हिवाळ्याच्या (Winter Skin Care Tips) दिवसांत त्वचेवर बऱ्याच सुरकुत्या येतात. ज्यामुळे सुंदरतेवर याचा परीणाम दिसून येतो. काही लोक सुरकुत्या लपवण्यासाठी लोक वेगवेगळ्या ब्युटी प्रोडक्ट्सचा वापर करतात. पण तरीही चांगला परीणाम दिसून येत नाही. काही घरगुती उपाय करून तुम्ही सुरकुत्या कमी करू शकता. ब्युटी एक्सपर्ट शहनाज हुसैन यांनी काही घरगुती उपाय सांगितले आहेत.
शहनाज हुसैन सांगतात की, हिवाळ्यात हवेत मॉईश्चर असते. ज्यामुळे त्वचा रुक्ष आणि कोरडी होते. याव्यतिरिक्त हिवाळ्यात सुर्याची किरणं कमी तीव्र असतात ज्याचा परीणाम त्वचेवर होतो आणि त्वचेवर टॅनिंग, काळे डाग येतात. (Shahnaz Hussain Skin Care Tips Why Do Wrinkles Increase On Face in Winter How To Reduce Them)
हिवाळ्याच्या दिवसांत सुरकुत्या कमी करण्यासाठी काही उपाय करायला हवेत. त्वचा कोरडी पडल्यास काही सोपे उपाय करून तुम्ही त्वचेवरचे डाग काढून टाकू शकता. पिग्मेंटेशन, सुरकुत्या वाढू शकता. शहनाज हुसैन यांच्यामते हिवाळ्याच्या दिवसांत त्वचा चमकदार, हेल्दी ठेवण्यासाठी चंदन, हळद, गुलाब जल आणि एलोवेरा यांसारख्या प्राकृतिक तत्वांचा वापर केला जाऊ शकतो. ज्यामुळे त्वचेला नैसर्गिक पोषण आणि गारवा मिळेल.
मध आणि लिंबू
मीठ आणि लिंबू त्वचेसाठी फायदेशीर ठरतं. मध आणि लिंबांचं मिश्रण डाग, सुरकुत्या कमी करण्यास मदत करते. याव्यतिरिक्त आवळा, डाळींब, सिजनल फळांचे सेवन केल्यानं त्वचेला आतून पोषण मिळतं.
एलोवेरा जेल
हिवाळ्याच्या दिवसांत तुम्ही एलोवेरा जेलचा वापर करू शकता. एलोवेरा जेल चेहऱ्यावर १५ ते २० मिनिटं लावून ठेवा. कोमट पाण्यानं धुवून घ्या. ज्यामुळे त्वचा हायड्रेट राहील आणि सूज कमी होईल. हिवाळ्याच्या दिवसांत याच्या वापरानं त्वचेला बरेच फायदे मिळतील.
चंदन आणि हळद
त्वचा चांगली ठेवण्यासाठी चंदन आणि हळदीचा वापर करा. ज्यामुळे रंग उजळतो, सुरकुत्या कमी होतात. हळद आणि चंदनाचा फेस पॅक लावलल्यानं पिंपल्स आणि डागांची समस्या कमी होते.
