Anti Ageing Treatment : अभिनेत्री शेफाली जरीवालाचं (Shefali Jariwala) कार्डियाक अरेस्टमुळे नुकतंच निधन झालं. इतक्या कमी वयात अशाप्रकारे तिचा जीव हे सगळ्यांसाठीच धक्कादायक ठरत आहे. शेफालीच्या मृत्यूच्या कारणांबाबत वेगवेगळी सुरू असल्याचं बघायला मिळत आहे. शेफालीचा जीव ती घेत असलेल्या अॅंटी-एजिंग ट्रिटमेंटमुळेही गेला असल्याचं बोललं जात आहे. अशात ही अॅंटी-एजिंग ट्रिटमेंट काय आहे हे जाणून घेणं महत्वाचं ठरतं.
सामान्यपणे जसजसं वय वाढत जातं आपली त्वचा सुद्धा म्हातारी होते. ही एक नॅचरल प्रोसेस आहे. वाढत्या वयासोबत त्वचेचा रंग, टेक्स्चर यातही बदल होते. तशी तर वाढत्या वयासोबत त्वचेवर म्हातारपणाची लक्षणं दिसणं सामान्य आहे. पण आजकाल लोक कमी वयातच स्किन एजिंगचे शिकार होत आहेत. म्हणजे कमी वयातच म्हातारे दिसू लागत आहेत.
स्किन एजिंगची कारणं वेगवेगळी असू शकतात. अशात यासाठी ट्रिटमेंट करण्याआधी योग्य कारणं माहीत असणं गरजेचं ठरतं. त्यानंतरच अॅंटी-एजिंग ट्रिक्स, घरगुती उपाय आणि मेडिकल ट्रिटमेंट करून वाढत्या वयाची लक्षणं कमी करता येऊ शकतात.
अॅंटी-एजिंग काय आहे?
अॅंटी-एजिंगचा अर्थ चेहऱ्या दिसणारी वाढत्या वयाची लक्षणं कमी रोखणं, ज्यात फाइन लाइन सगळ्यात सुरूवातीचे संकेत असतात. अॅंटी-एजिंग ट्रिटमेंटच्या माध्यमातून त्वचा डॅमेज होण्यापासून रोखणे आणि कोलेजनचं उत्पादन वाढवणे यांसारख्या गोष्टींवर अधिक लक्ष दिलं जातं. जेणेकरून त्वचा तरूण आणि सुंदर दिसावी.
स्किन एजिंगची कारणं
वय वाढत असताना अंतर्गत रूपानेही शरीरात अनेक बदल होतात, जसे की, मेटाबॉलिज्म स्लो होणं, हार्मोनल परिवर्तन किंवा आनुवांशिक कारण. या सगळ्या गोष्टींचा प्रभाव त्वचेवर पडतो. त्याशिवाय वाढत्या वयात त्वचेतील कोलेजन कमी होतं. कोलेजन एकप्रकारचं प्रोटीन आहे, जे त्वचेमध्ये लवचिकता कायम ठेवतं. हे कमी झालं तर त्वचेवर सुरकुत्या पडू लागतात.पर्यावरणात बदल आणि खराब लाइफस्टाईमुळे त्वचा लवकर म्हातारी दिसू लागते. जास्त वेळ उन्हात राहणं, धुम्रपान, वायू प्रदूषण, आहारात पोषणाची कमतरता, पुरेशी आणि चांगली झोप न घेणं यांसारख्या गोष्टींमुळेही त्वचा लवकर म्हातारी होते.
अॅंटी-एजिंग ट्रिटमेंट
टॉपिकल रेटिनोइड्स
प्रिस्क्रिप्शनमध्ये लिहिलेले रेटनॉइड्स जसे की, ट्रिटिनॉइन आणि ओव्हर-द-काऊंटर रेटिनॉल क्रीम कोलेजन उत्पादन वाढवण्यास मदत करतात. हे रेटिनॉइड्स वाढत्या वयाचे संकेत, फाइन लाईन आणि सुरकुत्या कमी करण्यास मदत करतात.
बोटुलिनम टॉक्सिन (बोटोक्स)
बोटोक्स इंजेक्शननं चेहऱ्या स्नायू टाइट होतात, ज्यामुळे सुरकुत्या दिसणं कमी होतं. यानं त्वचा चमकदार आणि तरूण दिसते.
डर्मा फिलर्स
हायलूरोनिक अॅसिड किंवा कोलेजनयुक्त इंजेक्टेबल डर्मा फिलर्स त्वचेला प्लम्प करतात. ज्यामुळे त्वचेवरील सुरकुत्या कमी होतात.
केमिकल पील
काही गोळ्यामध्ये त्वचेवर केमिकल लिक्विडचा वापर केला जातो, ज्यामुळे त्वचेवरील डेड स्किन निघून जाते आणि त्वचा चमकदार दिसते. यानं हायपरपिग्मेंटेश कंट्रोल केलं जातं आणि त्वचेची रंगत वाढते.
त्वचा नेहमीच तरूण दिसण्यासाठी केल्या जाणाऱ्या या ट्रिटमेंटसाठी किती खर्च येतो? असा प्रश्न तुम्हाला पडला असेलच. तर या ट्रिटमेंटच्या एका सेशनसाठी ५ हजार रूपये ते १ लाख रूपये इतका खर्च येतो.
ट्रिटमेंटचे दुष्परिणाम
त्वचा तरूण दिसण्यासाठी या वेगवेगळ्या ट्रिटमेंट केल्यास अॅलर्जिक रिअॅक्शन, इन्फेक्शन आणि व्हिजनमध्ये बदल असे साइड इफेक्ट्स होऊ शकतात.