आजकाल चमकदार त्वचा मिळवण्यासाठी लोक महागड्या उत्पादनांचा वापर करतात. सेलिब्रिटी न्युट्रिशनिस्ट ऋजूता दिवेकर ज्या करिना कपूर यांच्या डाएट एक्सपर्ट आहेत. त्यांच्यामते सुंदर त्वचा मिळवण्यासाठी ड्रेसिंग टेबलवर १० स्किन केअर उत्पादनं ठेवण्यापेक्षा काही चांगल्या सवयी लावून घ्यायला हव्यात. रुजूता दिवेकर यांनी इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात रुजूता यांनी त्यांचे स्किन केअर रूटीन फक्त ४ बेसिक स्टेप्सवर आधारीत असल्याचं सांगितलं आहे. (Rujuta Diwekar Reveals 4 Steps Skincare Routine)
पाणी प्या
ऋजूता सांगतात की सगळ्यात सोपा ग्लो अप टूल नियम म्हणजे हायड्रेट राहा. पाणी त्वचेला मऊ, स्वच्छ आणि बाऊंसी ठेवण्यास मदत करते. तुम्ही कुठेही जात असाल फक्त पाणी सोबत ठेववा. जास्तीत जास्त पाणी प्या. ज्यामुळे त्वचेला थकवा येणार नाही आणि त्वचा डल दिसणार नाही.
लवकर झोपा
ऋजूता सांगतात की महागडे नाईट मास्क विसरू जा. वेळेवर झोपणं तुमच्या त्वचेसाठी फायदेशीर ठरू शकतं. चांगली झोप घेतल्यास त्वचा व्यवस्थित रिपेअर होते. कोलोजन सपोर्ट मिळतो तसंच डार्क सर्कल्स आणि सूज कमी होते. रात्री साडे नऊ ते १० पर्यंत झोपण्याचा प्रयत्न करा.
एक्टिव्ह राहा
ऋजूता सांगतात शारीरिक एक्टिव्हीटीज आपल्या स्किनकेअरचा एक महत्वाचा भाग आहेत. ज्यामुळे चेहऱ्यावर नैसर्गिकरित्या फ्रेशनेस येतो. म्हणून व्यायाम न चुकता करा.
व्हायरल स्किनकेअर ट्रेंड्सपासून लांब राहा
ऋजूता अशा व्हिडिओजपासून दूर राहतात जे वयापेक्षा छोटे दिसण्यासाठी उपाय करण्याचे दावे करतात.कारण तुम्ही सातत्यानं एखादी चांगली सवय ठेवता तेव्हाच स्किन चांगली राहते. कोणताही उपाय आज केला आणि उद्या लगेच परिणाम दिसेल असे होत नाही.
सेलिब्रिटी न्युट्रिशनिस्ट रुजूता दिवेकर यांच्यामते चांगली त्वचा राहण्यासाठी तु्म्ही काय खरेदी करता यापेक्षा कसे जगता हे महत्वाचे असते. त्वचा हेल्दी ठेवण्यासाठी तसंच चमकदार राहण्यासाठी भरपूर पाणी प्या, वेळेवर झोपा, एक्टिव्ह राहा. कोणतेही व्हायरल ट्रेंड्स फॉलो करणं टाळा. चांगल्या सवयी ठेवल्यास आपोआप त्वचा चांगली दिसेल.
