Join us
Daily Top 2Weekly Top 5

तांदूळ धुतल्यावर पाणी अजिबात फेकू नका , त्वचा आणि केसांसाठी ते वरदानच - कोरियन ग्लोइंग त्वचेचे गुपित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2026 17:02 IST

Rice water for skin and hair, Korean glowing skin secret, DIY natural toner : त्वचा आणि केसांसाठी तांदूळ पाणी फायद्याचे. पाहा कसे वापरावे.

घरगुती उपायांमध्ये तांदळाचे पाणी (Rice Water) हा एक जुना आणि प्रभावी पर्याय मानला जातो. पूर्वीपासून आशियाई देशांमध्ये त्वचा आणि केसांची निगा राखण्यासाठी याचा वापर केला जातो. कोरियात या पाण्याला फारच महत्व आहे. साधे, स्वस्त आणि सहज उपलब्ध असलेले तांदळाचे पाणी योग्य पद्धतीने वापरल्यास त्वचा तजेलदार आणि केस मजबूत राहण्यास मदत होते. अगदी आरामात करता येणारा उपाय आहे. 

तांदळाच्या पाण्यात कार्बोहायड्रेट्स, विशेषतः स्टार्च, तसेच बी जीवनसत्त्वे (Vitamin B समूह), व्हिटामिन ई, अमिनो अ‍ॅसिड्स आणि काही प्रमाणात अँटी ऑक्सिडंट्स असतात. या घटकांमुळे त्वचेची नैसर्गिक आर्द्रता टिकून राहते आणि केसांना पोषण मिळते. अमिनो अ‍ॅसिड्स केसांच्या मुळांना बळकट करतात, तर स्टार्च त्वचेला मऊपणा देण्यास मदत करतो. त्वचेसाठी तांदळाचे पाणी वापरताना प्रथम चेहरा स्वच्छ धुवून घ्यावा. त्यानंतर कापसाच्या बोळ्याने तांदळाचे पाणी हलक्या हाताने चेहऱ्यावर लावावे. (Rice water for skin and hair, Korean glowing skin secret, DIY natural toner)काही मिनिटे तसेच राहू द्यावे आणि नंतर साध्या पाण्याने धुवून टाकावे. नियमित वापरामुळे त्वचा स्वच्छ दिसू लागते, टॅनिंग कमी होण्यास मदत होऊ शकते आणि त्वचा तजेलदार वाटू लागते. काही जण हे नैसर्गिक टोनर म्हणूनही वापरतात.

केसांसाठी तांदळाचे पाणी शॅम्पूनंतर शेवटच्या धुण्यासाठी वापरले जाते. केसांना तांदळाचे पाणी लावून हलक्या हाताने टाळूवर मसाज करावा आणि काही मिनिटांनी स्वच्छ पाण्याने धुवावे. यामुळे केसांना चमक येण्यास, कोरडेपणा कमी होण्यास आणि केस मजबूत होण्यास मदत मिळू शकते. केसांना हे पाणी लावल्यावर फक्त साधे पाणी ओता अजिबात इतर प्रॉडक्ट्स लावू नका. 

हे पाणी वापरणे तसे अगदी सेफ आहे मात्र थोडी काळजी घेणे आवश्यक आहे. तांदळाचे पाणी खूप जास्त वेळ साठवून ठेवू नये, ताजे किंवा हलके आंबवलेले पाणी वापरणे योग्य ठरते. खूप आंबट किंवा दुर्गंधी येणारे पाणी वापरू नये. आठवड्यातून दोन ते तीन वेळा वापरणे पुरेसे आहे, दररोज वापरल्यास त्वचा किंवा केस कोरडे पडू शकतात. प्रथम पॅच टेस्ट करूनच वापरावे, विशेषतः संवेदनशील त्वचा असल्यास. एकूणच, तांदळाचे पाणी हा नैसर्गिक पोषण देणारा उपाय आहे. योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने वापरल्यास त्वचा आणि केस दोन्हींसाठी फायदेशीर ठरु शकतो. 

English
हिंदी सारांश
Web Title : Don't throw rice water! A boon for skin and hair.

Web Summary : Rice water, rich in vitamins and minerals, is a traditional Asian beauty secret. It hydrates skin, strengthens hair, and adds shine. Use it as a toner or hair rinse for best results, but don't overuse. Patch test first.
टॅग्स :ब्यूटी टिप्सहोम रेमेडीत्वचेची काळजीहेल्थ टिप्स