Join us

चेहऱ्यावर ग्लो आणण्यासाठी तांदळाच्या पाण्यानं चेहरा कधी धुवावा? योग्य पद्धत जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 18:45 IST

Rice Water For Face : तांदळाच्या पाण्यानं चेहरा धुण्याचे अनेक फायदे आहेत. पण यासाठी योग्य पद्धत आणि वेळ माहीत असली पाहिजे. तेव्हाच त्याचे अधिक फायदे मिळतील.

Rice Water For Face : तांदळाचा वापर भात, खिचडी, इडली, डोसा अशा वेगवेगळ्या गोष्टी तयार करण्यासाठी केला जातो. पण तांदळाचे केवळ पदार्थच बनवतात असं नाही तर त्वचेलाही खूपसारे फायदे मिळतात. बऱ्याच महिला त्वचेसाठी काळजी घेण्यासाठी तांदळाचा आणि तांदळाच्या पाण्याचा वापर करतात. तांदळाच्या पाण्यानं चेहरा धुण्याचे अनेक फायदे आहेत. पण यासाठी योग्य पद्धत आणि वेळ माहीत असली पाहिजे. तेव्हाच त्याचे अधिक फायदे मिळतील. अशात तेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

तांदळाच्या पाण्यानं चेहरा धुण्याची योग्य वेळ

जर तांदळाच्या पाण्यानं चेहऱ्याची त्वचेसाठी फायदे मिळवायचे असतील, ते वापरण्याची योग्य पद्धत माहीत असणं महत्वाचं ठरतं. तांदळाच्या पाण्यानं चेहरा सकाळी आणि सायंकाळी धुणं अधिक फायदेशीर ठरतं. कारण या वेळी हे खास पाणी त्वचेवर अधिक प्रभावी ठरतं.

योग्य वेळी तोंड धुण्याचे फायदे

जर योग्य वेळी तांदळाच्या पाण्यानं चेहरा धुतल्यानं चेहऱ्याची हरवलेली रंगत परत मिळते आणि त्वचा चमकदारही होते. ज्यांची त्वचा ड्राय असते किंवा जास्त तेलकट असते त्यांच्यासाठी हे पाणी खूप फायदेशीर ठरतं.

तांदळाच्या पाण्याने चेहरा धुण्याची पद्धत

तांदळाच्या पाण्याने चेहरा धुणं फारच सोपं आहे. यासाठी उकडलेल्या तांदळाचं पाणी थंड करून फ्रिजमध्ये ठेवा. सकाळी आणि सायंकाळी हे पाणी चेहऱ्यावर लावा, 5 मिनिटं हलकी मसाज करा. नंतर साध्या पाण्यानं चेहरा धुवा. असं केल्यानं त्वचा हेल्दी राहते.

काय काळजी घ्याल?

तांदळाचं गरम पाणी चेहऱ्यावर लावू नये. तांदळाचं पाणी चेहऱ्यावर लावल्यानंतर चेहरा चांगला स्वच्छ करा. तांदळाचं पाणी चेहऱ्यावर नॅचरल पद्धतीनं काम करतं. पण याचा वापर करून त्वचेसंबंधी समस्या दूर केली जाऊ शकत नाही. 

टॅग्स :त्वचेची काळजीब्यूटी टिप्स