आपल्या रोजच्या घाई-गडबडीमध्ये त्वचेकडे लक्ष द्यायला आपण विसरतो. त्वचेची योग्य वेळी नीट काळजी घेतली नाही तर त्याचा परिणाम हळूहळू चेहऱ्यावर (Homemade Magical Face Mask for Glowing Skin) दिसू लागतो. यातच आपल्या त्वचेला दररोजच धूळ, धूर, प्रदूषण, ऊन यांचा सामना करावा लागतो. त्यामुळे मग हळूहळू त्वचा निस्तेज होत जाते. त्वचेवरची चमक (For Instant Glow Homemade Facemask) नाहीशी होते. अशावेळी वारंवार पार्लरमध्ये जाणं अनेकींना शक्य होत नाही. किंवा दरवेळी पार्लरमध्ये जाऊन फेशियल किंवा क्लिनअप (Best and Simple Homemade Face Masks For Glowing Skin) अशा महागड्या ब्यूटी ट्रिटमेंट्सवर पैसे खर्च करण्याची इच्छा होत नाही. अशावेळी चेहऱ्याची गेलेली चमक पुन्हा आणण्यासाठी आपण नक्कीच काही घरगुती उपाय करू शकतो(Ripe Banana, curd & coconut oil facemask for glowing skin).
हे उपाय केल्यामुळे चेहऱ्यावरचं टॅनिंग, डेडस्किन निघून जाते आणि चेहरा पुन्हा स्वच्छ, नितळ, चमकदार होतो. जर तुम्हांला कमी वेळातच चेहऱ्यावर ग्लो हवा असेल तर किचनमधीलच काही पदार्थ नक्कीच फायदेशीर ठरतील. किचनमधील ३ पदार्थ तुम्हाला काही मिनिटात नॅचरल चमक देऊ शकतात. या घरगुती उपायाने तुम्ही अगदी मिनिटभरात चेहऱ्यावर इंस्टंट ग्लो आणू शकता. चेहऱ्यावर चमक आण्यासाठी घरगुती उपाय नेमका काय आणि कसा करता येऊ शकतो, ते आपण पाहूया..
चेहऱ्यावर हवाय इन्स्टंट ग्लो मग करुन बघाच हा उपाय...
चेहऱ्यावर इन्स्टंट ग्लो आणण्यासाठीचा घरगुती उपाय beautifulyouforever या इंस्टाग्राम अकांउटवरून शेअर करण्यात आला आहे. काळवंडलेल्या त्वचेवर जर तुम्हांला लगेच इन्स्टंट ग्लो हवा असेल हा घरगुती नैसर्गिक उपाय असरदार ठरु शकतो. यासाठी, आपल्याला १ पिकलेल केळं आणि प्रत्येकी १ टेबलस्पून दही व खोबरेल तेल इतक्या तीनच पदार्थांची गरज लागणार आहे.
फेस फॅट वाढून चेहरा वयस्क - थोराड दिसतो? ५ सवयी, तारुण्य परत येईल कायमचं...
इन्स्टंट ग्लोसाठी उपाय नेमका काय आहे ?
इन्स्टंट ग्लो हवा असल्यास सगळ्यांत आधी एका बाऊलमध्ये पिकलेलं केळं व्यवस्थित मॅश करून घ्यावं. त्यानंतर त्यात प्रत्येकी १ टेबलस्पून दही व खोबरेल तेल घालावं. आता हे सगळे मिश्रण चमच्याने कालवून एकजीव करून घ्यावे. इन्स्टंट ग्लो आणणारा घरगुती फेसमास्क वापरण्यासाठी तयार आहे. हा तयार फेसमास्क आपण चेहऱ्यावर लावून बोटाने हलकेच ५ ते १० मिनिटे मसाज करुन घ्यावा. त्यानंतर १० मिनिटे हा फेसमास्क चेहऱ्यावर तसाच लावून ठेवावा. मग पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्यावा. आठवड्यातून किमान २ ते ३ वेळा हा उपाय केल्यास काळवंडलेल्या चेहऱ्यावर इन्स्टंट ग्लो येण्यास मदत होते.
फेशियल हेअर रिमूव्हलचा घरगुती उपाय! वेदना न होता केस निघतील सहज - वॅक्सिंग, थ्रेडींग विसरा!
काळीकुट्ट दिसते पाठ ? ५ टिप्स, पाठ दिसेल स्वच्छ आणि खाज फोडही येणार नाहीत...
हा फेसमास्क वापरण्याचे फायदे...
१. खोबरेल तेल :- खोबरेल तेल त्वचेला खोलवर मॉइश्चराईज करुन कोरडेपणा कमी करते.
२. पिकलेलं केळ :- केळं त्वचेला नैसर्गिक ग्लो देऊन, त्वचा मऊ आणि कायम फ्रेश ठेवण्यास मदत करते.
३. दही :- दही त्वचेवरील डेड स्किन काढून नैसर्गिक उजळपणा वाढवते.