Join us
Daily Top 2Weekly Top 5

लावल्यावर काही वेळातच कमी होतो परफ्यूमचा असर? पाहा शरीरावर कुठे लावाल तर दिवसभर टिकेल सुगंध

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2026 10:47 IST

Right Way To Apply Perfume : अनेकांची तक्रार असते की, घरातून निघताच अर्ध्या - एक तासातच परफ्यूमचा सुगंध उडून जातो. दुपारनंतर पुन्हा घामाची दुर्गंधी त्रास देऊ लागते. आपल्यासोबतही असं अनेकदा झालं असेल.

Right Way To Apply Perfume : उन्हाळ्यात घामाची दुर्गंधी सगळ्यांसाठीच डोकेदुखी ठरत असते. अशात सगळ्यात सोपा आणि उपाय म्हणून लोक परफ्यूम किंवा डिओड्रंटचा वापर करतात. सगळ्यांनाच वाटत असतं की, जेव्हा त्यांच्या जवळून कुणी जाणार तेव्हा घामाची दुर्गंधी येऊ नये. पण यात एक महत्वाचा मुद्दा की, अनेकांची तक्रार असते की, घरातून निघताच अर्ध्या - एक तासातच परफ्यूमचा सुगंध उडून जातो. दुपारनंतर पुन्हा घामाची दुर्गंधी त्रास देऊ लागते. आपल्यासोबतही असं अनेकदा झालं असेल. पण अनेकांना हे माहीत नसतं की, गडबड परफ्यूममध्ये नसते, तर आपल्या लावण्याच्या पद्धतीत असते. अशात परफ्यूम लावण्याची योग्य पद्धत काय पाहूयात.

जास्त वेळ परफ्यूमचा सुगंध टिकण्यासाठी

कानांच्या मागे​​​परफ्यूम लावण्यासाठी कानाच्या मागची जागा सगळ्यात बेस्ट असते. कानाच्या मागची त्वचा पातळ असते आणि इथे जास्त उष्णताही राहते. या जागेवर परफ्यूम लावल्यास चेहरा आणि केसांच्या आसपास सुगंध येत राहतो. जेव्हा आपल्यासोबत कुणी बोलेल किंवा आपल्या जवळ येतील त्यांना हलका आणि गोड सुगंध जाणवेल.

गुडघ्यांच्या मागे

आपल्याला कदाचित माहीत नसेल की, सुगंध नेहमीच खालून वरच्या दिशेने वाहत असतो. जर आपण गुडघ्याच्या मागच्या फोल्डवर परफ्यूम लावाला तर आपण चालल्यावर शरीराच्या उष्णतेने सुगंध वरच्या दिशेने येत राहणार. चालताना आपल्या आजूबाजूच्या लोकांनाही सुगंध जाणवेल. 

मानेवर 

परफ्यूमचा सुगंध जास्त वेळ कायम ठेवण्यासाठी बेस्ट पर्याय म्हणजे मानेजवळ परफ्यूम लावा. पण मानेवर हलका परफ्यूम वापरावा. कारण येथील त्वचा नाजूक असते.

परफ्यूम कुठे लावू नये?

हातावर - अनेकदा काही लोक हातावर परफ्यूम लावल्यावर दुसऱ्या हाताने ते घासतात. नंतर त्याचा सुगंध घेतात. पण असं केल्याने परफ्यूमचा सुगंध वाढत नाही तर कमी होतो. मगटावर परफ्यूम लावा आणि तसंच राहू द्या सुगंध जास्त वेळ कायम राहतो. 

केसांवर - काही लोकांना सवय असते की, ते केसांवर परफ्यूम लावतात. पण ही सवय तुमच्यासाठी फार घातक ठरू शकते. कारण परफ्यूममध्ये अल्कोहोलचा वापर भरपूर केला गेलेला असतो. यामुळे केस रखरखीत आणि निर्जीव होऊ शकतात. 

प्रायव्हेट पार्टच्या आजूबाजूला - जर तुम्ही शॉर्ट किंवा लेग रिवीलिंग ड्रेस परिधान करत असाल आणि प्रायव्हेट पार्टच्या आजूबाजूला परफ्यूमचा वापर करत असाल तुम्ही फार मोठी चूक करताय. कारण पायांच्या मधे घर्षण झाल्यावर गरमी निर्माण होते आणि त्या जागेवर तुम्हाला खाज किंवा जळजळ होण्याची समस्या वाढते. 

अंडरआर्म्स - कधीच थेट अंडरआर्म्समध्ये परफ्यूमचा वापर करू नये. कारण येथील त्वचा फार संवेदनशील असते. थेट परफ्यूमचा वापर केल्याने घर्षण आणि जळजळ यामुळे येथील त्वचा काळी पडते. तसेच त्वचेसंबंधी आणखीही काही समस्या होऊ शकतात. 

English
हिंदी सारांश
Web Title : Make your perfume last longer: Apply it on these body parts.

Web Summary : Perfume fades quickly? Apply it behind ears, knees, and neck for a lasting fragrance. Avoid spraying on hands, hair, or sensitive areas to prevent irritation and dryness.
टॅग्स :त्वचेची काळजीब्यूटी टिप्स