Join us

चेहरा उजळ-फ्रेश दिसण्याचा सोपा उपाय-तांदळाचं पाणी आणि मध, ‘असं’ लावा-चेहरा दिसेल तरुण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2025 13:50 IST

Rice Water- Honey For Skin : त्वचा टाइट करण्यासाठी आणि सुरकुत्या दूर करण्यासाठी तांदळाचं पाणी आणि मधाचा हा उपाय एकदम परफेक्ट मानला जातो.

Rice Water- Honey For Skin : त्वचा साफ ठेवण्यासाठी, डाग दूर करण्यासाठी आणि निरोगी ठेवण्यासाठी बाजारातील महागड्या प्रॉडक्ट्सपेक्षाही जुने घरगुती उपाय अधिक फायदेशीर ठरतात. म्हणूनच तर आजही अनेक महिला आपल्या आईकडून शिकलेले किंवा आज्जींकडून शिकलेले उपाय त्वचेसाठी करतात. ज्यामुळे त्यांची त्वचा आजही सतेज, मुलायम आणि टवटवीत दिसते. आपल्याला सुद्धा अशीच त्वचा हवी असेल तर एक उपाय फायदेशीर ठरू शकेल. हा उपाय म्हणजे तांदळाचं पाणी आणि मध. 

चेहऱ्यावर ग्लो आणण्यासाठी, डाग दूर करण्यासाठी, त्वचा टाइट करण्यासाठी आणि सुरकुत्या दूर करण्यासाठी तांदळाचं पाणी आणि मधाचा हा उपाय एकदम परफेक्ट मानला जातो. महत्वाची बाब म्हणजे या उपायानं त्वचेला भरपूर पोषण मिळतं. चला तर पाहुयात कसा कराल हा उपाय आणि काय मिळतील फायदे...

तांदळाचं पाणी आणि मध त्वचेसाठी वरदान

दिवसातून एकदा जरी तांदळाचं पाण्यात मध मिक्स करून त्वचेवर लावलं तर त्वचेला खूप फायदे मिळतील. हा नॅचरल फेसपॅक तयार करण्यासाठी ४ ते ५ चमचे तांदळाच्या पाण्यात १ चमचा मध मिक्स करा. हे चांगलं मिक्स करा आणि चेहऱ्यावर लावा.

कधी लावाल?

सकाळी झोपेतून उठल्यावर चेहऱ्यावर तांदळाचं पाणी आणि मधाचं मिश्रण लावू शकता. हे लावून ५ ते १० मिनिटं चेहऱ्याची मालिश करा. मालिश झाल्यावर २० २५ मिनिटं मिश्रण तसंच चेहऱ्यावर राहू द्या. नंतर चेहरा पाण्यानं धुवून घ्या.

काय होतात फायदे?

- सकाळी चेहऱ्यावर मध आणि तांदळाच्या पाण्याचं मिश्रण लावल्यानं अनेक फायदे मिळतात. यानं त्वचेवरील चिकटपणा आणि डलनेस कमी होतो. ज्यामुळे त्वचा उजळते.

- तांदळाचं पाणी आणि मधात अ‍ॅंटी-ऑक्सीडेंट्स आढळतात. ज्यामुळे त्वचा तरूण आणि फ्रेश राहते. सुरकुत्या सुद्धा दूर करण्यास हे मिश्रण मदत करतं. ज्यामुळे आपण नेहमीच तरूण दिसाल. 

- तांदळाचं पाणी आणि मध मिक्स करून लावल्यास चेहऱ्यावरील डार्क स्पॉट्स, अ‍ॅक्ने दूर होण्यास मदत मिळते. तसेच त्वचा आतून साफ होते.

टॅग्स :त्वचेची काळजीब्यूटी टिप्स