जया किशोरी या प्रसिद्ध कथावाचक आहेत. त्यांची भजनं आणि कथावाचन लोकांमध्ये बरेच प्रसिद्ध आहे. याशिवाय आपला साधेपणा आणि सौंदर्यासाठीही जया किशोरी ओळखल्या जातात. अलिकडेच जया किशोरींचा पेटी वादनाचा फोटो व्हायरल झाला. हा फोटो पाहून सर्वचजण प्रभावित झाले आहेत. कारण या फोटोत त्यांचा लूक खूपच आकर्षक आणि स्टनिंग वाटत आहे. ( Jaya Kishori's Skin Care Tips)
लाईट पिंक आणि डार्क रानी पिंक कलरच्या अनारकलीचा फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला होता. यात त्या मिनिमल एक्सेसरीजसह दिसत आहेत. जया यांनी रानी पिंक रंगांचा अनारकली ड्रेस घातला आहे. यात त्यांनी फ्लोरल पॅटर्न कटआऊट देऊन तयार केले फुल स्लिव्हजवर हेवी एम्ब्रॉयडरी वर्क केले आहे.
घरगुती फेस पॅक
एका मुलाखतीत जया किशोरी यांनी सांगितलं होतं की माझ्या स्किन केअर रुटीनमध्ये कोणत्याही खास पदार्थांचा समावेश नाही. फक्त ४ स्टेप्सचं खूपच सोपं रुटीन सांगितलं आहे. या रुटीनमध्ये एका खास स्प्रे बाबत सांगितलं आहे. हा स्प्रे फक्त २ मिनिटांत घरीच तयार करू शकता. चेहऱ्याला केमिकलयुक्त स्क्रब न लावता जया किशोरी घरगुती उपाय करतात. एका वाटीत बेसन, हळद आणि दही मिसळून या मिश्रणाची पेस्ट तयार करून १० ते १५ मिनिटं चेहऱ्याला लावा नंतर साध्या पाण्यानं चेहरा धुवा. या उपायानं चेहऱ्यावर जमा झालेल्या मृत पेशी निघून जातात.
तांदळाचा स्प्रे
जया किशोरी तांदळाचा स्प्रेसुद्धा वापरतात. तांदूळ शिजवण्यासाठी वापरलं जाणारं पाणी एका स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवा. हे पाणी त्वचेवर वापरल्यानं स्किन टाईटनिंग होण्यास मदत होते. तांदळाचं पाणी स्किन केअरचा एक महत्वाचा भाग आहे. ज्यामुळे चेहरा टोन दिसतो.
जया किशोरी आपल्या सुंदर लूकसाठी भडक रंगांऐवजी सॉफ्ट, सेटल रंगांची निवड करतात. ज्यामुळे त्या क्लासी दिसतात. त्यांची ज्वेलरी नेहमी लाईटवेट असते. तर मोठे कानातले त्यांना रिच लूक देतात. हेअर स्टाईलसुद्धा खूपच सिंपल असते.
