आजकाल अनेकजणी चेहर्यावरील लहान केस काढण्यासाठी रेझरचा वापर करतात. याला 'फेशियल शेव्हिंग' किंवा 'डर्माप्लानिंग' असे म्हटले जाते. मुळात हा उपाय करायला सोपा आहे. अगदीच स्वस्त आहे. घरच्याघरी करता येतो. तसेच लगेच परिणाम दिसून येतो. चेहरा लगेच स्वच्छ दिसायला लागतो. म्हणून हा उपाय अनेक जणी करतात. (Removing facial hair with a razor? Your skin will become dull forever, avoid making these mistakes )पण त्याचे अनेक दुष्परिणाम आहेत. त्वचेच्या दृष्टीने रेझर चेहऱ्यावर फिरवणे चांगले नाही. चेहर्याची त्वचा अतिशय नाजूक असल्यामुळे रेझरचा वारंवार वापर केल्यास अनेक त्रास उद्भवू शकतात.
रेझरने केस काढताना त्वचेवर सूक्ष्म जखमा होतात, ज्यामुळे जंतुसंसर्ग, पुरळ, किंवा लालसरपणा दिसू शकतो. काही वेळा त्वचेला खाज येते आणि खाजवल्यामुळे त्वचेवर जखमा तयार होतात. तसेच रेझरमुळे त्वचा कोरडी पडते. सतत रेझर वापरल्याने त्वचेवरील नैसर्गिक तेलाचा थर निघून जातो आणि चेहरा निस्तेज दिसायला लागतो. तसेच, केस रेझरने काढल्यावर ते वेगाने वाढतात आणि जास्त जाड आणि दाट वाढतात.
जर रेझर न वापरता चेहर्यावरील केस काढायचे असतील, तर त्यासाठी काही सुरक्षित आणि नैसर्गिक पर्याय उपलब्ध आहेत. फेशियल वॅक्सिंग हा एक पर्याय आहे, परंतु त्वचा संवेदनशील असल्यास पार्लरमध्ये जाऊनच चेहऱ्यावरील केस काढावेत. दुसरा उपाय म्हणजे थ्रेडिंग, ज्यात केस मुळासकट काढले जातात, त्यामुळे वाढ हळू होते. याशिवाय, हेअर रिमूव्हल क्रीम्स किंवा नेचरल फेसपॅक वापरुनही केसांचे प्रमाण कमी करता येते, पण ते वापरण्यापूर्वी पॅच टेस्ट करावी.
घरगुती उपायांनीही केस कमी करता येतात. बेसन, हळद आणि दुधाचा लेप हा पारंपरिक आणि सुरक्षित उपाय आहे. हा लेप नियमित लावल्यास केस मऊ होतात आणि हळूहळू त्यांची वाढ कमी होते. थोडक्यात, रेझरने चेहऱ्यावरील केस काढणे हे सोपं असलं तरी त्वचेसाठी फार हानिकारक ठरु शकते. म्हणून त्वचा सुरक्षित, नैसर्गिक आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच उपाय वापरावेत.