Lokmat Sakhi >Beauty > काखेतील काळपटपणा होईल दूर, सोबतच दुर्गंधीही पळेल; फक्त 'या' ३ पद्धतीनं करा तुरटीचा वापर...

काखेतील काळपटपणा होईल दूर, सोबतच दुर्गंधीही पळेल; फक्त 'या' ३ पद्धतीनं करा तुरटीचा वापर...

Alum for underarms blackness : आपणही काखेतील काळपटपणा दूर करण्यासाठी नको नको ते उपाय करून थकल्या असाल, तर तुरटी एक चांगला पर्याय ठरू शकते.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2025 11:37 IST2025-07-15T11:36:10+5:302025-07-15T11:37:00+5:30

Alum for underarms blackness : आपणही काखेतील काळपटपणा दूर करण्यासाठी नको नको ते उपाय करून थकल्या असाल, तर तुरटी एक चांगला पर्याय ठरू शकते.

Right way to remove blackness of underarms with alum | काखेतील काळपटपणा होईल दूर, सोबतच दुर्गंधीही पळेल; फक्त 'या' ३ पद्धतीनं करा तुरटीचा वापर...

काखेतील काळपटपणा होईल दूर, सोबतच दुर्गंधीही पळेल; फक्त 'या' ३ पद्धतीनं करा तुरटीचा वापर...

Alum for underarms blackness : काखेतील काळपटपणा हा महिलांसाठी एक मोठा चिंतेचा विषय असतो. कारण यामुळे त्वचा काळपट दिसते आणि सगळ्यात मोठी डोकेदुखी म्हणजे इच्छा असूनही अनेक महिला किंवा तरूणी स्लीव्हलेस ड्रेस घालणं टाळतात. काखेतील काळे डाग दूर करण्यासाठी भलेही बाजारात अनेक प्रॉडक्ट्स मिळत असीतल, पण त्यात नुकसानकारक केमिकल्स असतात. ज्यामुळे त्वचेला फायदा मिळण्याऐवजी नुकसान होतं. 

आपणही काखेतील काळपटपणा दूर करण्यासाठी नको नको ते उपाय करून थकल्या असाल, तर तुरटी एक चांगला पर्याय ठरू शकते. तुरटीच्या मदतीनं काखेतील काळपटपणा कसा दूर करता येईल याबाबत पाहुयात. 

तुरटी आणि गुलाबजल

काखेतील काळपटपणा ही एक मोठी समस्या आहे. हा काळपटपणा कमी करण्यासाठी आपण तुरटीचा वापर करू शकता. हा उपाय करण्यासाठी एक चमचा तुरटीचं पावडर घ्या आणि त्यात थोडं गुलाबजल टाकून चांगलं मिक्स करा. तयार झालेली पेस्ट काखेत काळ्या डागांवर लावा. १० मिनिटं ही पेस्ट तशीच राहू द्या. त्यानंतर हलक्या हातानं काखेत मसाज करा. नंतर त्वचा पाण्यानं धुवून घ्या. आठवड्यातून दोन ते तीन वेळा हा उपाय काही दिवस करा. आपल्याला फरक बघायला मिळेल. महत्वाची बाब म्हणजे याचे काही साइड इफेक्ट्सही नाहीत.

तुरटी आणि लिंबू

लिंबू आणि तुरटीच्या मिश्रणाची सुद्धा आपल्याला मदत मिळू शकते. हे तयार करण्यासाठी आधी तुरटीच्या पावडरमध्ये लिंबाचा रस टाकून पेस्ट तयार करा. ही पेस्ट काखेत लावा आणि १० मिनिटांनंतर पाण्यानं धुवून टाका. काही दिवस हा उपाय केल्यावर आपल्याला काळपटपणा कमी झालेला दिसू शकतो.

फक्त तुरटीचा वापर

जर आपल्याला इतर उपाय करण्यासाठी वेळ नसेल किंवा तसं काही करायचं नसेल तर फक्त तुरटी सुद्धा लावू शकता. आंघोळ केल्यावर तुरटीचा तुकडा काखेतील ओल्या त्वचेवर फिरवा. यानं घामाची दुर्गंधीही येणार नाही आणि काळपटपणा दूर करण्यास मदत मिळते.

Web Title: Right way to remove blackness of underarms with alum

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.