सणासुधीला चेहरा सुंदर दिसावा, चेहऱ्यावर डाग, टॅनिंग राहू नये असं प्रत्येकालाच वाटतं. त्याासाठी ब्लीच, फेशियलपासून सर्व काही करण्याची लोकांची तयारी असते. चेहऱ्यावरचं टॅनिंग निघून चेहरा सुंदर दिसावा यासाठी सौंदर्यतज्ज्ञ शहनाज हुसैन यांनी काही सोप्या टिप्स सांगितल्या आहेत ( Shahnaz Hussain Beauty Tips). शहनाज हुसैन यांच्यामते बाहेरची महागडी उत्पादनं वापरण्यापेक्षा तुम्ही घरगुती पदार्थांचा वापर केला तर चेहरा नॅच्युरली ग्लो होण्यास मदत होईल. (Apply 3 homemade face packs you will look beautiful on Dussehra)
दही आणि मध
ग्लोईंग त्वचेसाठी तुम्ही दही आणि मधाचा फेसपॅक वापरू शकता. मध आणि दह्याचा फेस मास्क व्यवस्थित मिक्स करून घ्या. नंतर हा मास्क चेहऱ्यावर लावा. २० मिनिटांनी चेहरा पाण्यानं व्यवस्थित धुवून घ्या. हा मास्क लावल्यानंतर त्वचा सॉफ्ट होईल (Ref). दही आणि मधाच्या वापरानं स्किन टॅनिंन निघून जाण्यासही मदत होईल.
कपाटातल्या जुन्या साडीचा शिवा सुंदर वनपीस; १० वनपीस डिजाईन्स-युनिक लूक मिळेल
जास्वंदाच्या फुलांचा मास्क
त्वचेवर तेज येण्यासाठी तुम्ही जास्वंदाच्या फुलांचा वापर करू शकता. हा फेस मास्क तयार करण्यासाठी जास्वंदाची फुलं रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा. सकाळी फुलं काढून बारीक करून घ्या. नंतर मिक्सरमध्ये घालून याची पेस्ट बनवा. नंतर ही पेस्ट चेहऱ्याला लावा. पॅक सुकल्यानंतर चेहरा धुवून टाका.
एवोकाडो
त्वचेला पोषण देण्यासाठी एवोकाडोचा वापर करू शकता. एवोकाडे आणि एलोवेरा जेल मिसळून चेहऱ्यावर लावा. २० मिनिटांनी चेहरा पाण्यानं स्वच्छ धुवा. ही पेस्ट तयार करण्यासाठी कच्च एवाकॅडोचा वापर करा. एवोकॅडोमधील एंटी ऑक्सिडेंट्स वाढत्या वयवाढीला संथ करतात.
रोजचं स्किन केअर रूटीन कसं असावं?
दिवसातून किमान दोनदा चेहरा धुवा. रात्री झोपण्यापूर्वी मेकअप आणि प्रदूषणाची घाण काढणे आवश्यक आहे. चेहरा स्वच्छ केल्यावर थंड गुलाबपाण्याने टोनिंग करा. हे त्वचेचे पीएच संतुलन राखते.
त्वचेच्या गरजेनुसार आठवड्यातून 2-3 वेळा फेस मास्क वापरा. त्वचेला पुरेसा ओलावा देण्यासाठी नारळाचे तेल किंवा बदाम तेल रात्री लावू शकता.
कोण सांगतं रात्री वरण-भात खाऊन पोट सुटतं? या पद्धतीनं वरण-भात खा, १ इंचही पोट सुटणार नाही
शहनाज हुसैन सांगतात की, चमकणारी त्वचा मिळवण्यासाठी रसायने टाळून नैसर्गिक घटकांचा वापर करणे आणि त्वचेची नियमित काळजी घेणे महत्त्वाचे आहे.