांत करतं. उन्हामुळे लालसरपणा किंवा दाह असेल तर टोमॅटोचा पल्प अगदी सौम्यपणे काम करतो. चेहऱ्यावर ५ ते ७ मिनिटे लावला तरी तजेला मिळतो.
४. सौम्य डिटॅनिंगसाठी बेसन अतिशय उपयुक्त असते. हे मृत त्वचेच्या पेशी दूर करते आणि त्वचेला हलका उजळपणा देते. बेसन अगदी मस्त उपाय आहे.
५. बटाटा हलक्या स्वरुपात सेल रिजनरेशन वाढवतो. चपलेचे डाग, सूर्यामुळे आलेली काळसर छटा कमी करण्यास मदत करतो.
काळजी घेण्यासारख्या गोष्टी
डिटॅन कोणताही असो केमिकल किंवा नैसर्गिक सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणजे सनस्क्रीन. तुम्ही रोज कितीही नैसर्गिक पॅक लावले तरी सनस्क्रीन नसेल तर टॅन पुन्हा-पुन्हा येतच राहतो. त्यातही SPF ३० किंवा ५० असा ब्रॉड स्पेक्ट्रम संरक्षण असलेला सनस्क्रीन वापरणे नेहमी फायदेशीर ठरते.
नैसर्गिक उपाय चांगले का?
नैसर्गिक उपाय हळू काम करतात, पण ते त्वचेवर अतिरिक्त ताण आणत नाहीत. चेहर्यावरची मऊपणा, ओलावा आणि चमक टिकून राहते. यामुळे त्वचेचं हेल्थ आणि रंग दोन्ही सातत्याने सुधारतात. शरीराला काहीतरी मॅजिक क्रीमची गरज नसते, त्वचेची नैसर्गिक प्रक्रिया चालू राहते.
