थंडीच्या (Winter Hair Care Tips) दिवसांत थंड हवा आणि वातावरणातील बदलांमुळे केस खराब होतात. जर तुमचे केस कोरडे, रुक्ष झाले असतील तर केस गळण्याची समस्या अधिकच वाढू शकते. काही घरगुती उपाय करून तुम्ही केसांचं गळणं थांबवू शकता. यात काही प्राकृतिक तत्त्वांचा समावेश आहे. (Beauty Tips)
ज्यामुळे केस गळतीची समस्या टाळण्यास मदत होते. सौंदर्य तज्ज्ञ शहनाज हुसैन यांनी काही खास उपाय सांगितले आहेत. हे उपाय करून हिवाळ्याच्या दिवसांतही हेल्दी, निरोगी केस ठेवू शकता. केसांची काळजी कशी घ्यावी जेणेकरून ते कोरडे, रुक्ष होणार नाहीत समजून घेऊ. (Shahnaz Hussain Winter Hair Care Tips How To care Freezy Hairs In Winters Freezy Hairs)
हिवाळ्यात केस कोरडे होऊ नयेत म्हणून काय लावावं?
केस कोरडे झाले असतील तर डिप कंडीशनिंग ट्रिटमेंटची गरज असते. ज्यात अर्गन ऑईल, नारळाचं तेल, ऑलिव्ह ऑईल यांचा समावेश आहे. डिप कंडिशनिंग हेअर मास्क तयार करण्यासाठी एवाकॅडो, मध, ऑलिव्ह ऑईल एकत्र मिसळा. 30 मिनिटं तसंच लावलेलं राहू द्या नंतर धुवून टाका.
केसांना पोषण मिळण्यासाठी 2 मोठे चमचे नारळाचं तेल आणि मध मिसळून घ्या. ज्यामुळे कोरडेपणा दूर होईल. 2 मोठे चमचे जेल तीन मोठे चमचे दह्यासोबत मिसळून घ्या आणि केसांना लावा. ज्यामुळे स्काल्पला भरपूर मॉईश्चर मिळेल. (Ref)
केसांची काळजी घेण्यासाठी तुम्ही कोणताही मास्क केसांवर लावाल तो डोक्यापासून टिपपर्यंत व्यवस्थित लावा. हा मास्क 30 मिनिटं लावलेला राहू द्या. नंतर माईल्ड शॅम्पूनं केस धुवा आणि कंडिशनरचा वापर करा. ज्यामुळे केसांचं नुकसान होणार नाही. केसांवर डिटँगल हेअर सिरमचा वापर कमी प्रमाणात करू शकता.
थंडीत केस कोरडे होऊ नयेत म्हणून काय करावं?
सतत केस धुणं टाळा. आठवड्यातून कमीत कमी २ किंवा १ वेळा केस धुवा. ज्यामुळे केसांचे प्राकृतिक संतुलन टिकून राहण्यास मदत होईल. केसांवर वारंवार हिटींग टुल्सचा वापर करू नका. कारण याच्या वापरानं केसाचं नुकसान होऊ शकतं.
केसांना नेहमी ब्लो ड्राय करा. केसांवर हिट प्रोटोक्शन स्प्रेचा वापरही करू शकता, केसांसाठी लिव्ह-इन हेअर कंडिशनर किंवा सिरमचा वापर केल्यास केस मऊ राहण्यास मदत होते. ज्यामुळे स्काल्प कोरडा होत नाही.
केस धुतल्यानंतर जोजोबा किंवा आर्गन ऑईलचा वापर करा. हे तेल हलक्या फॉर्म्यूल्यासकट असते ज्यामुळे केस चिकट होत नाही, चमकदार आणि व्यवस्थित बनतात. केस न तुटता विंचरण्यासाठी बारीक दातांचा कंगवा वापरणं टाळा. जाड दातांचा कंगवा वापरा. केसांमधून पाणी काढण्यासाठी जोरानं रगडण्यापेक्षा हलक्या हातानं केस सुकवा.
