lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Beauty > Shahnaz Husain Tips For Summer Makeup : घामामुळे मेकअप लगेच खराब होतो? उन्हाळ्यात लग्नाला जाताना मेकअप टिकवण्यासाठी शहनाज हुसैनच्या खास टिप्स

Shahnaz Husain Tips For Summer Makeup : घामामुळे मेकअप लगेच खराब होतो? उन्हाळ्यात लग्नाला जाताना मेकअप टिकवण्यासाठी शहनाज हुसैनच्या खास टिप्स

Shahnaz Husain Tips For Summer Makeup : उन्हाळ्यात घाम आणि तेलाचा स्रावही वाढतो. हे घटक त्वचेवर जमा होतात, ज्यामुळे त्वचा अधिक तेलकट दिसते. घाम जास्त घाण स्वतःकडे आकर्षित करतो. त्यामुळे त्वचेची चमक कमी होऊन त्वचा निस्तेज दिसू लागते.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2022 08:05 PM2022-05-06T20:05:39+5:302022-05-06T20:54:13+5:30

Shahnaz Husain Tips For Summer Makeup : उन्हाळ्यात घाम आणि तेलाचा स्रावही वाढतो. हे घटक त्वचेवर जमा होतात, ज्यामुळे त्वचा अधिक तेलकट दिसते. घाम जास्त घाण स्वतःकडे आकर्षित करतो. त्यामुळे त्वचेची चमक कमी होऊन त्वचा निस्तेज दिसू लागते.

Shahnaz Husain Tips For Summer Makeup : Summer make up for a daytime wedding by shahnaz husain | Shahnaz Husain Tips For Summer Makeup : घामामुळे मेकअप लगेच खराब होतो? उन्हाळ्यात लग्नाला जाताना मेकअप टिकवण्यासाठी शहनाज हुसैनच्या खास टिप्स

Shahnaz Husain Tips For Summer Makeup : घामामुळे मेकअप लगेच खराब होतो? उन्हाळ्यात लग्नाला जाताना मेकअप टिकवण्यासाठी शहनाज हुसैनच्या खास टिप्स

उन्हाळ्यात मेकअप टिकवणं ही खरोखरच मोठी समस्या असते.  अति उष्णतेमुळे आणि घामामुळे तुमचा मेकअप लगेच खराब होतो. मेकअप जास्तवेळ टिकावा म्हणून काय करता येईल (Shahnaz Husain Tips For Summer Makeup) असे अनेक प्रश्न वधूच्या मनात वारंवार येतात. उन्हाळ्यात जेव्हा लग्नाचा दिवस येतो तेव्हा मेकअप करणे थोडे कठीण जाते कारण दिवसा जास्त घाम येणे देखील चेहऱ्याचा मेकअप काढू शकतो. (Summer make up for a daytime wedding by shahnaz husain)

उन्हाळ्यात घाम आणि तेलाचा स्रावही वाढतो. हे घटक त्वचेवर जमा होतात, ज्यामुळे त्वचा अधिक तेलकट दिसते. घाम जास्त घाण स्वतःकडे आकर्षित करतो. त्यामुळे त्वचेची चमक कमी होऊन त्वचा निस्तेज दिसू लागते. जर तुमचे लग्न उन्हाळ्याच्या दिवसात असेल किंवा तुम्हाला एखाद्या समारंभाला जायचं असेल तर तुम्ही सौंदर्य तज्ज्ञ शहनाज हुसैन यांच्या काही खास मेकअप टिप्स फॉलो करा. (Makeup Tips For Summer)

वॉटर बेस्ड मेकअप

शहनाज हुसैन सांगतात की, उन्हाळ्यात वॉटर-बेस्ड आणि पावडर मेकअप आयटम अधिक चांगले असतात. विशेषत: दिवसाच्या लग्नासाठी या हंगामात वॉटर-बेस्ड आणि वॉटरप्रूफ मेकअप आयटम वापरा. पावडर मेकअप देखील क्रीमी मेकअपपेक्षा अधिक योग्य आहे. जर तुमचे लग्न सकाळच्यावेळी असेल तर मेकअप हलका असावा. याचे कारण असे आहे की दिवसाचा प्रकाश कठोर असतो आणि मेकअप अपूर्णता देखील दर्शवतो.

 केस विंचरताना खूपच गळतात? दाट केसांसाठी फक्त एका पदार्थानं रोज करा मसाज , तिप्पट वाढतील केस

गुलाबपाणी

दिवसा मेकअपसाठी, गुलाब पाण्यात समान प्रमाणात लोशन मिसळा आणि फ्रीजमध्ये ठेवा. कापसानं चेहरा पुसून त्वचेला टोन करण्यासाठी थंड गुलाब पाण्याचे लोशन वापरा. यामुळे केवळ तुम्हाला ताजेतवाने वाटणार नाही, तर छिद्रे बंद करण्यास देखील मदत  होईल. एका स्वच्छ कापडात बर्फाचा तुकडा गुंडाळा आणि काही सेकंदांनी चेहरा पुसून टाका. त्यामुळे छिद्र बंद होण्यास मदत होते.

जेव्हा तुम्ही पावडर लावाल तेव्हा थोड्या ओलसर स्पंजने चेहरा आणि मानेवर ते लावा. हे सेट करण्यास आणि जास्त काळ टिकण्यास मदत करते. लूज पावडरऐवजी कॉम्पॅक्ट पावडर जास्त काळ टिकते आणि त्वचेला नितळ स्वरूप देते. टिश्यूने तुमचा मेकअप ब्लॉट करा.

लिपस्टिक कशी लावायची

लग्नाच्या दिवशी मेकअप करताना लिपस्टिक लावण्याआधी ओठांवर फाउंडेशन लावा. असे केल्याने लिपस्टिक जास्त काळ टिकते. डोळ्यांच्या मेकअपसाठी वॉटरप्रूफ मस्कारा आणि आयलाइनर वापरा.ही उत्पादने उष्ण आणि दमट हवामानात डोळ्यांचा मेकअप लवकर खराब होण्यापासून रोखतील. तुम्ही वॉटरप्रूफ किंवा वॉटर रेझिस्टंट लिप कलर आणि लिप लाइनर देखील वापरू शकता. या ऋतूत नेहमी मॅट लिपस्टिक वापरा आणि ओठांचे सौंदर्य वाढवण्यासाठी थोडासा ग्लॉस लावा. लिपस्टिकसाठी मऊ, तपकिरी किंवा हलके पेस्टल रंग वापरा. ते तुमच्या त्वचेच्या टोनला पूरक असल्याची खात्री करा.

उन्हाळ्यात लघवीला जळजळ जाणवते? त्रासदायक UTI इन्फेक्शन टाळण्यासाठी 'अशी' घ्या काळजी

ब्राऊन किंवा ग्रे आयशॅडो

आपल्या पापण्यांना ब्राऊन किंवा ग्रे आयशॅडो लावा.  उन्हाळ्यात दिवसा लग्न असेल तर ग्रे आयशॅडो उठून दिसतील. मग डोळ्यांवर काजळ लावा. काजळ डोळ्यांना खोल आणि चमकदार बनवण्यास मदत करेल आणि जास्त हेवी मेकअपही दिसणार नाही. लक्षात ठेवा की हे रंग जास्त तीव्र नसावेत. पापण्यांच्या वरच्या भागावर सोनेरी किंवा चंदेरी रंगाची आयशॅडो वापरा.

मेकअपचा योग्य अभ्यास गरजेचा

चांगल्या मेकअपसाठी, किमान तीन आठवडे अगोदर मेकअपची तयारी करा. वेगवेगळ्या मेकअप्सवर एक नजर टाका आणि तुम्हाला शोभेल असा प्री-ब्राइडल मेकअप मिळवा. बेससाठी निखळ, मॅट लुक मिळवण्याचा प्रयत्न करा. काळी वर्तुळे लपवण्यासाठी कन्सीलर वापरा. दिवसा मेकअपसाठी, आधी सांगितल्याप्रमाणे वॉटरप्रूफ मेकअप, तसेच पावडर शॅडो आणि ब्लशर वापरून पाहा.

स्किनटोननुसार मेकअप निवडा

मेकअप म्हणजे रंगीत सौंदर्यप्रसाधनांच्या योग्य छटा निवडणे. तुमच्या त्वचेच्या टोन आणि टोननुसार योग्य शेड निवडा. तुमची त्वचा गोरी असो, गहूवर्ण असो किंवा धूसर त्वचा असो, योग्य रंग निवडणे खूप महत्त्वाचे आहे. जोपर्यंत तुम्हाला तुमच्यासाठी योग्य शेड मिळत नाही तोपर्यंत सर्व रंग मिसळल्यानंतर ते त्वचेवर लावू नका. बेस निवडताना त्वचेचा नैसर्गिक टोन ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे.
 

Web Title: Shahnaz Husain Tips For Summer Makeup : Summer make up for a daytime wedding by shahnaz husain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.