ग्लोइंग स्किनसाठी लोक चेहऱ्यावर नको नको त्या गोष्टी लावत असतात. पण सगळ्याच गोष्टींचा फायदा मिळतो असं नाही. महागडे क्रीम देखील अनेकदा निकामी ठरतात. पण असे अनेक घरगुती उपाय असतात, जे त्वचा ग्लोइंग करण्यास मदत करतात. महत्वाची बाब म्हणजे या घरगुती उपायांचे कोणते साइड इफेक्ट्सही होत नाहीत. यातीलच एक प्रभावी उपाय म्हणजे गुलाबजल आणि तुरटीचं मिश्रण. त्वचा साफ करण्यासाठी आणि ग्लोइंग ठेवण्यासाठी हा उपाय फारच फायदेशीर मानला जातो. अशात याचे काय काय फायदे मिळतात आणि याचा वापर कसा करावा हे जाणून घेऊयात.
त्वचा टाइट आणि ग्लोइंग होते
गुलाबजलने त्वचा हायड्रेट आणि फ्रेश राहते. तेच तुरटीने त्वचा टाइट होते. तुरटीने त्वचा आतून साफ होत असल्याने त्वचेवर ग्लो येतो. नॅचरल ग्लो मिळवण्यासाठी आपण हा उपाय ३ ते ४ दिवसात एकदा करू शकता.
पिंपल्स आणि अॅक्ने
तुरटीमध्ये अँटी-बॅक्टेरिअल गुण असतात जे पिंपल्ससाठी कारणीभूत बॅक्टेरिया कमी करतात. गुलाबजल त्वचेचा रेडनेस कमी करतं आणि त्वचेला रिलॅक्स करतं. जर आपल्याला नेहमीच पिंपल्स होत असतील तर आठवड्यातून २ वेळा हे मिश्रण चेहऱ्यावर लावू शकता.
तेलकट त्वचा
तेलकट त्वचेमुळे चेहऱ्यावर पिंपल्स येतात आणि त्वचा चिकटही होते. जर आपली त्वचा तेलकट असेल आणि पिंपल्सने हैराण झाला असाल तर हे मिश्रण आपल्यासाठी फायदेशीर ठरू शकतं. तुरटी आणि गुलाबजलाच्या मिश्रणाने त्वचेचे बंद पोर्स साफ होतात, ज्यामुळे एक्स्ट्रा तेल कमी होतं.
कसा कराल वापर?
१ चमचा गुलाबजल घ्या, त्यात चिमूटभर तुरटीची पावडर मिक्स करा. कॉटनच्या मदतीने हे मिश्रण चेहऱ्यावर लावा. १० ते १५ मिनिटांनी चेहरा साध्या पाण्याने धुवा. या मिश्रणाने त्वचा ड्राय होऊ शकते. त्यामुळे याचा जास्त वापर करू नये. आठवड्यातून दोनदा वापर करणं पुरेसं आहे. ज्या लोकांची त्वचा आधीच ड्राय आहे त्यांनी हा उपाय केल्यास त्वचेवर अॅलर्जी आणि जळजळ होऊ शकते. संवेदनशील त्वचेवर याचा वापर करण्याआधी एक्सपर्टचा सल्ला घ्यावा.
Web Summary : Rose water and alum mixture tightens skin, reduces acne, and controls oil. Apply a mixture of rose water and alum powder to the face for 10-15 minutes, then rinse. Use twice a week. Consult an expert for sensitive skin.
Web Summary : गुलाब जल और फिटकरी का मिश्रण त्वचा को टाइट करता है, मुंहासे कम करता है और तेल को नियंत्रित करता है। गुलाब जल और फिटकरी पाउडर का मिश्रण चेहरे पर 10-15 मिनट के लिए लगाएं, फिर धो लें। हफ्ते में दो बार इस्तेमाल करें। संवेदनशील त्वचा के लिए विशेषज्ञ से सलाह लें।