सगळ्यांच्याच किचनमध्ये उपलब्ध असणारा व आहाराचा भाग असलेला कच्चा बटाटा फक्त खाण्यासाठीच उपयुक्त नाही, तर तो सौंदर्यसाधन म्हणूनही तितकाच फायदेशीर ठरतो. नैसर्गिक सौंदर्य (Secrets That You Should Know About Potato For Skin & Hair Benefits) उपायांमध्ये आजकाल (Top Benefits Of Potato For Skin & Hair) अनेकजणी घरगुती पदार्थांचा वापर करू लागले आहेत. या उपायांमध्ये कच्चा बटाटा एक महत्त्वाचा पदार्थ आहे. त्वचा आणि केसांच्या अनेक समस्या सोडवण्यासाठी तसेच सौंदर्य जपण्यासाठी नैसर्गिक उपायांमध्ये कच्चा बटाटा एक उत्तम पर्याय ठरतो(Unique Ways To Use Potatoes For Skin & Hair).
बटाट्यामध्ये असणारे अँटीऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन सी, स्टार्च आणि नैसर्गिक ब्लीचिंग गुणधर्म त्वचेवर चमक आणतात, डाग कमी करतात आणि केसांच्या मुळांना पोषण देऊन त्यांची वाढ सुधारतात. आजकाल सोशल मिडीयावर बटाट्याशी संबंधित अनेक स्किन केअर हॅक्स सतत व्हायरल होत असतात, त्यामुळे बटाट्याचे सौंदर्यविषयक फायदे आता सगळ्यांनाच माहीत झाले आहेत. कच्चा बटाटा सौंदर्य जपण्यासाठी इतका फायदेशीर आहे की, तो चेहऱ्यावरील डाग असो किंवा केस गळतीचा प्रश्न अशा अनेक समस्या सोडवण्यास उपयुक्त ठरतो. त्वचा आणि केसांसाठी कच्च्या बटाट्याचा वापर नेमका कसा करायचा ते पाहा..
त्वचा आणि केसांसाठी बटाटा आहे फायदेशीर...
उपाय १ :- डार्क सर्कल्स व डोळ्यांना येणारी सूज :- जर डोळ्यांखाली गडद आणि काळसर डाग किंवा खोल खड्डे असतील, तर त्यासाठी तुम्ही बटाट्याचा उपयोग करू शकता. यासाठी बटाट्याचे पातळ गोलाकार काप करून ते २ ते ३ तास फ्रिजमध्ये ठेवावे. जेव्हा हे तुकडे चांगले थंड होतील, तेव्हा ते डोळ्यांवर १० ते १५ मिनिटांसाठी ठेवून देऊ शकता. यामुळे डोळ्यांच्या आसपासची सूज कमी होण्यास मदत होते आणि थकवा जाणवत असल्यास लगेच आराम मिळतो. हे बटाट्याचे थंड काप डोळ्यांवर गरम होईपर्यंतच ठेवायचे आहेत. नियमितपणे हा उपाय केल्यास डोळ्यांच्या खालील काळसरपणा कमी होण्यास मदत होते.
केसांत कोंडा, उपाय ओवा! म्हणाल, इतके दिवस इतका सोपा उपाय का नाही समजला...
उपाय २ :- डार्क स्पॉट्स व पुरळ :- जर चेहऱ्यावर डार्क स्पॉट्स आणि मुरुमांची समस्या असेल, तर बटाटा नक्कीच उपयुक्त ठरु शकतो. या घरगुती उपायासाठी सर्वप्रथम बटाटा किसून घ्यावा आणि नंतर त्याचा रस हाताने दाबून काढावा. नंतर या बटाट्याच्या रसामध्ये थोडंसं मध मिसळायचं आहे. हे मिश्रण चेहऱ्यावर अगदी हलक्या हाताने लावून किमान २० मिनिटं ठेवावं. त्यानंतर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्यावा. हा उपाय नियमित केल्यास चेहऱ्यावरील डाग, मुरुमांच्या खुणा आणि त्वचेवरील टॅनिंग हळूहळू कमी होण्यास मदत मिळते.
उपाय ३ :- स्किन ग्लोइंगसाठी :- बटाटयाच्या मदतीने चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो येण्यास मदत होते. यासाठी एक बटाटा किसून त्याचा रस काढावा. आता या रसामध्ये एक टिश्यू पेपर भिजवून तो चेहऱ्यावर मास्कप्रमाणे लावायचा आहे. हा टिश्यू मास्क १० ते १५ मिनिटे चेहऱ्यावर तसाच ठेवावा आणि नंतर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्यावा. या उपायामुळे चेहऱ्यावर ताजेपणा येतो, त्वचा उजळ होते आणि नैसर्गिक ग्लो येतो.
खोबरेल तेल-दही आणि १ केळं, त्वचेवर काचेसारखी चमक आणणारा इन्स्टंट उपाय...
उपाय ४ :- केसगळती थांबवण्यासाठी बटाटा :- केस खूप जास्त प्रमाणात गळत असतील तर केसगळती थांबवण्यासाठी कच्चा बटाटा फायदेशीर ठरतो. यासाठी बटाट्याचा रस काढून त्यामध्ये एलोवेरा जेल मिसळायचं आहे. हे मिश्रण केसांच्या मुळांमध्ये म्हणजेच स्कॅल्पवर हलक्या हाताने मसाज करत लावावं. काही वेळाने हे मिश्रण स्वच्छ पाण्याने धुवून टाकावं. या उपायामुळे केसगळती कमी होते, केसांना पोषण मिळतं आणि त्यांची मुळे बळकट होतात. नियमित वापर केल्यास फरक स्पष्टपणे दिसून येतो.
उपाय ५ :- केसांचा चमकदारपणा वाढवण्यासाठी :- कोरड्या, रुक्ष, निस्तेज दिसणाऱ्या केसांवर चमक आणायची असेल, तर बटाटा हा एक उत्तम घरगुती उपाय ठरू शकतो. यासाठी बटाट्याला सालीसकट एक तासभर पाण्यांत उकळवून घ्या. नंतर हे पाणी गाळून बाजूला ठेवा. हे गार झाल्यावर हलक्या हाताने केसांमध्ये लावा – विशेषतः मुळांपासून टोकांपर्यंत. थोड्या वेळाने हेअर वॉश करा. या पाण्यामुळे केसांना नैसर्गिक चमक मिळते आणि ते अधिक मऊ व मुलायम व चमकदार दिसतात.