Join us

चेहरा काळपट दिसतोय? शहनाज हुसैन सांगतात ५ घरगुती फेसपॅक लावा, चमकेल चेहरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2025 13:53 IST

Shahnaz Hussain says apply 5 homemade face packs : चेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी जास्त खर्च करण्याची काहीच गरज नाही.

दिवाळीच्या (Diwali 2025) सणाची प्रत्येकजण आतुरतेनं वाट पाहत असतो. दिवाळीच्या दिवशी सुंदर दिसण्यासाठी फेशियल, ब्लीच फेशियल सगळेजण करतात ज्यामुळे चेहऱ्यावर ग्लो येतो. चेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी बाजारातील महागड्या क्रिम्स वापरण्यापेक्षा तुम्ही घरगुती उपाय करू शकता. चेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी जास्त खर्च करण्याची काहीच गरज नाही. प्रसिद्ध ब्युटी एक्सपर्ट् शहनाज हुसैन यांनी ५ होममेड फेस पॅक सांगितले आहेत. ज्यामुळे चेहऱ्यावर ग्लो येईल आणि तुम्ही सुंदर दिसाल. (Shahnaz Hussain says apply 5 homemade face packs your face will glow Festive Glow Tips)

१) हळद आणि दह्याचा फेस पॅक

दिवाळीच्या आधी स्किन सॉफ्ट आणि ग्लोईंग करण्यासाठी हा फेस पॅक लावा. यासाठी हळद, दही मिसळून एक लेप तयार करा आणि १५ मिनिटं ठेवून व्यवस्थित धुवून घ्या. रोज हा पॅक लावल्यानं चेहऱ्यावर एकदम ग्लो येतो आणि चेहरा फ्रेश राहतो. 

२) लिंबू आणि काकडीचा रस

ब्युटी एक्सपर्ट्स शहनाज हुसैन सांगतात की लिंबू आणि काकडीचा रस दूधात मिसळून चेहऱ्यावर लावा. ही दोन्ही मिश्रणं चेहऱ्यावर लावा आणि १५ मिनिटांनी चेहरा स्वच्छ धुवून घ्या. ज्यामुळे स्किन कॉम्पलेक्शन ब्राईट होते आणि चेहरा चमकू लागतो. 

३) डाग कमी होतात

जर तुमच्या चेहऱ्यावर डाग असतील तर तुमच्या सुंदरतेवर याचा परीणाम होऊ शकतो. शहनाज सांगतात की घरगुती फेसपॅक तुमचं काम सोपं  करेल. यासाठी २ चमचे लिंबाचा रस आणि १ चमचा मधाचा लेप तयार करून चेहऱ्यावर लावा.  २० मिनिटांनी चेहरा स्वच्छ धुवा. ज्यामुळे चेहऱ्यावरचे डाग कमी होण्यास मदत होईल.

दिवाळीसाठी घ्या राजेशाही चंद्रकोर पैठणी; १० अप्रतिम रंग-मोराच्या नक्षीचं ब्लाऊज सुंदर दिसेल

४) चंदनाचा फेसपॅक

दिवाळीच्या आधी त्वचा ग्लोईंग बनवण्यासाठी चंदनाचा फेसपॅक लावू शकता. हा फेस पॅक लावण्याच्या  १५ मिनिटांनी चेहरा स्वच्छ धुवा. यामुळे चेहरा चमकदार दिसतो आणि पिंपल्सपासून आराम मिळतो. 

दिवाळीसाठी खरेदी करा खास कलांजली पैठणी; १० सुंदर रंग- ब्लाऊजवर आरी वर्क उठून दिसेल

५) टोमॅटोचा रस आणि दही

जर तुमची त्वचा तेलकट असेल आणि फेस्टिव्ह सिजनमध्ये तुम्हाला ग्लोईंग चेहरा हवा असेल तर तुम्ही या फेस पॅकचा वापर करू शकता. यासाठी दही, टोमॅटोचा रस यांचा एक लेप तयार करून चेहऱ्यावर लावा. ही पेस्ट आपल्या चेहऱ्यावर १५ मिनिटं राहूद्या नंतर चेहरा धुवून घ्या. या उपायानं चेहरा ग्लोईंग आणि शायनी दिसेल. 

English
हिंदी सारांश
Web Title : Dull face? Shahnaz Hussain's 5 homemade face packs for glowing skin.

Web Summary : Want glowing skin for Diwali? Shahnaz Hussain suggests homemade face packs using ingredients like turmeric, yogurt, lemon, cucumber, sandalwood, tomato, and honey. These simple remedies promise a radiant complexion.
टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी