आरोग्यासाठी आणि सौंदर्यासाठी शरीराला योग्य प्रमाणात पोषण मिळाले पाहिजे. शरीराचे सौंदर्य वाढविणारा एक महत्त्वाचा घटक म्हणजे व्हिटॅमिन ए. व्हिटॅमिन ए केसांसाठी, डोळ्यांसाठी आणि हाडांच्या मजबूतीसाठी खूप उपयुक्त असते. त्यामुळे व्हिटॅमिन ए योग्य प्रमाणात मिळणे खूप गरजेचे आहे. व्हिटॅमिन ए मध्ये मोठ्या प्रमाणात ॲण्टीऑक्सिडंट्स असतात. त्यामुळे त्वचेचे आणि केसांचे सौंदर्य राखायचे असेल तर आहारात व्हिटॅमिन ए चा पुरवठा करणाऱ्या या पदार्थांचा समावेश करायलाच हवा.
त्वचा आणि केसांच्या आरोग्यासाठी हे पदार्थ जरूर खा१. गाजरगाजरामध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन ए असते. गाजराचे नियमितपणे सेवन केल्यास रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहते. शरीरातील बॅड कोलेस्टरॉल कमी करण्यासाठी गाजर उपयुक्त ठरते. त्यामुळे जर नियमित गाजर खाल्ले तर त्याचे आरोग्यावर खूपच सकारात्मक परिणाम दिसून येतात. दृष्टीदोष दूर करण्यासाठीही गाजर उपयुक्त आहे.
२. सिमला मिरचीचायनिज पदार्थांचा स्वाद वाढविणारी नियमित स्वरूपात खाणे खूप गरजेचे आहे. सिमला मिरचीमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि के तसेच लोह मोठ्या प्रमाणात असते. यामध्ये फायबरदेखील मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे पचनाच्या अनेक समस्या दूर होतात आणि चयापचय क्रिया सुधारल्यामुळे आरोग्य आणि त्वचेचे सौंदर्य वाढते. केसांच्या वाढीसाठी आवश्यक असणारे बिटी कॅरेटीन सिमला मिरचीमध्ये मोठ्या प्रमाणात असते.
३. पालकपालकाच्या भाजीमध्ये व्हिटॅमिन ए आणि लोह यांचे भरपूर प्रमाण असते. त्यामुळे व्हिटॅमिन ए ची कमतरता दूर करण्यासाठी पालकाचा समावेश असणारे विविध पदार्थ खाल्ले पाहिजेत.
या पदार्थांमध्ये असते व्हिटॅमिन एव्हिटॅमिन ए शरीराला मिळावे म्हणून गाजर, सिमला मिरची आणि पालक तर खावेच. पण पपई, रताळे, दूध, दही, अंडी यांचा आहारातील समावेश वाढवला पाहिजे.
निद्रानाशावर गुणकारीनिद्रानाशाचा त्रास अनेक व्यक्तींना असतो. निद्रानाशाची अनेक कारणे असू शकतात. पण सगळ्यात मुख्य कारण म्हणजे व्हिटॅमिन ए ची कमतरता. त्यामुळे जर निद्रानाश जाणवत असेल तर व्हिटॅमिन ए चा पुरवठा करणारे अन्नपदार्थ योग्य प्रमाणात खायला हवेत. कारण पुरेशी झोप मिळाली नाहीत, तरीही केसगळणे आणि त्वचेच्या विविध समस्या निर्माण होऊ शकतात.