२०२४च्या ऑलिम्पिकमध्ये झळकलेल्या नावांपैकी एक नाव म्हणजे मनू भाकर. तिने एअर गन शुटिंगमध्ये भारताचे नेतृत्व केले होते. ऑलिम्पिकच्या १० मीटर पिस्तूल या गटात तिने कांस्य पदक पटकावले होते.( Read The Beauty Secrets Inspired By Manu Bhaker) मनुच्या नावाची वाहवाह सर्वत्र झाली होती. तिच्या कौशल्याबरोबरच तिच्या सौंदर्याची चर्चा देखील झाली होती. मनु दिसायला खरच फार सुंदर आहे. ( Read The Beauty Secrets Inspired By Manu Bhaker) जाणून घ्या, तिच्या सौंदर्याचे काय गुपित काय आहे. मनु भाकरची त्वचा तिच्या दिनचर्येतील चांगल्या सवयींमुळे सुंदर आहे. तरूणींनी तिच्याकडून शिकावे असे खुप काही आहे.
१. योग्य आहार
मनु पौष्टिक आहार खाते. साखर खात नाही. तसेच सर्व प्रकारच्या गुणधर्मांनी परिपूर्ण असलेले पदार्थ खाते. त्वचेसाठी गरजेच्या भाज्या, फळे यांचे सेवन करते.
२.हायड्रेशन
चेहरा चांगला राहण्यासाठी पाणी फार गरजेचे आहे. पाण्यामुळे पोट साफ राहते. चेहर्यावर अपचनामुळे येणारे डाग येत नाहीत. शरीर डिहायड्रेट झाले म्हणजेच शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाले की, चेहऱ्यावरही परिणाम होतो. पाणी टोक्सीन्स शरीरा बाहेर फेकते. ज्यामुळे फक्त चेहराच नाही तर, आरोग्यही चांगले राहते. मनु दिवस भरात सरबत, ज्यूस सारख्या द्रव्य पदार्थांचे सेवन करते.
३. अॅक्टिव्ह लाइफ
शरीर चांगले हवे असेल तर, आधी मन खमके हवे. मनू स्वत:चे मन रमवून ठेवण्याचा प्रयत्न करते. ती एक उत्तम घोडेस्वार आहे. ती तिच्या आवडीच्या गोष्टी करून त्यात मन रमवते. मन प्रसन्न असले, हृदय प्रसन्न असले की इतरही अवयव व्यवस्थित काम करतात. स्ट्रेसने चेहऱ्यावर डाग, डार्कसर्कल्स, पिंपल्स येतात. असे होऊ नये म्हणून मन रमवा. आयुष्यात पुढे जात राहा.
४. चांगली झोप
मनु शरीरासाठी गरजेची अशी योग्य झोप घेते. झोप न झाल्याने चेहरा काळवंडतो. डोळे सुजतात. डोक्यावरही परिणाम होतो. दिवसभरात शरीर, मन दमून जाते. ते पुन्हा पूर्ववत होण्यासाठी झोप महत्त्वाची असते.
५. नैसर्गिक सौंदर्य
मनु कधीही अति मेकअप केलेली दिसत नाही. तिला चेहरा साधाच ठेवायला आवडतो. रसायनयुक्त संसाधने ती फार वापरत नाही. त्यामुळे तिचे नैसर्गिक सौंदर्य जास्त मोहक वाटते.