Lokmat Sakhi >Beauty > सद्गुरू सांगतात कायम 'चिरतरुण' राहण्याचं सिक्रेट! रोज ५ पदार्थ खा, वयापेक्षा २० वर्ष लहान दिसाल

सद्गुरू सांगतात कायम 'चिरतरुण' राहण्याचं सिक्रेट! रोज ५ पदार्थ खा, वयापेक्षा २० वर्ष लहान दिसाल

चांगला आहार आणि लाईफस्टाईल फक्त शरीराला आतून हेल्दी बनवत नाही तर स्किनसुद्धा चमकदार बनवते.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2025 10:15 IST2025-08-18T10:11:03+5:302025-08-18T10:15:19+5:30

चांगला आहार आणि लाईफस्टाईल फक्त शरीराला आतून हेल्दी बनवत नाही तर स्किनसुद्धा चमकदार बनवते.

Sadhguru Jaggi Vasudev Says Eat These 5 Best Anti Aging Foods To Look Yong Even At 50 | सद्गुरू सांगतात कायम 'चिरतरुण' राहण्याचं सिक्रेट! रोज ५ पदार्थ खा, वयापेक्षा २० वर्ष लहान दिसाल

सद्गुरू सांगतात कायम 'चिरतरुण' राहण्याचं सिक्रेट! रोज ५ पदार्थ खा, वयापेक्षा २० वर्ष लहान दिसाल

प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते की आपण आयुष्यभर तरूण, प्रेझेंटेबल दिसावं. तुमची लाईफस्टाईल आणि खाणं-पिणं यात सौंदर्याचं गुपित लपलं आहे. चांगला आहार आणि लाईफस्टाईल फक्त शरीराला आतून हेल्दी बनवत नाही तर स्किनसुद्धा चमकदार बनवते. काही सुपर फूड्‍सचे सेवन केल्यानं शरीरातील सेल्स डॅमेज होत नाहीत. (Anti-Ageing Tips) असे पदार्थ शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी फायदेशीर ठरतात. (How  To Look Yonger)

सद्गुरू जग्गी वासुदेव सांगतात की तुम्हाला वाढत्या वयातही तरूण दिसायचं असेल तर नैसर्गिक पदार्थ खाण्याचा प्रयत्न करा. आजकाल आपण जे काही खातो ते खूपच शिळं, प्रोसेस्ड अन्न असतं. ज्यामुळे शरीराचं नुकसानही होऊ शकतं. (Sadhguru Jaggi Vasudev Says Eat These 5 Best Anti Aging Foods To Look Yong Even At 50)

सद्गुरू सांगतात की दीर्घकाळ तुम्हाला तरूण आणि सुंदर दिसायचं असेल तर काही पदार्थांना आपल्या लाईफस्टाईलचा भाग बनवायला हवं. काही पदार्थ जसं की ताजी फळं, हिरव्या भाज्यांचे सेवन केल्यास पचनक्रिया चांगली राहते. मानसिक आरोग्यही उत्तम राहतं. असे कोणते पदार्थ आहेत जे खाल्ल्यानं तब्येत चांगली राहते समजून घेऊ. (5 Best Anti Aging Foods To Look Yong Even At 50)

आवळा खा

आवळा एक सुपरफूड. आहे. जो एंटी-एजिंग गुणांनी समृद्ध आहे. यातील व्हिटामीन सी शरीरातील कोलोजन उत्पादन वाढवते. कोलोजन त्वचेची इलास्टीसिटी मेंटेन ठेवते आणि वेळेआधी येणाऱ्या सुरकुत्या टाळण्यासही मदत होते. आवळ्यातील औषधी गुणांमध्ये एंटी एजिंग गुणधर्म असतात. ज्यामुळे त्वचा चांगली राहण्यास मदत होते (Ref). रोज सकाळी आवळ्याचा रस प्यायल्यास शरीर डिटॉक्स व्हायला मदत होते. शरीरातील विषारी घटक निघून जातात.

घरात कोणं बघतं म्हणून गाऊनवरच असता? ५०० च्या आत घ्या कंम्फर्टेबल मॅक्सी ड्रेसेस, स्टायलिश दिसाल....

ताजी फळं आणि भाज्या

सद्गुरू जग्गी वासुदेव यांच्या मते त्वचेला निरोगी ठेवण्यासाठी फळं आणि भाज्याचे सेवन करायला हवे जसं की जांभूळ, ब्लुबेरी, डाळींब, सफरचंद, किव्ही त्वचेसाठी अमृताप्रमाणे काम करतरे. भाज्यांमध्ये तुम्ही पालक, मेथी आणि मोहोरीचा समावेश करू शकता. यात व्हिटामीन के, फॉलेट आणि आयर्न मोठ्या प्रमाणात असते. ज्यामुळे त्वचा निरोगी राहते.

55 वर्षांच्या कोरियन आईनं सांगितलं चमकदार चेहऱ्याचं गुपित! ४ वस्तू लावते, वय दिसूनच येत नाही

बदाम आणि अक्रोड

बदाम आणि अक्रोडचे सेवन केल्यास त्वचेचा रंग उजळतो. हे ड्राय फ्रुट ओमेगा ३ फॅटी एसिड्स, व्हिटामीन ई आणि हेल्दी फॅट्सनी परीपूर्ण असते. ज्यामुळे सुरकुत्या येत नाहीत. तुम्ही बदाम आणि अक्रोडचे सेवन पाण्यात भिजवून करू शकता. बदामाचं सालं काढूनच खा.

हळद आणि कडुलिंब

हळद आणि कडुलिंबाची गोळी सकाळी रिकाम्या पोटी घेतल्यास फक्त पचनक्रिया चांगली राहत नाही तर त्वचाही उजळते. याच्या सेवनानं शरीरातील गुड ब्रक्टेरियाज वाढतात आणि पचनक्रिया चांगली राहते. हळदीत एंटी एजिंग गुण असतात. याच्या सेवनानं सूज येत नाही. त्वचेचं संक्रमण होत नाही इम्यूनिटी वाढते.

Web Title: Sadhguru Jaggi Vasudev Says Eat These 5 Best Anti Aging Foods To Look Yong Even At 50

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.